Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

28 April 2012

सरदारजीला कोणत्या दिवशी हसवायचंय?


तुम्हाला सरदारजीला कोणत्या दिवशी हसवायचंय?

कधी?

रविवारी?

मग एक काम करा...

त्याला

सोमवारी एखादा विनोद सांगा, या माझ्या वेबसाईटवरचा...

27 April 2012

भूत उतरवा...मारवाडी स्टाइलने


एक दिवस मारवाड्याच्या मुलाच्या अंगात भूत शिरतं.

मारवाडयाप्रमाणेच त्याच्या मुलगा.

मग दोन दिवसांनी ते भूत एका मांत्रिकाकडे जातं
आणि
हातापाया पडत म्हणतं, “अहो मांत्रिकबाबा, मला ह्या कंजूस मारवाड्याच्या शरीरातून लवकर बाहेर काढा नाहीतर मी उपाशी राहून राहून मरून जाईल हो.”

कुत्र्याला दिली शिक्षा...


बंड्या : पप्पा, पप्पा, आपल्या मोत्याने माझ्या वहीची पानं फाडून टाकली.

पप्पा : थांब चांगलीच अद्दल घडवतो त्याला.

बंड्या : जाउद्या, मी त्याला आत्ताच चांगली शिक्षा दिलीय.

पप्पा : काय रे काय केलंस?

बंड्या : मी त्याला वाटीत दूध ठेवलं आणि त्याने थोडंस पितो न पितो तोच मी वाटी घेऊन त्यातलं दूध पिऊन टाकलं.

26 April 2012

छत्रीला भोक कशासाठी?


सरदार बाजारात जातो आणि छत्रीवाल्याकडुन २०० रुपयांना एक नवीन छत्री विकत घेतो.

तो छत्रीवाल्याकडून टोकदार दाभण घेऊन लगेच तिला एक बर्‍यापैकी मोठ्ठं भोक पाडतो.

छत्रीवाला गोंधळून जातो. तो सरदारजीला असं करण्याचं कारण विचारतो.

सरदारजी : अबे मूर्ख माणसा, पाऊस पडायचा थांबलाय हे कळायला नको? पाऊस थांबूनसुद्धा छत्री उघडून रस्त्याने चाललास तर लोक तुला मुर्खात नाही का काढणार?

हरवलेली चप्पल शोधायचीय?


एकदा एक सरदार गुरुद्वारात पाया पडून आपल्या एका मित्राबरोबर मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी जातो.

दर्शन घेऊन बाहेर येतो आणि बघतो तर काय?

त्याची चप्पल चोरीला गेलेली असते.
सरदार रागाने लालबुंद होऊन थेट स्मशानात जाऊन बसतो.

सरदारचा मित्र : जाऊ दे यार. एवढं मनाला कशाला लावून घेतो. नवी चप्पल घेऊन टाक. नाहीतरी ती चप्पल काय तू मेल्यावर वर घेऊन जाणार होतास काय?

सरदार : नाही ना. म्हणूनच तर इथे आलोय. त्या चप्पलचोराचा इथं स्मशानात नंबर लागेलंच की. जाऊन जाऊन कुठे जाईल तो. त्याचीच वाट बघत बसलोय.

25 April 2012

जड खिसा...


सरदार एक दिवस एक दगड खिशात घालून चाललेला असतो.

त्याचा मित्र विचारतो, “हा काय मूर्खपणाय? खिशात दगड घेऊन का हिंडतोयस?”

सरदार : अरे मूर्खा, तुला माहीत नाही का? आजकाल ज्याचा खिसा जड असतो, त्याचीच चलती असते.

21 April 2012

न थकण्याचं रहस्य…


हॉस्टलवर एक मुलगा कधीही बघावं तेव्हा अतिशय उत्साहात असतो. चेहर्‍यावर कधीच थकल्याचे भाव नसायचे.

पण एक दिवस त्याचा एक मित्र झोपलेला पाहून विचारती, “काय रे, तू तर कधीच थकत नाहीस ना. मग आता कसा काय झोपलाय?

मुलगा : न थकण्याचं तेच तर रहस्य आहे...

19 April 2012

मुदत


सरदारजी एका भाड्याच्या खोलीत राहत असतो. त्याचं ३ महिन्यांपासून भाडं थकलेलं असतं.

