Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

21 November 2016

मेरा भारत महान



भारतात पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे खूप भेटतील,

पण


पैसा नाही म्हणून तंबाखू, सिगारेट, दारू सोडणारा शोधून सापडणार नाही.


20 November 2016

याददाश

एक मित्र अनेक दिवसांनी इतर मित्रांना भेटतो.

पहिला मित्र : मी आपल्या सगळ्या मित्रांना विसरलो होतो. पण एक चित्रपट पाहिला आणि सगळे आठवले.

दुसरा मित्र : कोणता?


पहिला मित्र : कमीने.


18 November 2016

याला म्हणतात हुशार विद्यार्थी


मास्तर : बंड्या, पेपर नीट धरून लिही. तो मागच्या कार्ट्याला दिसतोय बघ.


बंड्या : बघू द्या मास्तर. अख्ख्या वर्गात माझी एकट्याची नापास व्हायची इच्छा नाहीये.


17 November 2016

संताचा शोध

संता : मी एक शोध लावलाय.

बंता : कोणता?


संता : जेव्हा जेव्हा फाटक बंद होतं ना, तेव्हा तेव्हा आगगाडी जरूर येते.


16 November 2016

खरेदी-विक्री

एक बाई बाजारात भाजी आणायला गेली.

बाई : काय हो, कलिंगड केवढ्याला दिलीत?

विक्रेता : ३० ला दोन.

बाई : थोडं कमी कराना.


विक्रेता : ठीक आहे. ३० ला एक घ्या.


14 November 2016

असाही उपचार

एक माणूस दवाखान्यात उपचारासाठी गेला.


डॉक्टर : तुम्हाला विश्रांतीची खूप गरज आहे. एक झोपेची गोळी लिहून देतोय. बायकोला द्या.


13 November 2016

बापरे...!!!

एकदा एक बाई एका ज्योतिषाकडे गेली.

ज्योतिषी : बोला, कुणाचं भविष्य जाणून घ्यायचं आहे? तुमच्या नवऱ्याच सांगू?


बाई : नको. त्यांचं भविष्य तर माझ्या हातात आहे. फारतर त्यांचा भूतकाळ सांगा.


12 November 2016

बायकांची समस्या



बायकांची सगळ्यात मोठी समस्या ही असते कि,

जेव्हा त्या सून असतात, तेव्हा त्यांना सासू चांगली मिळत नाही,

आणि


जेव्हा त्या सासू होतात, तेव्हा त्यांना सून चांगली मिळत नाही.


11 November 2016

बायकोचं वय



नवरा : एका सर्वेक्षणानुसार, जे लोक जास्त बोलतात त्यांचं वय कमी होतं.

बायको : खरं कि काय? त्यामुळेच मी ४० ची असूनही सगळे म्हणतात कि २० ची वाटते म्हणून.


10 November 2016

जादू


एक पुणेरी दुकानदार आपल्या दुकानाबाहेर एक पाटी लावतो.


उधारी म्हणजे एक जादू आहे. उधार दिले कि ग्राहक गायब होतो.


09 November 2016

हे भगवान, उठाले रे

एकदा एक मुलगी पिझ्झा खायला दुकानात जाते.

पिझ्झा तयार होतो आणि पिझ्झा बॉय विचारतो, “किती तुकडे करू ४ कि ८ ?”


मुलगी : ४ च करा. ८ खाल्ले तर उगाच मोठी होईल अजून.



07 November 2016

हसू नका बर...

जर ग्लास पडून फुटला आणि तरीही,

घरामध्ये शांतता असेल,

तर,

तो नक्कीच बायकोकडून फुटलेला असेल...


पैज लावून सांगतो...


06 November 2016

नवीन नवीन लागलेला शोध



बायकांनी नवऱ्यासाठी करवा चौथचं व्रत करण्याऐवजी मौनव्रत केल्यास पती २५ वर्षे जास्त जगू शकतो.


देवदर्शन



बायको : अहो, मी रोज या आशेने भक्तीभावाने पूजा करते; कि एक दिवस मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल.


नवरा : त्यापेक्षा मीराबाई बनून विष पिऊन घे. सर्व ३३ कोटी देवांचं दर्शन होईल.


ठग लोकं

एक मित्र : काय राव किती ठग लोकं आहेत या जगात.

दुसरा मित्र : काय सांगू, आज एका रिक्षावाल्याने सुट्टे पैसे देताना शंभराची खोटी नोट देऊन गेला.

पहिला मित्र : बघू, कुठे आहे?


दुसरा मित्र : मी पण ती नोट एका भाजीवाल्याला खपवून टाकली.


04 November 2016

ओ संताजी...

संता : बटाटे घ्या बटाटे.

बंता : ह्या तर जिलब्या आहेत.

संता : गप रे. उगाच जिलब्या, जिलब्या करू नकोस. ऐकलं तर माश्या येतील.



03 November 2016

ये मोदी तो पक्का मारवाडी छे !!!


एकदा मोदींकडे एक फकीर आला.

त्याने मस्त गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ एकर जमीन देण्याची घोषणा केली.

फकिराने अजून एक गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ घर दिलं.

फकिराने अजून एक गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ किलो सोनं दिलं.

फकीर मग घरी गेला.
२ दिवस झाले, ४ दिवस झाले, ८ दिवस झाले, १५ दिवस झाले, महिना झाला.
पण कबूल केलेल्या बक्षिसातील काहीही त्याला मिळाले नाही.
फकीर अस्वस्थ झाला आणि मोदींच्या भेटीला गेला.

फकीर : मोदीजी, तुम्ही एवढी छान छान बक्षिसे देऊ केलीत मला. पण अजूनपर्यंत हाती काहीच मिळाले नाही.
मोदीजी : अरे मित्रा, ही देवाण-घेवाणीची कसली गोष्ट करतोस.

   हे बघ, तू माझ्या कानांना खुश करत राहिलास आणि मी तुझ्या.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...