Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

30 November 2010

आमंत्रण

संता : अरे मी तुला माझ्या लग्नाचं आमंत्रण पाठवलं होतं, तू का आला नाहीस?

बंता : अरे पण मला ते आमंत्रण पत्र मिळालच नाही.

संता : असं कसं...मी त्यात लिहिलं होतं ना, पत्र मिळो वा न मिळो; तू लग्नाला यायचस म्हणजे यायचस !

29 November 2010

सरदारजीची बॅटिंग

एकदा सरदारजी क्रिकेट खेळायला जातो.

सुदैवाने, तो बर्‍यापैकी खेळतो.

त्याच्या ३५ धावा होतात आणि तो लगेच आपली बॅट उंचावून सगळ्या प्रेक्षकांना अभिवादन करतो.

कुणाच्याच काही लक्षात येत नाही, हा मध्येच असा काय करतोय. त्याचं अर्धशतकही झालं नाही.

समोरचा फलंदाज त्याला विचारतो, तर सरदारजी म्हणतो, "तुला ३५ म्हणजे काय माहीत नाही?"

फलंदाज : नाही.

सरदारजी : मला तर शाळेत असल्यापासून माहिती आहे.

फलंदाज : पण काय?

सरदारजी : अरे, ३५ गुण मिळाल्यावर आपण पास होतो ना...

जुना प्राणी

शिक्षक : सांगा बरं मुलांनो, सगळ्यात जुना प्राणी कोणता?

बंड्या : झेब्रा

शिक्षक : (गोंधळून, विचार करत) कसं काय रे बंड्या.

बंड्या : कारण, तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना; गुरुजी.

28 November 2010

परीक्षा

एकदा एका वेड्यांच्या इस्पितळातील डॉक्टर ठरवतात, की आठ वेड्यांची परीक्षा घ्यायची.
जो पास होईल, त्याला सोडून देण्यात येईल.

डॉक्टर खोलीच्या एका भिंतीवर खडूने दरवाजा काढतात.
आठ जणांना सांगितले जाते की, दरवाजा उघडायचा आणि खोलीच्या बाहेर पडायचं.

सात जणांनी दरवाजातून बाहेर जायचा खूप प्रयत्न केला, पण कुणालाच ते जमलं नाही.
एकजण मात्र नुसता बघत बसला होता.

डॉक्टरांनी त्याला विचारले, "का रे, तू बसून नुसती गंमत काय बघतोयस."

तर वेडा म्हणाला, "कारण, त्या दरवाजाच्या कुलूपाची चावी माझ्याकडे आहे."

अंगभूत गुण

सासरेबुवा आपल्या नववधूला म्हणाले, "तू फारच नशीबवान आहेस. माझ्या पश्चात तुला १० लाख रुपये मिळणार आहेत."

नववधू : पण मामंजी, मला तर घरचे म्हणत होते की तुझ्या अंगभूत गुणांमुळे विवाहानंतर तुला ते लगेचच मिळतील म्हणून.

27 November 2010

पत्र

एकदा सरदारजीने आपल्या मित्राला फोन केला आणि सरळ पत्र लिहून ते मित्राच्या पत्त्यावर पाठवून दिले.

मित्राने विचारले, "अरे, फोन असताना तू पत्र का पाठवलेस?"

सरदारजी : होय, मी फोन केला होता तुला. पण फोनमधली बाई म्हणाली ट्राय लेटर, म्हणून मी पत्रच पाठवलं.

26 November 2010

नवीन घड्याळ

साठे : अहो, मी हे जे नवीन घड्याळ इतकं अचूक आहे ना, की ते एक मिनीटसुद्धा पुढे जात नाही किंवा मागे राहत नाही.

जोशी : अरेच्चा, कमाल आहे. गेल्याच महिन्यात तर तू ते खरेदी केलं होतस ना? मग इतक्या लवकर ते कसं काय बंद पडलं?

25 November 2010

भीती

बंड्या : पोलीस काका, तुम्हाला कसली भीती वाटते?

पोलीस : कसलीच नाही.

बंड्या : मग तुम्ही बंदूक घेऊन का उभे राहता?

24 November 2010

नोकरी हवीय?

