Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label सांगा बर का?. Show all posts
Showing posts with label सांगा बर का?. Show all posts

01 October 2015

१० वर्षांची कमाई

१० वर्षांत कोण किती कमावतं?

शिक्षक = २५ लाख

डॉक्टर = ५० लाख

अभियंता = ५० लाख

सरकारी अधिकारी = ७५ लाख

निर्मल बाबा = ५०० कोटी

रामदेवबाबा = ११,१७७ कोटी

सत्य साईबाबा = ४०,००० कोटी


“...म्हणूनच आपल्या पुढील करियरचा चांगला विचार करा मित्रहो.”


बिचारा “कर्म”चारी

एकदा एका कर्मचार्‍याला दहशतवादी पकडतात.

ते त्याला हाल हाल करून मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारतात.

कर्मचारी : मी एक साधासुधा कर्मचारी आहे हो. मला माझ्या बॉसशी बोलायचं आहे.

दहशतवादी चकित होतात. पण तरी ते त्याला फोन लावून देतात.

तो बिच्चारा कर्मचारी फोन लाऊडस्पीकरवर टाकतो.

कर्मचारी : हॅलो बॉस, मला दहशतवाद्यांनी पकडलंय. ते आता मला हाल हाल करू मारणारेत.

दहशतवादी मोठमोठ्याने हसू लागतात.

बॉस : अरेरेपण उद्या ऑडिट आहे. शक्य असेल तर ये.

हे ऐकून,


दहशतवाद्यांना त्या कर्मचार्‍याची दया येते आणि ते त्याला चक्क सोडून देतात.

06 August 2015

विठ्ठलाला साकडे



आपल्या महाराष्ट्रात आणि देशात मुबलक पाऊस पडावा आणि शेतकरी जगावा, देशाची भरभराट व्हावी म्हणून एका गावाच्या समस्त गावकर्‍यांनी विठुरायाला साकडं घालायचं ठरवलं.

त्यासाठी गावातील विठुरायाच्या मंदिरातील पुजार्‍याने तयारी केली.

प्रार्थनेचा दिवस उजाडला.

सगळे गावकरी जमा झाले.

प्रार्थना म्हटली गेली.


आणि पुजार्‍याने सर्वांसमोर निवेदन केलं की,”प्रार्थना झालीच पण यातून एक गोष्ट पण समजली की आपला सर्वांचा माऊलींवर किती विश्वास आहे ते...माझ्याशिवाय तुमच्यापैकी कुणीही छत्री घेऊन आला नाही.

03 August 2014

मच्छराचं घर

एकदा दोन मच्छर उडत उडत जात होते.

तेवढ्यात वाटेत त्यांना एक टकला माणूस जाताना दिसतो.
एक मच्छर त्या माणसाच्या टकलावर जाऊन बसतो.

दूसरा मच्छर त्याचं कौतुक करतो.

तो म्हणतो, “वा. काय मस्त घर शोधलंय.”


पहिला मच्छर : घर कसलं? आताशी प्लॉट घेतलाय.



15 July 2014

हॉकी टीमचा कोच कोण?


कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चनने स्पर्धकाला एक प्रश्न विचारला, “भारताच्या महिला हॉकी टीमचा कोच कोण?


स्पर्धकाने उत्तर दिले, “शाहरुख खान.”

02 June 2012

हसता का हो?


सांगा बरं, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रत्येक नोटेवर हसताना का दिसतात?
भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून?
?
?
?
नाही हो. कारण, ते रडले तर नोटा भिजणार नाहीत का?

07 May 2012

का बरं?


तापलेल्या तव्यावर मक्याचे दाणे टाकले तर ते तडातडा का उडतात?

सांगा बरं?

नाही सांगता येत?

बरं जाऊ द्या.

त्यापेक्षा एकदा तापलेल्या तव्यावर बसूनच बघा, म्हणजे कळेल.

08 November 2011

दरपत्रक


मला सांगा, २५ रुपयांत पावभाजी मिळते,

तर

“१००” रुपयांत काय मिळेल?



सोप्पं आहे...




“पुरी”भाजी

07 July 2011

जो डर गया, वो मर गया

दोन व्यक्ती असतात.

एकाचं नाव असतं जो आणि दुसर्‍याचं असतं वो.

एकदा जो आणि वो एका जंगलात फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप दिसतो.

जो सापाला बघून खूप घाबरतो पण तेवढ्यात साप वोला चावतो आणि वो मरतो.

आता मला सांगा, वो कसा काय मेला???

तुम्ही म्हणाल की साप चावून...पण कसं शक्य आहे??? (हा PJ आहे.)

तो मेला कारण : जो डर गया, वो मर गया.



26 June 2011

फेसबूकच्या यशाचा कानमंत्र


फेसबूक एवढं यशाच्या शिखरावर कसं काय पोचलं बरं?
त्यात काय एवढं,
त्यांनी फक्त आयुष्याचं एक साधं-सोप्पं तत्वज्ञान वापरलं.

ते हेच की,

माणसाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यापेक्षा दुसर्‍याच्या आयुष्यातच जास्त रस असतो.

