लोणावळ्याजवळ जाताच रेल्वेचं एक इंजिन बंद पडतं. त्यामुळे रेल्वेचा ड्रायव्हर एका इंजिंनवरच कशीबशी रेल्वे हळूहळू चालू ठेवतो.
थोड्या वेळाने मग दुसरंही इंजिन बंद पडतं आणि गाडी जागीच थांबते.
ड्रायव्हर मग सर्व डब्यातील प्रवाशांना ऐकू जाईल अशाप्रकारे साऊंड सिस्टमवरून सूचना करतो.
सूचना : सर्व प्रवाशी बंधु आणि भगिनींनो, मी तुम्हाला आता एक चांगली आणि एक वाईट अशा दोन बातम्या सांगणार आहे.
वाईट बातमी ही की आपल्या गाडीची दोन्ही इंजिन बंद पडल्याने आपण पुढे जाऊ शकत नाही. नवीन इंजिन येईपर्यंत आपल्याला इथेच वाट पाहत थांबावे लागणार आहे.
चांगली बातमी ही की आपण याक्षणी रेल्वेने प्रवास करीत आहात, विमानाने नाही.