BSNL ची नोकरीसाठी दिलेली जाहिरात :

 Walk-In Interview

वेगवेगळ्या पदांसाठी BSNL मध्ये भरती चालू आहे.
 उमेदवारांना आकर्षक पगाराची सुवर्णसंधी.

दि. ३०/१२/२०२० पर्यंत आपला बायोडाटा jobs@bsnl.in येथे पाठवावा.
 तसेच मुलाखतीसाठी येताना तुमचा बायोडाटा घेऊन स्वत: हजर राहावे.

पात्रता : इंजिनियर
पगार : रू. ३०,००० प्रती महिना

कामाचे स्वरूप : टॉवरवर बसून कावळे हाकलणे.




22 November 2010

लुकडे ओबामा

बराक ओबामांचं वजन कमी झालं तर त्यांना काय म्हणाल?


विचार करा...



..


...


...


अहो, सोप्पं आहे,

बारीक ओबामा



---जोशीकाका

21 November 2010

एक विचित्र जीवनचक्र

झुरळाला उंदराची भीती वाटते,

उंदराला मांजरीची,

मांजरीला कुत्र्याची,

कुत्र्याला माणसाची,

माणसाला त्याच्या GIRL FRIEND ची,

आणि GIRL FRIEND ला झुरळाची.........

मी आणि बराक ओबामा

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि माझ्यात काय साम्य आहे, माहितीये?

ते कधीही माझ्या घरी येत नाहीत,

आणि

मीसुद्धा कधीही त्यांच्या घरी जात नाही;

कारण



Ego Problem, दुसरं काय...

20 November 2010

प्रिंटर सापडत नाहीये

सरदारजी एकदा आपल्या हार्डवेअरच्या माणसाला फोन करतो.

त्याला तो आपला प्रॉब्लेम सांगतो.

"हॅलो, मला प्रिंटरमधून प्रिंट काढता येत नाहीये. मी जेव्हा तसा प्रयत्न करतो, तेव्हा माझा कम्प्युटर मला सांगतो की प्रिंटर सापडत नाहीये (Can't find printer).

मी तर प्रिंटर उचलून मॉनिटर जवळ नेला, त्यावर ठेवला तरीपण काही उपयोग होत नाहीये."

19 November 2010

ठिकाण

राजू (लव्ह गुरुस) : सर, मुलींना प्रपोज करायला चांगलं ठिकाण कोणतं?

लव्ह गुरु : मंदिर

राजू : मंदिर? का?

लव्ह गुरु : हो, कारण तिथं मुली चप्पल घालून जात नाहीत.

डोकं लढवा

शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यांचा वापर कशासाठी केला?







विचार करा,








विचार करा,






अहो, सोप्पं आहे,



कुलूप उघडायला...

सुविचार

जर तुम्हाला काही काळासाठी सुखी व्हायचं असेल, तर - पेग घ्या.

जर तुम्हाला जास्त काळासाठी सुखी व्हायचं असेल तर - प्रेमात पडा.

जर तुम्हाला कायमचं सुखी व्हायचं असेल तर - वरील दोन्ही गोष्टींचा विचारही करू नका.

18 November 2010

रेडिओ स्टेशन्स

एक ग्राहक मोबाइल घ्यायला दुकानात जातो.

दुकानदार एक चांगला मोबाइल ग्राहकास देतो.

ग्राहक : या मोबाईलवर सगळी स्टेशन्स मिळतात ना.

दुकानदार : हो. फक्त दोनच मिळत नाहीत.

ग्राहक : कोणती?

दुकानदार : रेल्वे स्टेशन आणि पोलिस स्टेशन.

इंजिनियरिंगचा परिणाम

इंजिनियरिंग शिकत असताना तांत्रिक बाबींशी जास्त निगडीत असल्याचा परिणाम बघा कसा होतो ते...

एक सॉफ्टवेअर इंजिनियर एका इमारतीच्या गच्चीवरून चुकून तोल जाऊन पडतो.

पडताना तो वाचवा, वाचवा, मदत करा; म्हणण्याऐवजी ओरडतो,


F1
F1
F1
F1

उंदरांचा सुळसुळाट

उंदरांचा खूपच सुळसुळाट झालाय हो,
...
...
..
..
..
..
..
..
..
...
...
...