मालक : हे बघा, मी तुम्हाला माझ्या खोलीचं भाडं देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देतो, नाहीतर मी तुमचं सामान बाहेर फेकून देईन.

सरदारजी : ठीक आहे. मग मला होळी, दिवाळी आणि ख्रिसमस हे तीन दिवस द्या.

अजून पण एकच प्याला...???


एक दारुड्या ICU त पडलेला असतो.

डॉक्टर येऊन त्याला तपासतात.

डॉक्टर : तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर ना?

दारुड्या : हो. खूपच दुखतंय ओ डॉक्टर.

डॉक्टर : बरं, बरं, तुम्ही देशी घेता का?

दारुड्या : (जरा विचार करून) हो हो. पण एकच पेग द्या हं...जास्त नको.

18 April 2012

सरदारजीचा (आणि त्याच्या बुद्धीचाही) वेग....ssss....


एका सरदारजीचं लग्न असतं. त्याला वरातीत घोड्यावर बसवलं जातं.

सरदारजीचा एक मित्र त्याला कल्पना देतो की हा घोडा थोडा चक्रम आहे. त्याच्यावर शांतपणे बस. उधळला तर तो लांब पळून जाईल आणि मग आपल्यालाच त्याला पकडून आणावं लागेल. बॅंडवाल्यांनी आधीच तशी बोली करून घेतलीये.

सरदार : घाबरू नकोस. मी आणीन त्याला पकडून.
मित्र : हो पण कसं? तू ह्या घोड्याबरोबर पळूच शकत नाहीस.

सरदार : हो पण हा घोडा पळून पळून कितीही पळाला तरी माझ्यापुढे नाही जाऊ शकत.
मित्र : छ्या !!! कसं शक्य आहे?

सरदार : का नाही? मी जर ह्या घोड्यावरच बसून राहिलो तर का शक्य नाही.

17 April 2012

कंगाल नवरा


एक नवरा बायकोच्या खरेदीने अगदी कंगाल झालेला असतो.

तो वैतागून आपल्या बायकोला म्हणतो, “हे बघ, मी आता पुरता कंगाल झालेलो आहे. तू असं कर पोरांना त्यांच्या मामाच्या गावी पाठवून दे. तू तुझ्या आई-बापाकडं जाऊन रहा आणि माझा गरिबाचा विचार करू नकोस. मी माझ्या सासरी जाऊन राहीन.”

14 April 2012

वाचलो बाबा...


एक बेवडा फुल्ल टाईट होऊन रात्रीच्या वेळी रस्त्याने आरडा-ओरड करत हे पोस्टर वाच, ते पोस्टर वाच, रस्त्यावर दिसेल त्याला उपदेशाचे डोस पाज असं करत त्याच्यातच रमत गमत चालला होता.

तेवढ्यात त्याला एक पोस्टर दिसतं.

त्यावर लिहिलेलं असतं, If you drink every day, You will become Alcoholic.

बेवडा खुश होतो आणि म्हणतो, “वाचलो बाबा, मी तर फक्त रात्रीचीच पितो.”

13 April 2012

रामाला नाही रजनीकांतला???

रावण आणि रामाचं तूफान युद्ध चालू असतं.

तेवढ्यात रावणाला रामाच्या मागे एक व्यक्ती दिसते.

त्या व्यक्तीला बघून रावण रामाला म्हणतो, “बाय बाय. नंतर भेटू.”

रावण तिथून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात असतो.

लक्ष्मण रावणाला विचारतो, “काय रे भित्र्या, घाबरलास काय? लढ की आमच्याशी.”

रावण : काय राव, एवढ्याश्या गोष्टीसाठी रजनीकांतला बोलवायची गरज होती का?

12 April 2012

कॉलेजची परीक्षा


दोन मित्र परीक्षा संपवून परीक्षा हॉलमधून बाहेर येत असतात.

पहिला : काय मग? आजचा पेपर कसा गेला?

दूसरा : अं...पण आजचा पेपर कोणता होता?

पहिला : मला वाटतंय की तो गणिताचाच पेपर होता. कारण, तो माझ्या समोरचा जोश्या कॅल्क्युलेटरवर काहीतरी बटणं दाबीत होता.

मृत्यूदर


शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?

बंड्या : १०० टक्के.

शिक्षक : कसं काय?

बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना.

जरा शहाणे व्हा...

बंड्या : पप्पा, पप्पा, कार बनवायला काय काय लागतं?

