Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

07 October 2014

एक विशेष सूचना

कृपया “lifebuoy” ने आंघोळ करू नका.

कारण,

मी असं ऐकलंय की त्याने “किडे” मरतात.

आणि,


मला तुम्हाला गमवायचं नाहीये.


15 August 2014

वंदे मातरम


!!! भारत माता की जय !!!




सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


03 August 2014

धोका

हॉस्टलमध्ये राहणार्‍या दोन विद्यार्थ्यांमधील हा संवाद.

पहिला विद्यार्थी : अरे माझ्यासोबत फार मोठा धोका झाला.

दूसरा विद्यार्थी : का रे, काय झालं?


पहिला : काय सांगू, पप्पांकडे पुस्तकांसाठी पैसे मागितले तर त्यांनी पुस्तकंचं पाठवून दिली.



मच्छराचं घर

एकदा दोन मच्छर उडत उडत जात होते.

तेवढ्यात वाटेत त्यांना एक टकला माणूस जाताना दिसतो.
एक मच्छर त्या माणसाच्या टकलावर जाऊन बसतो.

दूसरा मच्छर त्याचं कौतुक करतो.

तो म्हणतो, “वा. काय मस्त घर शोधलंय.”


पहिला मच्छर : घर कसलं? आताशी प्लॉट घेतलाय.



देवाला धमकी

एक बेवडा गटारीच्या दिवशी फुल्ल टाईट होऊन चालला होता.

हलत-डुलत चाललेला असताना जोरात पाऊस चालू होतो.

बेवडा चिखलात पाय घसरून पडतो आणि तेवढ्यात वीज चमकते.


बेवडा : (घाबरून) हे महादेवा, मी चिखलात पडलो तर तू माझा फोटो काढून घेतलास? खबरदार माझ्या बायकोला दाखवला तर? मी गणपतीला किडनॅप करीन. 


कृतज्ञ न्हावी

एकदा एक बौद्ध भिक्षू न्हाव्याकडे केस कापायला जातो.
न्हावी त्याचा चमन गोटा करून देतो. भिक्षू त्याला पैसे देतो परंतु न्हावी ते नाकारतो.
न्हावी म्हणतो, “तुम्ही सद्गृहस्थ आहात. तुम्ही देवाचे काम करता. मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही.”
दुसर्‍या दिवशी जेव्हा न्हावी दुकानात येतो, तेव्हा त्याला एक अनामिक व्यक्ती बौद्धांच्या धार्मिक ग्रंथांच्या २१ प्रती भेट म्हणून देऊन जातो.

मग न्हाव्याकडे एक पोलीस केस कापायला येतो आणि केस कापून झाल्यावर “तुम्ही जनतेला संरक्षण देता असे म्हणून पोलिसाने देऊ केलेले पैसे नाकारतो.”
दुसर्‍या दिवशी जेव्हा न्हावी दुकानात येतो, तेव्हा त्याला एक अनामिक व्यक्ती मिठाई आणि खमंग जेवणाची थाळी देऊन जाते.

मग न्हाव्याकडे एक वकील केस कापायला येतो. केस कापून झाल्यावर “तुम्ही न्यायदानाचे पुण्यवान काम करता तेव्हा मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही असे म्हणून वकिलाने देऊ केलेले पैसे नाकारतो.”


दुसर्‍या दिवशी तो वकील आपल्या कोर्टातल्या सगळ्या वकिलांना केस कापायला घेऊन जातो.



मित्राला बंडूची मदत

मास्तर : मोरया, तू काल शाळेला का आला नाहीस?

मोरया : मास्तर, मी काल रात्री स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो.

मास्तर : काय कार्टं आहे, स्वप्नात अमेरिकेला गेलं म्हणून शाळा बुडवली. तुला ना चांगला बडवायला पाहिजे.

(मग बंडूकडे बघत) बंडू, तू का बरं आला नाहीस काल?


बंडू : मास्तर, मी मोरयाला विमानतळावर सोडवायला गेलो होतो.

02 August 2014

निशाणा...तुला दिसला ना

एक खगोलशास्रज्ञ आकाशाकडे दुर्बिण लावून बसला होता.

संता तिथून जात असताना त्याला हे दृश्य दिसलं.

तेवढ्यात आकाशातून एक उल्का दूर डोंगरावर पडताना दिसते.


संता : वा, वा. काय अचूक नेम आहे तुमचा.