...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...

...
....
....
....
....



बघा ना, सगळा मजकूरच खाऊन टाकला उंदीरमामाने...

17 November 2010

BE चा लोंगफॉर्म

BE म्हणजे काय?

८० GB अभ्यासक्रम
८० MB शिकवलं जातं
८० KB आपल्या लक्षात राहतं
८० Bytes आपल्याला उत्तरं देता येतात

आणि आपल्याला

BINARY मार्क्स मिळतात

आणि त्यानंतर शेवटी आपल्याला पदवी मिळते,

BE म्हणजे (Brain Empty)...

16 November 2010

Assumption

प्रश्न : हे सिद्ध करा की पोपट हत्तीवर बसतो आणि त्यामुळे हत्ती मरतो.

इंजिनियरिंगचा विद्यार्थी : असं गृहीत धरा की, पोपटाचं नाव 'हत्ती' आहे आणि हत्तीचं नाव 'पोपट' आहे.

म्हणजेच सिद्ध होते.

सरदारजीची टोटल

एका सरदारजीला त्याच्या मुलाच्या शाळेत बोलावून घेतलं जातं.

शिक्षक म्हणतात, "तुमच्या मुलाचे प्रगतीपुस्तक बघा. गणित १०, इंग्रजी ५, हिंदी ४, विज्ञान ५, आणि टोटल २४."

यावर सरदारजी म्हणतो, "टोटलला २४ कसे काय पडले? या विषयाची शिकवणीसुद्धा लावली नव्हती. मग याला जास्त मार्क कसे काय पडले?"

15 November 2010

शिकवणी

शिक्षक : का रे, दोन दिवसांपासून शिकवणीला का आला नाहीस?

बंड्या : त्याचं काय आहे गुरुजी, माझ्याकडे एकाच कुर्ता-पायजमा आहे आणि परवा तो धुवायला टाकला होता. म्हणून आलो नाही.

शिक्षक : मग काल का आला नाहीस?

बंड्या : आलो होतो गुरुजी. पण अंगणात तुमचा कुर्ता-पायजमा वाळताना दिसला, म्हणून परत गेलो.

संपत्ती

दोन मित्रांची चर्चा -

पहिला : अरे, मी जन्माला आलो तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं.

दूसरा :हो, माझ्याकडे पण. पण...आता मी लग्न केलय त्यामुळे, मी मरेन तेव्हाही माझ्याकडे काहीही नसेल.

सरदारजीची डायरी

बुधवार : एका जोडे विक्रेत्याला मूर्ख बनविले. एकाच बुटाच्या किमतीत दोन विकत घेतले. (त्याने एकाच बुटावर किंमत लिहिली होती, बहुधा तो दुसर्‍या बुटावर लिहिण्याचे विसरला असावा.)

गुरुवार : औषधाच्या दुकानातून मालकाने कामावरून काढून टाकले. त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते. पण मी तरी काय करणार, बॉटल प्रिंटरमध्ये जातच नव्हती.

शुक्रवार : रात्री खूप हसलो, बुधवारी पांडेजीने सांगितलेला विनोद फारच छान होता.

शनिवार : दिवसभर पाऊस होता, पण तरीही शेवटी पावसात भिजून का होईना संध्याकाळी झाडांना पानी दिलंच.

रविवार : वॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो. सगळं गाव पालथ घातलं, पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही.

14 November 2010

प्रेम

सखूबाईचे आपल्या नवर्‍यावर अतिशय प्रेम होते.

पण त्यांचा नवरा वारला.

सर्वजण आता म्हणू लागले, "सखूबाई आता नवर्‍याशिवाय जगू शकत नाही."

आणि झालेही तसेच.

त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं.

मंदीचा काळ

रामराव : काय हो, तुम्हाला मुलं किती?

शामराव : मला सहा मुलं.

रामराव : अरे वा. काय करतात ती?

शामराव : थोरला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, दूसरा फॉरेन बँकेत आहे, तिसरा शेअर ब्रोकर आहे, चौथा मल्टीनॅशनल कंपनीत आहे, पाचवा एयरवेजमध्ये आहे आणि सहावा पानवाला आहे. सध्या तोच आमचं घर चालवतो.

