Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
एकदा एका बेवड्याला एक हवालदार
समजावत असतो की दारू पिण्याने संसार कसा उध्वस्त होतो ते.
पण बेवडा मात्र याच्या उलट
दारू पिण्याने संसार कसा टिकतो ते हवालदाराला सांगत होता.
हवालदार :मला सांग,
तुला बायको महत्वाची वाटते की दारू?
बेवडा : (एक क्षणही विचार न
करता)दारू.
हवालदार :का?
बेवडा :कारण,
जेव्हा बायको मला मारते, तेव्हा दारू पिलेला असल्यानेच मला लागत नाही. म्हणजे
साहजिकच मी तिच्यावर हात उगारत नाही, रागवत नाही आणि आमचा संसार टिकून राहतो. आलं लक्षात?
एक बेवडा फुल्ल टाईट होऊन रात्रीच्या वेळी रस्त्याने आरडा-ओरड
करत हे पोस्टर वाच, ते पोस्टर वाच, रस्त्यावर दिसेल त्याला उपदेशाचे
डोस पाज असं करत त्याच्यातच रमत गमत चालला होता.
तेवढ्यात त्याला एक पोस्टर दिसतं.
त्यावर लिहिलेलं असतं,“If you drink every day, You will
become Alcoholic.”
बेवडा खुश होतो आणि म्हणतो, “वाचलो बाबा, मी तर फक्त रात्रीचीच पितो.”
जेवताना तो हळूच फुगा काढून बायकोची नजर चुकवत ग्लासमध्ये थोडी दारू ओततो.
पण, त्याची चाणाक्ष बायको मात्र त्याला पकडते.
बायको : काय हो, तुम्हाला हजारदा सांगूनही अजिबात डोक्यात बसत नाही का दारू प्यायची नाही म्हणून? नुसती ऐश करत जगायची सवय लागलीय. जरा बायको-पोरांचा तरी विचार करा की.
दारुड्या नवरा तो दारूचा ग्लास त्याच्या बायकोच्या तोंडाला लावतो आणि तिला थोडीशी दारू पाजतो.
बायको : छी ! थू ! कित्ती घाण वास येतोय?
दारुड्या नवरा : पाहिलंस? आणि तू म्हणतेस की मी ऐश करतोय म्हणून.