28 July 2014

खतरनाक प्रयोग

प्रयोगाचे नाव : आपल्यावर खरे प्रेम कुणाचे याचा शोध घेणे.

साहित्य : घड्याळ, दोन खोल्या, स्वत:चा कुत्रा व स्वत:ची बायको

कृती :
१.     कुत्र्याला एका खोलीत सोडून बाहेरून दार लावून घ्यावं.
२.     तत्क्षणी, बायकोलाही दुसर्‍या खोलीत सोडून बाहेरून दार लावावं.
३.     लगेचच घड्याळात वेळ पाहून तिची नोंद करून ठेवावी.
४.     किमान दोन तासांनी पहिल्यांदा कुत्रा असलेल्या बंद खोलीचा दरवाजा उघडावा आणि कुत्र्याचे तुमच्याप्रती असलेले निरीक्षण वहीत नोंदवावे.
५.     आता बायको असलेल्या खोलीचा दरवाजा उघडावा आणि बायकोचे तुमच्याप्रती असलेले निरीक्षण वहीत नोंदवावे.
६.     खालीलपैकी योग्य ते निरीक्षण नोंदवा.

निरीक्षण :
                    १.  कुत्रा/बायको चावला/ली.
                     २. कुत्रा पळाला/बायकोने घटस्फोट दिला.
३                   कुत्र्या/बायकोने धुडगूस घातला.


(कृपया, हा प्रयोग करताना योग्य ती काळजी घ्यावी. आपल्यास भयंकर शारीरिक आणि मानसिक इजा होऊ शकते. आणि हो, आम्ही यास कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.)


आदर व्यक्त करण्याची पद्धत


जुनी पिढी मोठ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी

डोक्यावर टोपी असेल तर ती काढायचे

आणि आताची पिढी कानातला हेडफोन काढते.

साक्षर की निरक्षर?


एक माणूस दुकानात जातो आणि दुकानदाराला एका वस्तूकडे बोट दाखवून विचारतो, “हा फ्रीज केवढ्याला?
दुकानदार : आम्ही निरक्षर लोकांना वस्तू विकत नाही.

मग तो माणूस घरी जातो आणि दुसर्‍या दिवशी केस कापून, दाढी करून आणि मस्त पावडर लावून दुकानात जातो. पुन्हा दुकानदाराला तोच प्रश्न विचारतो.

पण दुकानदार पुन्हा तेच उत्तर देतो.

पुन्हा तो माणूस घरी जातो, नवीन कपडे घालतो आणि परत येतो. पुन्हा दुकानदाराला विचारतो, “हा फ्रीज केवढ्याला?
तरी पण दुकानदार तेच उत्तर देतो.

मग तो माणूस वैतागून दुकानदाराची गचांडी धरतो आणि म्हणतो, “काय रे भामटया? नीट सांगतो का कच्चा खाऊन टाकू?


दुकानदार गयावया करत म्हणतो, “अहो साहेब, तो फ्रीज नाही, वाशिंग मशीन आहे.”

घंटा माहितीये?

एक अमेरिकन आपला देश बघायला येतो आणि एका खेड्यातील एका मजुराच्या घरी राहतो.

तो त्या मजुराला विचारतो, “तुम्हाला काही प्रश्न विचारू का?
मजूर : हो, विचारा की.

अमेरिकन : तुम्हाला अणुउर्जेबद्दल काय वाटतं?
मजूर : ते काय असतं?

अमेरिकन : तुम्ही अशिक्षित दिसता. असोत.
मजूर : बरं साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का?

अमेरिकन : हो, हो. विचारा ना.
मजूर : हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही मंदिरांमध्ये घंटा असते. तर, ख्रिश्चन मंदिरातील घंटा ही हिंदूंच्या मंदिरातील घंटेपेक्षा मोठी का असते?

अमेरिकन : अं, माहीत ना.

मजूर : मला माहीतच होतं की तुम्ही जरी अणुऊर्जेच्या बाता मारत असला तरी तुम्हाला काय घंटापण माहीत नसणार.

20 July 2014

जरूर वाचा : The Fact...?

एकदा एक मुलाखतकार उमेदवाराला प्रश्न विचारतो.

मुलाखतकार : तुम्ही तुमचा आधीचा जॉब का सोडला?


उमेदवार : त्या कंपनीने इथलं ऑफिस बंद केलं आणि दुसरीकडे गेली. पण मला सांगितलंच नाही कुठे ते.