पप्पा : (वैतागून) बंड्या, मी तुझ्या सारख्या सारख्या प्रश्न विचारण्याने हैराण झालोय. तुला माहिती आहे का, जर हाच प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारला असता तर काय झालं असतं?

बंड्या : हो माहितीये. किमान म्हणून तरी तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं देता आली असती.

11 April 2012

सावधान...!!!


नवरा : आज मी माझ्या एका मित्राला जेवणासाठी आपल्या घरी बोलावलं आहे.

बायको : बरं, पण मला मग अजून बाजारात जाऊन भाजी आणावी लागेल...आणि सगळ्या घरभर नुसता पसारा झालाय त्याचं काय?

नवरा : तो असू दे तसाच. त्याला काय होतंय?

बायको : काय मेली घरभर घाण अन म्हणे त्याला काय होतंय?

नवरा : तसं नाही...तो माझा मित्र आहे ना त्याने लग्न करायचं मनावर घेतलंय म्हणून.

सावधान...!!!

नवरा : आज मी माझ्या एका मित्राला जेवणासाठी आपल्या घरी बोलावलं आहे.

बायको : बरं, पण मला मग अजून बाजारात जाऊन भाजी आणावी लागेल...आणि सगळ्या घरभर नुसता पसारा झालाय त्याचं काय?

नवरा : तो असू दे तसाच. त्याला काय होतंय?

बायको : काय मेली घरभर घाण अन म्हणे त्याला काय होतंय?
नवरा : तसं नाही...तो माझा मित्र आहे ना त्याने लग्न करायचं फारंच मनावर घेतलंय म्हणून.

शहाणा बायको

एक कुटुंब संध्याकाळी हॉलमध्ये जेवायला बसतं.

नवरा हात धुवायला किचनमध्ये जातो.

तेवढ्यात बायको हॉलमधून आवाज देते.

“अहो, येताना जरा मिठाची बरणी घेऊन या बरं.”

नवरा संपूर्ण किचनमध्ये मिठाची बरणी शोधतो पण ती काही सापडत नाही.

मग बायको नवर्‍यावर ओरडते, “ओ sssss, या अन गप बसा जेवायला. मला माहीत होतं तुम्हाला नाही सापडणार म्हणून. म्हणूनच मी मिठाची बरणी अगोदरच आणून ठेवलीये.”

10 April 2012

रजनीकांत आणि एलियन

रजनीकांत आपल्या मुलीच्या लग्नात स्वत:च सनई वाजवू लागतो.

तेवढ्यात एक उडती तबकडी लग्नमंडपाजवळ येते.

त्यातून एक एलियन हात जोडून रजनीकांतकडे विनवणी करतो.
एलियन : हे रजनीकांत देवा, मी आपणाला विनंती करतो की उद्या माझ्या मुलाचा पेपर आहे त्यामुळे आपण सनई जरा हळू आवाजात वाजवावी.

जन्मदिवसाची भेट – हिर्‍यांची अंगठी


एक मित्र : अरे तू आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वहिनीला हिर्‍यांची अंगठी का देतोयस? तिने तर तुला कार मागितली होती ना?

दूसरा मित्र : हो ना. पण विचार कर, मी तिला खोटी कार कशी काय देऊ शकलो असतो.

09 April 2012

डोकेदुखी

बायको : काय हो? मी जेव्हा जेव्हा बेडरूममध्ये येते, तेव्हा तेव्हा तुम्ही चष्मा का घालता?

नवरा : त्याचं काय आहे, डॉक्टरांनी मला सल्ला दिलाय की जेव्हा डोकं दुखायला लागेल तेव्हा तेव्हा चष्मा वापरत जा.

पाणी पाजा हो...


एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो.
नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते.

रुग्ण : अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला.

नर्स : काय तहान लागली आहे का?

रुग्ण : (वैतागून) नाही...गळा लिकेज आहे का ते बघायचंय.

08 April 2012

सुंभ जळेल पण पीळ नाही जाणार...

नवरा आजारी असतो. बायको त्याला घेऊन दवाखान्यात जाते.

डॉक्टर नवर्‍याला पाहतात आणि बाहेर जाऊन बसायला सांगतात.

