Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label सुशिक्षित. Show all posts
Showing posts with label सुशिक्षित. Show all posts

20 July 2014

खोटं बोल, पण रेटून बोल


एकदा वर्ग भरायच्या अगोदर दोन विद्यार्थी आपापसांत भांडत होते.
तेवढ्यात शिक्षिका वर्गात येतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही का भांडत आहात?

विद्यार्थी : आम्हाला १ हजार रुपयांची नोट सापडली आणि जो सर्वात मोठ्ठं खोटं बोलेल त्यालाच ती मिळेल असं ठरवलंय. 

पण मी मोठ्ठं खोटं बोललो असल्याने ती मलाच मिळायला हवी.

शिक्षिका : काय रे नालायक कार्टी आहेत. अरे लाजा वाटतात का तुम्हाला यासाठी भांडायला? अरे, मी तुमच्या वयाची होते ना, तेव्हा खोटं बोलणं काय असतं हेसुद्धा माहीत नव्हतं मला.


दोन्ही विद्यार्थी एकमेकांकडे पाहतात आणि ती १ हजारांची नोट बाईंना देतात.

27 October 2010

पैज

एकदा एक खेडूत आणि प्रोफेसर यांची आगगाडीत भेट झाली.
वेळ घालवण्यासाठी एकमेकांना त्यांनी कोडं घालायचं ठरवलं.

प्रोफेसर : तुझं कोडं मला सांगता आलं नही तर मी तुला दोन रुपये देईन.

खेडूत : पण मी तुमच्या एवढा शिकलेला नाहीय. म्हणून तुमचं कोडं मला सोडवता आलं नाही तर मी तुम्हाला एकच रुपया देईन. कबूल आहे?

प्रोफेसर : ठीक आहे, चालेल. सांग काय आहे तुझं कोडं?

खेडूत : असा कोणता प्राणी आहे, की जो साडेतीन पायावर चालतो?

प्रोफेसर : (विचार करून) अरे, मला तर याचं उत्तर काही येत नाही बुवा. जाऊ दे, हे घे २ रुपये आणि तूच सांग त्याचं उत्तर.

खेडूत : हा घ्या १ रुपया, मलाही त्याचं उत्तर येत नाही.

16 August 2010

मुलाखत

एका माणसाची मुलाखत घेतली जाते. त्याला प्रश्न विचारला जातो.

साहेब : Ford म्हणजे काय??
माणूस : Ford म्हणजे गाडी.
साहेब : गुड. Then what is Oxford??
माणूस : Oxford म्हणजे बॆलगाडी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...