म्हणजे आपल्या गावठीत...

आपलं ठेवायचं झाकून अन दुसर्‍याचं पाहायचं वाकून.

17 June 2011

काय काय बायका पण ना...

त्यांना नुसती दुसर्‍यांचीच पडलेली असते. नुसत्या प्रश्न विचारत असतात.

बंड्या, तुमच्या घरात कोण कोण राहतं?

तुझे वडील काय करतात? त्यांना पगार किती आहे?

आई काय करते?

तू कितवीला आहेस?


बंड्या : काकू, तुम्ही सीबीआयमध्ये जा.

02 June 2011

अंगठ्याचा वापर



लहान मुलं अंगठ्याचा वापर चोखण्यासाठी करतात,

अडाणी लोक त्याचा वापर सही म्हणून करतात,

जिंकलेले विजय दर्शविण्यासाठी त्याचा वापर करतात,

तर

माझे फॅन अंगठ्याचा वापर माझे मराठी विनोद वाचल्यावर कौतुक करण्यासाठी करतात.
.
.
.

मला माहितीये, तुम्ही पण कराल...

खाली अंगठा आहे, त्यावर क्लिक करून तुमच्या मित्रांकडे कौतुक करा.

04 May 2011

एक SMS




कधीतरी तुमच्या डोक्याचे केस जातील आणि तुम्हाला टक्कल पडेल.

कदाचित तुम्ही तुमचे दातही गमावून बसाल आणि बोळके व्हाल.

असही होईल की तुम्ही सगळा पैसा गमावून बसाल आणि कंगाल व्हाल.

पण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ती कधीच गमावू शकत नाही,

ती म्हणजे – सौंदर्य

कारण,

माणसाकडे जी गोष्ट नसते, ती तो कसा गमावू शकेल बरे?

25 March 2011

माणूसही गाढवच (English)

Equation 1

Human = eat + sleep + work + enjoy

> Donkey = eat + sleep
>
> Therefore:
> Human = Donkey + Work + enjoy
>
> Therefore:
> Human-enjoy = Donkey + Work
>
> In other words,
> A Human that doesn't know how to enjoy = Donkey that works.




Equation 2
 Man = eat + sleep + earn money

> Donkey = eat + sleep
>
> Therefore:
> Man = Donkey + earn money
>
> Therefore:
> Man - earn money = Donkey
>
> In other words
> Man who doesn't earn money = Donkey

Equation 3
Woman= eat + sleep + spend

> Donkey = eat + sleep
>
> Therefore:
> Woman = Donkey + spend
> Woman - spend = Donkey
>
> In other words,
> Woman who doesn't spend = Donkey


To Conclude:
From Equation 2 and Equation 3

> Man who doesn't earn money = Woman who doesn't spend
>
> So Man earns money not to let woman become a donkey!
> And a woman spends not to let the man become a donkey!
>
> So, We have:
> Man + Woman = Donkey + earn money + Donkey + Spend money
>
> Therefore from postulates 1 and 2, we can conclude
>
> Man + Woman = 2 Donkeys that live happily together
.

06 March 2011

काय म्हणाल?


एक Electric Wire दुसर्‍या Electric Wire च्या प्रेमात पडते.

याला तुम्ही कोणत्या प्रकारचं प्रेम म्हणाल?

हा हा हा !!!

याला तुम्ही Current Affair म्हणून शकता.

26 February 2011

Translation

जर एक जाडी मुलगी बसस्टॉपवर बसची वाट बघत बसली असेल, तर हे तुम्ही इंग्रजीत कसे म्हणाल?

सोप्पं आहे, "Motivating."

हे कसं काय? असा प्रश्न पडला ना?

अहो, Motivating म्हणजे, "मोठी वेटिंग."

05 February 2011

why?


१. चोर चोरी करताना का घाबरतो?
कारण – आपण चोरलेला माल दूसरा चोर तर चोरून नेणार नाही ना म्हणून.

२. शाहजहानने आपल्या बेगमसाठी ताजमहालच का बांधून घेतला?
कारण – तो बादशहा होता. मग बेगमसाठी तो झोपडी कशी बांधणार?

शोधा पाहू...

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

शोधा पाहू वरील ओळीत १ राहिलय.

दुसर्‍यांदा वाचताय?

पुन्हा वाचताय?

अरे मूर्खांनो,

A B C D मध्ये कधी १ येतो का?





30 December 2010

संधी

मला सांगा, लग्नसमारंभाच्यावेळी नवरदेवाला घोड्यावर का बसवले जाते?




काही माहिती आहे का आपल्याला याबद्दल?





कारण, नवरदेवाला एक शेवटची संधी दिली जाते पळून जाण्याची...

29 December 2010

पठाण आणि गाढव

पठाण आणि गाढवामध्ये कोणत्या दोन गोष्टी सारख्या आहेत?





सांगा पाहू...








१ ली गोष्ट म्हणजे - दोघे लहानपणी सुंदर असतात दिसायला.

आणि

२ री गोष्ट म्हणजे - मोठेपणी दोघेही ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतात.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...