जाहिरातीचे तंत्र


एकदा एका इमारतीत दोन रेस्टोरंट होती.

एकाने आपल्या हॉटेलबाहेर बोर्ड लावला, “या शहरातील सर्वोत्तम हॉटेल.”
हे पाहून दुसर्‍याने बोर्ड लावला, “महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल.”

मग पहिल्याने बोर्ड बदलला, “या देशातील सर्वोत्तम हॉटेल.”
मग दुसर्‍यानेही बोर्ड बदलला, “जगातील सर्वोत्तम हॉटेल.”


मग मात्र पहिल्याचा पारा चढला आणि त्याने बोर्ड लावला, “या इमारतीतील सर्वोत्तम हॉटेल.”


हुशार कामगार


एकदा दोन कामगार कामाच्या प्रचंड ताणामुळे वैतागलेले असतात.
एकजण दुसर्‍याला म्हणतो, “हुश्श, खूप थकलोय. हा मॅनेजर काही सरळ सरळ मागून एक दिवसाची सुट्टी देईल असं वाटत नाही. बघ मी आता काय करतो ते.”

असं म्हणून तो डोकं खाली अन पाय वर अशारीतीने पंख्याच्या हुकला लटकतो.
हे मॅनेजर पाहतो आणि त्याला म्हणतो, “हे काय रे? काय चाललंय हे?

कामगार : साहेब मी बल्ब झालोय.
मॅनेजर : जास्त काम करून तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. असं कर, आजच्या दिवस सुट्टी घे.

मग हा कामगार त्या मॅनेजरला धन्यवाद देऊन दुसर्‍या कामगाराकडे बघून स्मितहास्य करत निघून जातो.
पण दूसरा कामगारही काही कमी नसतो.

तो पण ह्या पहिल्या कामगाराच्या मागे मागे चालायला लागतो.
हे पाहून मॅनेजर त्याला विचारतो, “तुला सुट्टी दिलेली नाहीये. तू कुठे चाललास?


दूसरा कामगार : साहेब, मी अंधारात काम नाही करू शकत.

खोटं बोल, पण रेटून बोल


एकदा वर्ग भरायच्या अगोदर दोन विद्यार्थी आपापसांत भांडत होते.
तेवढ्यात शिक्षिका वर्गात येतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही का भांडत आहात?

विद्यार्थी : आम्हाला १ हजार रुपयांची नोट सापडली आणि जो सर्वात मोठ्ठं खोटं बोलेल त्यालाच ती मिळेल असं ठरवलंय. 

पण मी मोठ्ठं खोटं बोललो असल्याने ती मलाच मिळायला हवी.

शिक्षिका : काय रे नालायक कार्टी आहेत. अरे लाजा वाटतात का तुम्हाला यासाठी भांडायला? अरे, मी तुमच्या वयाची होते ना, तेव्हा खोटं बोलणं काय असतं हेसुद्धा माहीत नव्हतं मला.


दोन्ही विद्यार्थी एकमेकांकडे पाहतात आणि ती १ हजारांची नोट बाईंना देतात.

व्याकरणाचा अभ्यास : काळ ओळखा


एक गृहिणी आपल्या मुलांचा अभ्यास घेत असते.

ती आपल्या मुलाला व्याकरणातला एक प्रश्न विचारते, “सांग बरं, मी सुंदर आहे; या वाक्याचा काळ कोणता?


बाजूला बसलेला नवरा पटकन म्हणतो, “अर्थातच, भूतकाळ.”


देवा तुला शोधू कुठं...?

एक इंजिनियरिंगचा विद्यार्थी देवाचे असे आभार मानतो.


ए देवा, सर्वेश्वरा, या वाढणार्‍या महागाईच्या जमान्यात एक लिटर पेट्रोल ६० वरून ८० रुपयांवर गेलं;

एक रुपया ४० वरून ६० वर-७० वर गेला;

सगळं काही महागलं;

पण तरीही आमचे पासिंगचे मार्क ४० वरंच ठेवल्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद.


शून्याचा शोध


तुम्हाला हे माहिती आहे का, की शून्याचा शोध कसा लागला?


" 0 "


मग मी सांगतो.

जेव्हा आर्यभट्टाने त्याच्या एका शिष्याचा पेपर चेक केला ना,

तेव्हा त्याला शून्याचा शोध लागला.


19 July 2014

फुकटचा सल्ला जपून द्या.