स्वर्गसुख

बायको : काय हो, स्वर्गात म्हणे  नवरा-बायकोला एकत्र राहून देत नाहीत. खरे आहे का हे?

नवरा : हो, हे अगदी खरं आहे.

बायको : पण का हो असे?

नवरा : अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात.

आईचा फोन

एका मोबाईलच्या दुकानात खूपच गर्दी होती.

गर्दीत चुकून कुणीतरी आपला मोबाइल काऊंटरवर विसरून गेला.

थोड्या वेळाने दुकानदाराला सुचलं की त्यातल्या एखाद्या नंबरवर फोन करून त्या व्यक्तीला कल्पना द्यावी की त्याचा मोबाइल इथे विसरला आहे.

म्हणून दुकानदाराने मोबाइलमधले सर्व नंबर तपासले. एक नंबर आई या नावानेहोता.

दुकानदाराने आईला फोन करून मोबाइल त्याच्याकडे असल्याचे संगितले.

थोड्या वेळाने आईचा फोन आला व तिने सांगितलं, बेटा तू तुझा फोन या दुकानात विसरला आहेस.

13 November 2010

शब्दाचा पक्का

कंत्राटी कर्मचारी : साहेब, तुम्ही मागच्याच महिन्यात सांगितलं होतं ना, की पुढच्या महिन्यात पगार वाढवतो म्हणून.

साहेब : मी माझा शब्द कधीच फिरवत नाही. मागच्या महिन्यात जे सांगितलं होतं, तेच आताही सांगतो.

कन्फ्युज?

सरदारजीला कन्फ्युज कसे कराल?


त्याला एका गोल खोलीत घेऊन जा,

आणि



एका कोपर्‍यात बसायला सांगा.

झुरळांची पावडर

जोशी एकदा तुळशीबागेत जातात.

एक कीटकनाशकं विकणारा माणूस त्यांना हाक मारतो.

विक्रेता : ओ साहेब, घ्या की काहीतरी विकत.

जोशी : छे, छे, मला काही नकोय.





विक्रेता : अहो, झुरळांची पावडर तरी घ्या की. एकदम भारी आहे.

जोशी : ती तर अजिबातच नको. आम्ही आमच्या झुरळांचे इतके लाड करत नाही. त्यांचा काय नेम, आज पावडर दिली; तर उद्या डिओडरंट मागतील.

12 November 2010

साक्ष

वकील (साक्षीदारास) : तू म्हणतोस की भिंत ८ फुट उंच आणि तू जमिनीवर उभा होतास. भिंतीवर किंवा शिडीवर चढला नव्हतास.

साक्षीदार : बरोबर.

वकील : आता तुझी उंची ५ फुट आणि भिंतीची उंची ८ फुट. मग पलीकडे तो माणूस काय करत होता, हे तुला कसं काय दिसलं?

साक्षीदार : भिंतीला भगदाड होतं ना साहेब.

11 November 2010

भविष्य

शिक्षिका : मुलांनो, कोणी एखाद्या कागदाकडे बघून भविष्य सांगू शकतं का?

बंड्या : हो ताई.

शिक्षिका : कोण बरं?

बंड्या : माझी आई.

शिक्षिका : ते कसं काय?

बंड्या : माझ्या प्रगतीपुस्तकाकडे बघून आई सांगू शकते की बाबा घरी आल्यावर काय होणार.

काय झालं?

सदाशिव पेठेत एक मुलगा सायकल चालवता चालवता एका दिव्याच्या खांबाला जाऊन धडकतो.

जोशी काका धावत धावत बाहेर येतात.

शेजारच्या कुलकर्णींना विचारतात, "काय हो, काय झालं?"

कुलकर्णी : अहो तुमचा राजू सायकल चालवत होता.

जोशी : हो, मग.

कुलकर्णी : तो दिव्याचा खांब दिसतोय का?

जोशी : हो हो, दिसतोय की.

कुलकर्णी : तुमच्या मुलाला नाही दिसला.

10 November 2010

तब्येतीत सुधारणा

जोशीकाका हॉस्पिटलमध्ये बेडवर पडले होते.

चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये असल्याने ते जाम वैतागलेले होते.

एक दूरचा नातेवाईक त्यांची चौकशी करायला आला.

त्याने विचारले, "काय काका, तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय. सुधारणा दिसतेय तब्येतीत."

जोशीकाका : हो ना, सुधारणा होणारच. काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना.

फाशी

राजाची परवानगी न घेता एका शिपायाने त्याच्या बागेतली द्राक्षे खाल्ली. राजाने शिपायाला फासावर लटकवण्याची आज्ञा केली.

फाशी देण्यासाठी त्याला नेट असताना, त्या शिपायाने द्राक्षे पुन्हा तोडून खाल्ली.

तेव्हा त्याच्याबरोबरच्या दुसर्‍या शिपायाने त्याला विचारले, "एवढे होऊनही तू द्राक्षे का खातोस?"

शिपाई : का नाही खाणार? त्यासाठीच तर मी माझा प्राण देत आहे.

दानशूर बंड्या

बंड्या : आजोबा, आजोबा, दोन रुपये द्या ना त्या गरीब म्हातार्‍या बाईला.

आजोबा : हे घे. मला तुझा हा दानी स्वभाव बघून खूप आनंद झाला. पण ती बाई कुठे आहे.

बंड्या : ती बघा तिथे कुल्फी विकते आहे.

09 November 2010

गोड बोलणं

पत्नी : नवीन लग्न झालं तेव्हा माझं बोलणं तुम्हाला किती गोड वाटत होतं. तुझं बोलणं म्हणजे थंडगार गंगाजलच असे म्हणायचा तुम्ही. आणि आता?

पती : अजूनही मी तसेच म्हणतो. पण आता त्या प्रवाहाला पूर आलाय आणि तो माझ्या डोक्यावरुन जाऊन आपण त्यात वाहून जाऊ की काय, असे वाटायला लागले आहे.

08 November 2010

स्मरणशक्ती

सीमा आपले पती सोमदेवांना म्हणाली, "आज आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस. एक तपापुर्वी तुम्ही जे जे म्हणाला होतात, ते सगळं आठवतंय मला."


सोमदेव : बरं मग सांग तरी.

सीमा : तुम्ही म्हणायचात, तुम्ही माझे पती होण्यालायक नाही आहात.

सोमदेव : हो हो, पण ते इतक्या वर्षांनतरही आठवते तुला? तुझी स्मरणशक्ती चांगली आहे.

सीमा : हो, कारण आता माझ्या लक्षात येतय की तुम्ही कसेही असलात तरी खोटं कधी बोलला नाहीत.

कर्ज

एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.

कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.

यावर तो माणूस म्हणाला, "मला माहीत नव्हतं, नाहीतर मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असतं."

07 November 2010

पंचनामा

रस्त्यात पडलेल नाणं उचलताना एकाचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला.

पंचनाम्यात नैसर्गिक मृत्यु अशी नोंद होती.

पुढे खटला चालविल्यावर तपासात ते नाणं नसून थंडपेयाचं चकाकणारं झाकण असल्याचं निष्पन्न झालं.

तेव्हा अहवाल देण्यात आला, "मानसिक धक्क्याने मृत्यु."

06 November 2010

स्वागत

                                    संजयकडे त्याचे काका, काकू, मामा, मामी, त्यांची तीन-तीन मुले, दोन मावश्या, त्यांची चार मुले अशी पाहुणेमंडळी अचानक येऊन टपकली.

संजयच्या आईला फार आनंद झाला. तिने आपल्या दीर, भाऊ, बहिणीचे, त्यांच्या मुलांचे चांगले स्वागत केले.
चहापाणी, नाश्ता झाला.

तेवढ्यात संजयचे बाबा त्याला म्हणाले, "संजय, जा बरं पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन ये."

हे ऐकून सर्वजण खुश झाले.


संजय बाहेर गेला आणि पाहुण्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी दोन-तीन रिक्षा घेऊन आला.

