Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label येरवडा. Show all posts
Showing posts with label येरवडा. Show all posts

02 July 2011

ओळखा पाहू

२ माणसे रस्त्याने जात असतात.
त्यांना १ कोंबडा दिसतो.

१ला : हा कोंबडा आहे.
२रा : नाही कोंबडी आहे.

यांची भांडणे चालू असतात.
तेवढ्यात तिथून एक सरदार चाललेला असतो.

सरदार : भांडू नका. मी सांगतो तुम्हाला कसं ओळखायचं की तो कोंबडा आहे की कोंबडी.

दोघे : हो, हो, सांगा.

सरदार : एक काम करा. एक छोटासा खडा मारा त्याला. तो पळाला तर कोंबडा आणि पळाली तर कोंबडी.

03 May 2011

ब्रेन ट्यूमर

एका मनोरुग्णांच्या इस्पितळात डॉक्टर एका वेड्याला बोलावून घेतात आणि त्याला एक वाईट बातमी सांगतात.

डॉक्टर : हे बघ मी तुला एक वाईट बातमी सांगत आहे. धीर धरून ऐक. तुला ब्रेन ट्यूमर आहे.

हे ऐकून वेडा मात्र आनंदाने उड्या मारू लागतो.

डॉक्टर : अरे, आनंदाने असं नाचायला काय झालं?

वेडा : मला ब्रेन ट्यूमर आहे, म्हणजे हेच सिद्ध होतं; की मला मेंदू (Brain) आहे म्हणून.




11 January 2011

खरेदी - विक्री

पहिला वेडा : मी ताजमहाल विकत घेणार आहे.

दूसरा वेडा : अरे, पण मी तो इतक्यात विकणार नाहीये.

09 December 2010

शांत बसलेले वेडे

वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दहा-बारा वेडे नाचत असतात.

पण बाजूलाच दोन वेडे शांत बसलेले असतात.

डॉक्टरांना वाटते की हे दोघे शहाणे झाले आहेत.

ते त्या दोघा वेड्यांना शांत राहाण्याचे कारण विचारतात.

तेव्हा ते दोघे म्हणतात, "आम्ही दोघे नवरा बायको आहोत."

28 November 2010

परीक्षा

एकदा एका वेड्यांच्या इस्पितळातील डॉक्टर ठरवतात, की आठ वेड्यांची परीक्षा घ्यायची.
जो पास होईल, त्याला सोडून देण्यात येईल.

डॉक्टर खोलीच्या एका भिंतीवर खडूने दरवाजा काढतात.
आठ जणांना सांगितले जाते की, दरवाजा उघडायचा आणि खोलीच्या बाहेर पडायचं.

सात जणांनी दरवाजातून बाहेर जायचा खूप प्रयत्न केला, पण कुणालाच ते जमलं नाही.
एकजण मात्र नुसता बघत बसला होता.

डॉक्टरांनी त्याला विचारले, "का रे, तू बसून नुसती गंमत काय बघतोयस."

तर वेडा म्हणाला, "कारण, त्या दरवाजाच्या कुलूपाची चावी माझ्याकडे आहे."

14 October 2010

तुम्ही वेडे आहात...

तुम्हाला जर कुणी वेडा म्हणाले, 

तर अजिबात दु:खी होऊ नका,
अजिबात रडू नका,
अजिबात घाबरू नका,
अजिबात रागाऊ नका,
अजिबात नाराज होऊ नका,



फक्त एकच करा,
एक ग्लास थंड पाणी घ्या,
आणि विचार करा,








च्यायला, ह्याला कसं काय कळलं.

13 October 2010

छगनचं धाडस

एकदा वेड्यांच्या इस्पितळातील डॉक्टर ठरवतात की वेड्यांची मानसिक स्थिती टवटवीत राहण्यासाठी एक सहल काढायची.
ठरल्याप्रमाणे सहल जाते निसर्गरम्य अशा ठिकाणी. ते जातात धरण पाहायला.

पण तिथे भलतेच घडते. बबन नावाचा वेडा पाण्यात पडतो. त्यावेळी छगन नावाचा वेडा पाण्यात उडी मारून त्याचे प्राण वाचवतो.

सर्व डॉक्टर छगनचे कौतुक करतात. त्याला नीट झाल्याचे समजून इस्पितळातून घरी सोडतात.

ही बातमी जेव्हा सिनीयर डॉक्टरांना समजते, तेव्हा ते छगनच्या घरी जातात.

ते छगनला म्हणतात, "अरे छगन, तू तर अतिशय धाडसाचं काम केलंस. पण त्या बिचार्‍या बबनचं नशीबच खराब म्हणावं लागेल, तू त्याला वाचवलस आणि त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली बघ."

त्यावर छगन म्हणतो, "अहो डॉक्टर, मीच त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सुकण्यासाठी खुंटीला टांगल होतं."

01 October 2010

गावचा सरपंच

पहिला वेडा : मी आपल्या गावचा सरपंच आहे.

दूसरा वेडा : तुला कोणी केल सरपंच?

पहिला वेडा : कोणी म्हणजे काय, प्रत्यक्ष परमेश्वरान केल.

दूसरा वेडा : काहीतरीच काय, मी कधी केल तुला सरपंच?

28 September 2010

डबलसीट

एका वेड्यांच्या इस्पितळात सारे वेडे आपण सायकल चालवत आहोत, असे समजून इकडेतिकडे पळत असतात.

एक वेडा मात्र शांतपणे बसलेला असतो.

डॉक्टर त्याच्याकडे जातात आणि विचारतात, “का रे, तु का नाही सायकल चालवत ?”

वेडा म्हणतो, “काय पण हो मूर्खपणा हा तुमचा, तुम्हाला दिसत नाही का मी डबलसीट बसलोय ते.”

साखळी

डॉक्टर : अरे, तु तुझ्या गळ्यातील साखळी का ओढत आहेस ?

वेडा : काय करू डॉक्टर, सकाळपासून साखळी ओढत आहे, पण गाडी काही थांबतच नाहीय.

रंगकाम

दोन वेडे विमानतळावर जातात.

पहिला वेडा : काय रे, या मोठ्या विमानाला रंग कसा देतात ?

दूसरा वेडा : अरे, विमान जेव्हा आकाशात जातं, तेव्हा ते छोट होतं. त्यावेळीच त्याला रंग देऊन टाकतात.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...