Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

28 July 2015

मुर्खांची जनगणना


मुर्खांची जनगणना कशी केली जाते माहितीये?

विदेशी कंपन्यांना कंत्राट दिले जाते.

मग त्या कंपन्या फेसबुकसारख्या ठिकाणी एक app किंवा post टाकतात.

की,

“या post मध्ये १ लिहा आणि जादू पहा.”
.
.
.

तुम्ही कधी असे १,, वगैरे लिहिले आहे का?

असेल तर ही post like करा पटकन.


26 July 2015

बायकोची व्यापम (मोठ्ठी) धमकी !!!



बहुचर्चित “व्यापम” घोटाळ्यात जी साक्षीदारांची एकामागून एक संशयास्पदरित्या हत्या होतेय, त्याच्या पार्श्वभूमीवर...

एकदा नवरा-बायकोची तूफान भांडणं होतात.

बायको नवर्‍याला धमकीच देऊन टाकते.


बायको : तुम्ही लिमिटमध्ये रहा, नाहीतर फेसबूकवर माझं status update करीन की माझ्या नवर्‍याला "व्यापम घोटाळ्याची" पूर्ण माहिती आहे म्हणून.


आरं बेटा हुशारी दाखव !!!

शाळेत शिक्षिका बंड्याला प्रश्न विचारतात.

शिक्षिका : सांग बरं, छोटीशी मधमाशी आपल्याला काय देते बरं?

बंड्या : मध.

शिक्षिका : बरोब्बर. सडपातळ दिसणारी बकरी?

बंड्या : दूध.

शिक्षिका : बरोब्बर. आणि मोठी म्हैस?


बंड्या : घरचा अभ्यास.

बिचारा बंड्या...



Be Careful...

दोन नवर्‍यांमधला हा संवाद.

पहिला : अरे, परवा माझी बायको विहिरीत पडली.

दूसरा : मग आता कशी आहे तिची तब्येत?


पहिला : काय सांगू, पडली तेव्हा खूप लागलं तिला, खूप ओरडत होती. पण कालपासून एकदम शांत आहे. विहीरीतून बिलकुल आवाज नाही आला.


एलिअन पुण्यात

एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवरएक अवकाश यान येते..

आकाशातून मोठी लाईट मारुन एलिअन घोषणा करतात..

" आजपासून पुणे आमच्या ताब्यात 
आहे..!! "
.
.
. .
.
.
.
खालून कुलकर्णी काकू: ते काही असू दे... पण गाडी गेट समोर लावायची नाही.


                                                                        ...फेसबूकवरुन साभार


आजीपण लय भारी

गणिताच्या तासाला फेसबुक ओपन केलं....!

मास्तरनी कमेंट केली - वर्गाच्या बाहेर जा..

मुख्याध्यापकानी मास्तरची कमेंट लाईक केली...

मम्मीनी कमेंट केली - कॉलेजला गेला नसशील तर भाजी घेऊन ये..

पप्पानी कमेंट केली - तुझ्या लाडाचे परिणाम...

गर्ल फ्रेँडनी कमेंट केली – धोकेबाज मला बोलला आजी सिरीयस आहे म्हणुन दवाखान्यात आहे...

आजीने कमेंट केली.............
.
.

.
मुडदा बसवला तुझा, घरी ये नालायका, मी अजुन जिवंत आहे.




                                                            
...फेसबूकवरुन साभार


मस्ती

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.

गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...

....
का?






अंगात मस्ती , दुसरं काय ?


14 July 2015

लग्न = बिजली

लग्न हे एखाद्या विजेच्या तारेसारखं असतं.

तार जुळली तर आयुष्यात उजाला,


नाहीतर आयुष्यभर झटके

05 July 2015

ग्रीस


ग्रीस दिवाळखोर देश म्हणून जाहीर झाला त्या पार्श्वभूमीवर...




डोकेदुखी


एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात.

डॉक्टर : काय म्हणताय? डोकेदुखी कशी आहे आता?


माणूस : माहेरी गेलीय.


बारीक केसांचा फायदा


एक माणूस केस कापायला व्हाव्याकडे जातो.

माणूस : केस एकदम बारीक कापा.

न्हावी : किती बारीक?


माणूस : बायकोच्या हातात येणार नाहीत एवढे बारीक.


विचित्र बायका


बायका किती विचित्र असतात नाही?

यांना देवदास मधला शाहरुख दारू पिल्यावर "रोमॅंटिक" वाटतो.

आणि तोच आपला नवरा पिऊन आला तर “बेवडा” वाटतो.


बाबाजी का ठुल्लू


एक १५० वर्षांचे आजोबा मृत्युनंतर स्वर्गात जातात.

तिथे सुंदर अप्सरांचे नृत्य पाहून अतिशय दु:खी होतात.

एक देव त्यांना विचारतो,का हो आजोबा, तुम्ही तर स्वर्गात आलात. तरीपण दु:खी का?


आजोबा : काय सांगू, पृथ्वीतलावर त्या बाबा रामदेवच्या नादी लागलो नसतो तर कधीचा इथे आलो असतो.


आजारपण


रुग्ण : डॉक्टरसाहेब, या असल्या आजारपणापेक्षा मरण आलेलं चांगलं बघा.


डॉक्टर : काळजी करू नका. आम्ही आमच्यापरीने प्रयत्न तर करतोच आहोत.


शहीद



जावई वयाने सगळ्यात लहान असला तरी त्याला सासरचे लोक अहो-जाहो करून बोलवतात.

कारण, आपल्या देशात शहिदांचे नाव सन्मानाने घेण्याची परंपरा आहे.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...