Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label डॉक्टर. Show all posts
Showing posts with label डॉक्टर. Show all posts

26 August 2015

कुणाला चरबी आलीय रे...

एकदा यमलोकात यमदेव निवांत बसले होते.

तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज झाला.

यमदेवांनी दार उघडलं तर एक मनुष्य समोर उभा होता. पण क्षणात तो गायब झाला.

यमदेवांनी दार लावलं आणि पुन्हा निद्रिस्त झाले.

पुन्हा त्यांनी दार उघडलं आणि पुन्हा तो मनुष्य समोर उभा. पण पुन्हा तो क्षणात गायब झाला.

असं ३-४ वेळा घडलं.

मग यमदेव वैतागले आणि तो दिसताच त्यावर जोरात ओरडले, “काय रे, लय चरबी आली का तुला? माझ्याशी पंगा घेतोस?”


मनुष्य : नाही देवा. मी तर पृथ्वीवर वेंटिलेटरवर आहे. ते नालायक डॉक्टर तुमची चेष्टा करतायत.


05 July 2015

डोकेदुखी


एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात.

डॉक्टर : काय म्हणताय? डोकेदुखी कशी आहे आता?


माणूस : माहेरी गेलीय.


29 April 2013

योग्यवेळी योग्य माणूस भेटतो तेव्हा



रुग्ण : डॉक्टरसाहेब, मी खूप आजारी आहे हो. इतका की मला आता मरायचं आहे डॉक्टरसाहेब.

डॉक्टर : काही काळजी करू नका. तुम्ही योग्य ठिकाणी आलात.


19 April 2012

अजून पण एकच प्याला...???


एक दारुड्या ICU त पडलेला असतो.

डॉक्टर येऊन त्याला तपासतात.

डॉक्टर : तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर ना?

दारुड्या : हो. खूपच दुखतंय ओ डॉक्टर.

डॉक्टर : बरं, बरं, तुम्ही देशी घेता का?

दारुड्या : (जरा विचार करून) हो हो. पण एकच पेग द्या हं...जास्त नको.

09 April 2012

पाणी पाजा हो...


एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो.
नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते.

रुग्ण : अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला.

नर्स : काय तहान लागली आहे का?

रुग्ण : (वैतागून) नाही...गळा लिकेज आहे का ते बघायचंय.

21 September 2011

फायद्याचं बोला!

रुग्ण : डॉक्टर, मी गेले १५ दिवस झाले रोज ५० रुपयांचं औषध घेतो आहे. पण अजून तरी मला काहीच फायदा झाला नाही.

डॉक्टर : ठीक आहे. मग मी आजपासून ३० रुपयांचं औषध देतो. मग तुम्हाला रोज २० रूपयांचा फायदा होईल.

28 July 2011

मुलाचं भविष्य





शिक्षक : (पालकांना) तुमचा मुलगा मोठा झाल्यावर डॉक्टर होणार असं दिसतंय.

पालक : कशावरून?

शिक्षक : त्याच्या हस्ताक्षरावरून.

21 July 2011

वा रे डॉक्टर...

रुग्ण : डॉक्टर, मला सर्दी झाली आहे. काहीतरी औषध द्या.

डॉक्टर : एक काम करा, घरी जा. थंड पाण्याने आंघोळ करा आणि अंग न पुसताच झोपी जा.

रुग्ण : अहो, तसं केलं तर न्यूमोनिया होईल ना मला.

डॉक्टर : हो. मी तेच तर सांगतोय तुम्हाला. मला न्यूमोनियावर औषध माहीत आहे, सर्दीवर नाही; म्हणूनच तर.



08 July 2011

हरी ओम, हरी ओम !!!

भारतातून एक पंडित अमेरिकेत जातो.

तिथे त्याला हृदयविकाराचा झटका येतो.

नागरिक पटकन अम्ब्युलंस बोलावतात आणि त्याला त्यात घालतात.

पंडितजी मात्र देवावर श्रद्धा ठेवून ओरडू लागतात, "हरी ओम, हरी ओम !!!"

अम्ब्युलंसमधला कंपाऊंडर मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्यांच्या घरी घेऊन जातो.

पंडितजी : अरे मूर्खांनो, मला इथे हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेण्याचं सोडून घरी का आणलंत???

कंपाऊंडर : तुम्हीच तर ओरडत होतात, "Hurry Home, Hurry Home."



30 June 2011

जादुई चष्मा


एक आजोबा डॉक्टरकडे जातात. त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.

डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.

आजोबा : डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?

डॉक्टर : हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.

