Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label क्रूर. Show all posts
Showing posts with label क्रूर. Show all posts

27 March 2011

एक शोकांतिका...

त्सुनामीत बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून...

एक शोकांतिका...जिचा खरंतर विनोद बनवणे म्हणजे विनोदाची चेष्टा होईल.

पण त्या देवाने तरी का अशी क्रूर चेष्टा करावी मानवजातीची?

काय घडलं असेल त्या भयाण रात्री स्वर्गात? ते थोडंसं उपहासात्मकपणे...

यमराज : (आपल्या दूतास) जा, पान घेऊन ये.

यमदूत जातो आणि "जापान" घेऊन येतो.





04 October 2010

मेहनत की रोटी

विश्वासराव : खूप मार लागलेला दिसतोय तुम्हाला. नेमकं सांगा तरी काय झालं?

अशोकराव : काय सांगू, रात्री चोरट्यांनी अडवल.

विश्वासराव : अहो, मग देऊन टाकायचं ना मग सगळं काही. कशाला उगीच मार खाल्ला?

अशोकराव : अहो, मी म्हणालो, माझ्याकडचं सगळं घ्या. मी दागिने, पैसे, चेन, घड्याळ, अंगठी आणि अगदी चष्मासुद्धा काढून दिला हो.

विश्वासराव : आणि तरी मग तुम्हाला कसं काय मारलं?

अशोकराव : अहो, नाही नाही म्हणत असतानाही चोर म्हणतात कसे, "हम मेहनत की रोटी खाते है, फुक्कट की नही."

01 October 2010

मित्राचा खून


न्यायाधीश : का रे, तु तुझ्या मित्राचा खून दगडाने ठेचून ठेचून का केलास?

आरोपी : सायब, आमी गरीब माणसं ! आमच्याकडं रायफल, बंदूक कशी असणार? दगड फुकटात मिळत्यात. म्हणूनशान मी त्याला ठेचूनच मारला बगा.

28 September 2010

बैल


एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शिकार्‍याला बोलावण्यात आलं.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करून टाकतो. मला गाईचं कातड आणून द्या, ते पांघरूण मी जंगलात जातो. गाय आहे असं समजून वाघ धावत येईल, मग मी त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला. त्याच्या अंगावरचं कातड फाटल होतं.
गावकरी : मारला ? वाघ मारला....?
शिकारी : वाघ राहुद्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...