मग डॉक्टर बायकोला म्हणतात, “हे बघा, त्यांना चांगला आराम करू द्या. चांगलं खाऊ-पिऊ घाला. रोजच्या जेवणात भाजी-भाकरीसोबतच ४-२ केळी, ४-२ सफरचंद, १-२ उकडलेली अंडी, थोडा श्रीखंड, काजू-पिस्ता-बदाम वगैरे देत जा...आणि हो, त्यांच्याशी कमीत कमी बोला. त्यांना मन:शांतीची आवश्यकता आहे.”

बायको हे सगळं गप ऐकून घेते.

नवरा बायको घरी आल्यावर नवरा विचारतो, “डॉक्टर काय म्हणाले?

बायको : तुमच्या वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे.

एकतरी संधी आहे...

एक प्रसंग : बाजारात दोन विवाहित माणसांपैकी एकजण लॉटरीचं तिकीट घेत आहे आणि दूसरा बायकोशी भांडत आहे.

तर या दोघांमधला फरक सांगा.

.

.

.
हाच की लॉटरी घेणार्‍याला जिंकण्याची अजूनही एक संधी आहे.

07 April 2012

रजनीकांत आणि बुजगावणं?

एक शेतकरी आपल्या शेतात एक बुजगावणं उभं करतो.

त्या बुजगावण्याला तो रजनीकांतच्या फोटोचा चेहरा लावतो.

...आणि काय आश्चर्य?

सगळे पक्षी त्यांनी मागच्या वर्षी धान्याचा नेलेला एक एक दाणा आणून शेतात टाकू लागले.

06 April 2012

दिसतं तसं नसतं, म्हणूनच...

एक जोडपं घटस्फोट घेण्यासाठी वकिलाकडं जातं. वकील महाशय : (नवर्‍याला उद्देशून) तुम्हाला तुमच्या इतक्या सुंदर बायकोपासून घटस्फोट का हवाय?

नवरा : जरा माझ्या पायातल्या बुटांकडे पहा. सुंदर आहेत की नाही? पण ज्याने घातलेत पायात त्यालाच कळणार ना की ते पायाला किती त्रास देताहेत ते.

05 April 2012

दृष्टीकोन


एकदा एका भव्य चित्रकला स्पर्धेसाठी विख्यात चित्रकारांना राज्या-राज्यांतून आमंत्रित केलं जातं.

जिंकणार्‍या चित्रकाराला एक लाखाचं बक्षीस देण्यात येणार असतं.

एक गावचा शाळकरी पोरगा या स्पर्धेत भाग घेतो.

त्याची आधीची चित्रे पाहून स्पर्धेचे आयोजक त्याची टर उडवतात.

पण हा मुलगा अतिशय विनवणी करत असल्याने आयोजक त्याला लगेच तिथेच एक चित्र काढायला सांगतात. हे चित्र बघून काय तो निर्णय घेण्यात येईल म्हणूनही सांगतात.

मुलगा काय ते ओळखून घेतो.

मग त्यालाही ह्याची फिरकी घ्यायची लहर येते.

तो एक गोल काढून त्यात एक बिंदु काढतो.

आयोजक : अरे हट... हे काय चित्र आहे का? ह्या चित्राचा अर्थ काय?

मुलगा : हा माझा Point of View (म्हणजे दृष्टीकोन) आहे.

सुखी आयुष्याचा मंत्र...छू मंतर...


तुम्ही फारच वैतागलेले आहात का?

रोज सकाळी उशिरा उठता म्हणून आई-वडिलांची बोलणी खावी लागतात का?

प्रवासातपण कुणी अतिशहाणे भेटतात का?
ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसची कटकट असते का?

सुट्टीच्या दिवशी लांबचे नातेवाईक उगाचच काहीतरी कामानिमित्त तुमच्या घरी येऊन तुम्हाला कामाला लावून जातात का?

ठीक आहे..
मग या सर्वांतून कसे सुटाल?

एकच काम करा...लग्न करा.

म्हणजे तुम्हाला तुमच्या या सगळ्या समस्या अगदीच फालतू वाटतील आणि तुम्ही अतिशय आनंदाने त्यांना सामोरे जाल आणि आई-वडील, नातेवाईक, बॉस, इतर व्यक्तींशी अतिशय प्रेमाने वागताल.

03 April 2012

काम एवढुसं आणि मेहनत मात्र केवढी?

संताचा ट्रक रस्त्यात बंद पडलेला असतो.

संता जवळच्या गॅरेजमध्ये जातो आणि त्याचा ट्रक ओढून नेण्यासाठी दूसरा ट्रक घेऊन येतो.