आजोबा : अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची. मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे...वा, वा, वा !!!

29 June 2011

झीरो फिगर


एक जाडजूड बाई आपलं वजन कमी व्हावं म्हणून दवाखान्यात येऊन म्हणते की तिला करीना कपूरसारखं झीरो फिगर व्हायचंय.

बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?

डॉक्टर : ५० वेळा.

बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?

डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.

30 May 2011

छोटा बच्चा समझ के...




एक डॉक्टर एका लहान मुलाच्या घरी जातात.

त्यांना त्या मुलाच्या पायाचे टाके काढायचे असतात.

त्यावेळी त्याचं लक्ष दुसरीकडे राहावं म्हणून झाडाकडे बोट दाखवून त्याला म्हणतात, “ती बघ तिकडे चिमणी.”

लहान मुलगा : ओ चिमणीचे मामा, खाली नीट बघा नाहीतर पाय कापाल माझा.

28 May 2011

वजन किती ???


डॉक्टर : तुमचं वजन किती?

रुग्ण : चष्मा धरून साठ किलो.

डॉक्टर : (विचारात पडतात आणि मग विचारतात) आणि चष्म्याशिवाय?

रुग्ण : दिसतच नाही हो.

23 May 2011

जीवनसत्व

एक खेडूत दवाखान्यात जातो आपल्या आजारी असलेल्या मुलाला घेऊन.

डॉक्टर त्याला तपासतात आणि एक सल्ला देतात.

डॉक्टर : याच्या शरीरात जीवनसत्वांची कमतरता आहे. असं करा मेडिकलमध्ये जा आणि “क” जीवनसत्व घ्या.
खेडूत मेडिकलमध्ये जातो. पण त्याला “क” जीवनसत्व लक्षात राहत नाही आणि इंग्रजीपण काही येत नसतं.

केमिस्ट : कोणतं देऊ? A,B,C, की D ???

खेडूत : कोणतंही द्या की. आमचं बाळया अजून शाळेत जात न्हाई. त्यामुळं त्याला इंग्रजी अक्षर समजत न्हाई बगा.

29 April 2011

डॉक्टर की चांभार?



एकाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते.

तो दवाखान्यात जातो.

व्यक्ती : डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?

डॉक्टर : हो येतात की. कशाला घालायचे आहेत?

व्यक्ती : ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.

21 April 2011

उपचारच करताय ना?

डॉक्टरांकडे एकजण येतो आणि आपला पाय दुखत असल्याचे सांगतो.

डॉक्टर त्याचा पाय बघतात तर तो निळा पडल्याच दिसतं.

डॉक्टर : अरे भाऊ, विष पसरलेलं दिसतंय. पाय कापावा लागेल.

डॉक्टर त्याचा पाय काढतात आणि त्याजागी नकली पाय लावतात.

त्या तरुणाचा नकली पायपण निळा पडतो. तो पुन्हा डॉक्टरांकडे जातो.

डॉक्टर पाय पाहतात आणि म्हणतात, "अरेच्चा, आता कुठे खरा आजार माझ्या लक्षात आला. तुझी जीन्स आहे ना, तिचा रंग जातो आहे."

13 April 2011

येडा की खुळा?



पेशंट : डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.

डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.

डॉक्टर : हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.

पेशंट : पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?


डॉक्टर :
(रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.

डॉक्टर की कारकून?



डॉक्टर एका पेशंटला तपासून झाल्यावर एक चिठ्ठी देतात, औषधं घेण्याकरिता.

पेशंट मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि औषधे मागतो. अनेक मेडिकल स्टोअर धुंडाळूनसुद्धा त्याला काही औषधं मिळत नाहीत.

शेवटी तो पुन्हा दवाखान्यात येतो.

पेशंट : डॉक्टर, तुम्ही लिहून दिलेली औषधं कुठेही मिळाली नाहीत.

डॉक्टर चिठ्ठी वाचतात आणि...


डॉक्टर : माफ करा हं. चुकून मी माझी केवळ सही असलेलीच चिठ्ठी तुम्हाला दिली. औषधं लिहायची राहिलीत
.

12 April 2011

शुद्धीवर आहात ना?



एकजण आपल्या पेशंटला घेऊन दवाखान्यात येतो.

पेशंट : अहो डॉक्टर, तुम्ही दिलेला चष्मा वापरतो आहे, तेव्हापासून मला प्रत्येक गोष्ट दोन दोन दिसत आहेत.


डॉक्टर : आधी मला सांगा
, तुम्ही चार चार लोकं मग माझ्याकडे का आलात?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...