Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label मच्छर. Show all posts
Showing posts with label मच्छर. Show all posts

03 August 2014

मच्छराचं घर

एकदा दोन मच्छर उडत उडत जात होते.

तेवढ्यात वाटेत त्यांना एक टकला माणूस जाताना दिसतो.
एक मच्छर त्या माणसाच्या टकलावर जाऊन बसतो.

दूसरा मच्छर त्याचं कौतुक करतो.

तो म्हणतो, “वा. काय मस्त घर शोधलंय.”


पहिला मच्छर : घर कसलं? आताशी प्लॉट घेतलाय.



16 April 2011

शोध साहेबांचा



भारतात आल्यावर एका इंग्रज साहेबाला संध्याकाळी झोपेत असताना खूप मच्छर चावतात.

साहेब रागाने उठून बसतो आणि सगळ्या विजेचे झोत (लाईट) बंद करून टाकतो.

तेवढ्यात तिथे काम करणारा जुना नोकर टॉर्च लावून येतो आणि नेमका साहेबाच्या आजूबाजूला मारतो.

साहेब : काय हे भारतातले मच्छर??? लाईट बंद केली तर टॉर्च घेऊन शोधताहेत मला.



10 December 2010

मच्छर विकायचाय

एक सिंधी आणि एक चिनी असे दोघे एकमेकांशेजारी बसून प्रवास करीत असतात.

तेवढ्यात एक मच्छर त्यांच्या आजूबाजूला घोंघावू लागतो.

चिनी प्रवासी तो मच्छर पकडून पटकन तोंडात टाकतो आणि मटकावतो.

थोड्या वेळाने मग अजून एक मच्छर त्यांच्यापाशी घोंघावू लागतो.

मग मात्र सिंधी प्रवासी हा मच्छर पकडतो आणि चिनी प्रवाश्याला विचारतो, "विकत घेणार का?"

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...