हरकत

कुलकर्णींच्या शेजारी नव्यानेच राहायला आलेले नाडकर्णी आपल्या सामायिक भिंतीवर खिळा मारत होते. बराच वेळ चाललेल्या ठोकाठोकीने कुलकर्णी थोडेसे वैतागले. काहीसे नाराजीच्या सुरात ते नाडकर्णींकडे गेले.

नाडकर्णी : आमच्या ठोकाठोकीने तुम्हाला त्रास झाला असेल नाही. त्याचं काय आहे, मला एक पेंटिंग भिंतीवर लावायचं होतं ना म्हणून एक खिळा ठोकावा म्हटलं.

कुलकर्णी : अहो काही हरकत नाही आमची, खुशाल ठोका की. मला फक्त एवढं विचारायचं होतं की खिळ्याच्या दुसर्‍या टोकाला आम्ही फ्रेम लटकवली, तर तुमची काही हरकत तर नाही ना...

04 November 2010

फोटो कुणाचा?

दोन दारुडे फुल्ल पिऊन रस्त्याने चाललेले असतात.

त्यांना रस्त्यात एक आरसा सापडतो.

पहिला दारुड्या तो आरसा घेतो आणि त्यात पाहतो. आरशात पाहून म्हणतो, "अरे ए, हा बघ बरं कुणाचा फोटो आहे."

दूसरा दारुड्या : बघू बरं.

तो आरशात पाहतो आणि म्हणतो, गधड्या एवढं पण समजत नाही का? हा तर माझाच फोटो आहे.

03 November 2010

मी आंधळा होईल

एकदा खेड्यातील एका गावात दरोडा पडतो.

दरोडेखोर एका घरात घुसतात आणि मालकाला धमकावतात.

दरोडेखोर : चल मुकाट्याने जे काही जवळ असेल ते काढून दे, नाहीतर तुझे दोन्ही कानच कापून टाकीन.

मालक : असं नका करू हो, नाहीतर मी आंधळा होईल.

दरोडेखोर : कान कापल्याने तू फार तर बहिरा होशील पण आंधळा कसा काय होशील रे.

मालक : अहो, कान कापल्यावर मी चश्मा कुठे लावू?.

02 November 2010

Longform

एकदा एक सरदार कौन बनेगा करोडपतीचा रिमेक असलेल्या कार्यक्रमात भाग घेतो.

त्याला प्रश्न विचारला जातो, "बताईये, SMS का लोंगफॉर्म क्या है?"

कम्प्युटरवर विविध पर्याय दिले जातात. पण सरदारजी हे सर्व पर्याय नाकारतो.
नाइलाजाने सूत्रसंचालक त्यालाच उत्तर द्यायला सांगतो.

सरदारजी : S.M.S. म्हणजे सरदार मनमोहन सिंग

सगळे लोक सरदारजीला हसू लागतात.
आता दूसरा प्रश्न, "M.M.S. म्हणजे काय?"

सरदारजी : मिसेस मनमोहनसिंग

नदीच्या पल्याड

संता आणि बंता दोघे नदीच्या दोन काठांवर उभे होते.

संता : ए बंता, मला नदीच्या पलीकडे यायचं आहे.


बंता : अरे, कशाला येतोस इकडे; तू आधीच नदीच्या पलीकडे आहेस.

01 November 2010

साठे सरांच्या घरी चोरी

साठे सरांच्या घरी चोरी होते. तक्रार देण्यासाठी ते पोलिस चौकीत जातात.

पोलिस निरीक्षक त्यांना विचारतात, "कधी झाली चोरी?"

साठे सर : १९५० ला

पोलिस निरीक्षक : १९५० ला? (टिंगल उडवीत) वा, आपण फारच लवकर आलात मग.

साठे सर : हो मग, आपण कुठल्याही कामाला अजिबात वेळ घालवत नाही. आता बघा १९५० ला चोरी झाली आणि आता २०१० ला तुमच्यासमोर आहे.
केवळ २० मिनिटांत आलो बघा इथे.

ब्लॅंक एसएमएस

एकदा एका सरदारजीला चुकून कोणाकडून तरी कोरा एसएमएस आला.

सरदारजीने त्याला लगेच कॉल केला आणि म्हणाला, "ओय, तुला माहिती आहे का? अरे, तुझ्या मोबाईलची शाई संपली आहे."

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...