त्याच्या ट्रकला तो जाड कासरा बांधून तो ह्या ट्रकला बांधून त्याचा ट्रक ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतो.

तेवढ्यात तिकडून बंता येतो.

संताचं हे थेर बघून तो पोट धरून जमिनीवर लोळून लोळून हसू लागतो.

चिडलेला संता त्याच्याकडे येऊन त्याला विचारतो, “काय रे काय झालं हसायला?

बंता : हा हा हा हा...एवढीशी दोरी ओढून न्यायला दोन दोन ट्रक...हा हा हा हा !!!

राष्ट्राचा सारीपाट


सरकार आणि सरदार यांच्यात काय फरक आहे? सांगा पाहू...
सरकार हे चालवावे लागते,
तर सरदार कायम चालूच असतो.
आता,
जर सरदार सरकार चालवू लागला तर???

सरदारला वाटेल की तोच सरकार चालवत आहे, पण प्रत्यक्षात दुसराच कुणीतरी ते चालवत असेल...

02 April 2012

महात्मा गांधींचं स्वप्न...आणि सत्य.


एक दिवस महात्मा गांधी सोनिया गांधींच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, “मी मरताना कॉंग्रेसला नम्रपणा, ईमानदारी, टोपी, चष्मा आणि माझी काठी दिली होती. कुठे आहे ते सगळं?

सोनिया गांधी :sss sss ब...टोपी तर राहुल लोकांना घालतोय, नम्रपणा मी स्वत:कडे ठेवलाय, चष्मा मनमोहनसिंगांना दिलाय, ईमानदारी स्विस बँकेत सुरक्षित आहे आणि आपली काठी “आम आदमी”च्या सेवेत २४ x ७ कार्यरत आहे.

मला शिकायचंय मास्तर...


बंड्या : मास्तर, मला संस्कृत शिकवा.
मास्तर : का रे, आपल्या शाळेत संस्कृत हा विषयच नसताना तुला संस्कृत शिकावसं का वाटतंय?
बंड्या : कारण ती देवांची भाषा आहे आणि मला स्वर्गात गेल्यावर ती फार उपयोगी पडेल म्हणून.
मास्तर : ए गुंडाड माणसा, तुला कशावरून वाटतंय तुला स्वर्ग मिळेल म्हणून? ठीक आहे असू दे, पण समजा नरक मिळाला तर?
बंड्या : ssss य मास्तर, त्याची काय पण काळजी नाय आपल्याला. शिव्या देण्यात आपण डिग्री मिळवलेली हाय.

01 April 2012

प्रश्नाचं उत्तर दे बंड्या...


गुरुजी : बंड्या, सांग बरं A, B, C, D मध्ये किती अक्षरे असतात?

बंड्या : ४

गुरुजी : अरे मूर्खा, मी फक्त A, B, C, आणि D ही चारच अक्षरं नाही विचारली. नीट सांग.

बंड्या : (थोडा विचार करून) ५२.

गुरुजी : आं...कसं काय?

बंड्या : मोठी २६ (Capital) आणि लहान २६ (Small) अक्षरे.

मस्तीखोर उंदीर


एक हत्ती हुक्का ओढत बसलेला असतो.

तेवढ्यात एक उंदीर त्याच्याजवळ येतो.

उंदीर : महाराज, आपल्याला असं व्यसनी होणं शोभतं का? टाकून द्या तो हुक्का अन चला माझ्याबरोबर मी तुम्हाला दाखवतो आपलं जंगल किती सुंदर आहे ते?

हत्ती काही न बोलता त्याच्याबरोबर चालू लागतो. बर्‍यापैकी जंगल फिरून झाल्यावर ते सिंहाच्या गुहेजवळ येतात.

सिंह पण आरामात सिगारेट फुंकत बसलेला असतो. तोसुद्धा सिंहाला असंच सांगून त्याच्याबरोबर यायला सांगतो.

सिंह आपल्या तोंडातली सिगारेट खाली टाकतो आणि पायाखाली विझवतो. उंदराजवळ जाऊन त्याच्या दोन मुस्कटात लगावतो.

हत्ती : महाराज कशाला मारता या बिचार्‍याला?
सिंह : मागच्या वेळेस मला ह्याने असंच काही-बाही सांगून दोन तास जंगलात फिरवलं.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...