एक माणूस रस्त्याने चाललेल्या भिकार्‍याला थांबवत विचारतो, “का रे, भीक का मागतोस? ही खूप वाईट गोष्ट आहे.”

भिकारी : साहेब, तुम्ही कधी भीक मागितली आहे का?

माणूस : नाही. का?


भिकारी : मग तुम्हाला कसं माहीत की ही वाईट गोष्ट आहे ते?

16 July 2014

सपनो की रानी?

बायको : मी तुमच्या स्वप्नात येते का हो?

नवरा : नाही.

बायको : का?


नवरा : मी झोपताना हनुमान चालीसा वाचून झोपतो.

15 July 2014

हॉकी टीमचा कोच कोण?


कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चनने स्पर्धकाला एक प्रश्न विचारला, “भारताच्या महिला हॉकी टीमचा कोच कोण?


स्पर्धकाने उत्तर दिले, “शाहरुख खान.”

14 July 2014

OMG !!!


एक माणूस कुत्र्यांच्या दुकानात एक कुत्रा विकत घेण्यासाठी गेला.
ग्राहक : तुमचा कुत्रा चावतो का?

दुकानदार : नाही.

मग ग्राहक एका कुत्र्याच्या जवळ जाऊन त्याला गोंजारू लागतो, तर तो कुत्रा त्याला चावतो.

ग्राहक : विव्हळत...तुम्ही तर म्हणालात की तुमचा कुत्रा चावत नाही म्हणून.


दुकानदार : हो. पण तो माझा कुत्रा नाहीय.


08 July 2014

गोत्र


एकदा एका मुलाचं एका मुलीशी लग्न ठरतं.

त्यांचं एकमेकांशी बोलणं होतं. त्यावेळी मुलगी मुलाला म्हणते की तू नालायक आहेस.

अर्थातच, ते दोघं हे लग्न मोडायचं ठरवतात.

आई-वडील त्यांना कारण विचारतात.


तेव्हा मुलगा म्हणतो, “ती म्हणते की आपलं गोत्र एकच आहे.”

17 April 2014

केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणाची काही उदाहरणं

केजरीवाल एवढे प्रामाणिक आहेत, की...

1.  ते पेनड्राइव नेहमी safely remove करतात.
2.  त्यांना जर बॉम्ब सापडला तर, तो दहशतवाद्यांना परत करतात.
3. ते अगदी रिक्षावाल्याकडेसुद्धा पावतीची मागणी करतात.
4. त्यांनी आपल्या संगणकात अॅंटी-वायरस पण टाकला नाहीय. कारण, त्यांना सुरक्षेची गरज नाहीय.
5. जर त्यांनी रात्री पार्टी केली आणि १० वाजून त्यावर एक सेकंद जरी झाला तरी ते स्वत:हून पोलिसांना बोलावतात.
6.  त्यांनी त्यांच्या लग्नात म्हणे चक्क आपल्या पत्नीच्या भावाला आपले बूट चोरले म्हणून अटक करवली होती म्हणे.
7. ते मॅग्गी बनवण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतच नाहीत.
8. ते यू-ट्यूबवरील विडियो चक्क जाहिराती skip न करता पाहतात.
9.  ते कोलगेट चक्क त्यात मीठ आहे की नाही हे तपासूनच लावतात.
10. आजपर्यंत एकही बाईने त्यांना आपण जाड दिसतो का असे विचारलेले नाही.


02 April 2014

उधारी बंद


पुण्यातील एका दुकानदाराने असा बोर्ड लावला.


राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत उधारी बंद.

31 March 2014

!!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!




!!! सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!




गंभीर विनोद


लहानपणीची ती हरवलेली श्रीमंती आजही सापडत नाहीये.




त्यावेळी पाऊस पडला, की त्या पावसाच्या पाण्यात आमचीही जहाजे चालायची.


04 January 2014

टॅलेंट तर बघा...

एकदा तीन सरदार एकाच बेडवर झोपलेले असतात.

एका बेडवर अॅडजस्ट होत नसल्याने एक सरदार बेडवरून खाली पडतो.

राहिलेले दोन सरदार : , वर ये बेडवर. जागा झाली बघ.

सरदारजीला भेटला पठाण


एकदा सरदार आणि पठाण असलेले दोन मित्र रस्त्याने चाललेले असताना त्यांना पाचशे रुपयांची नोट सापडते.

ते दोघे खूप आनंदित होतात.

पठाण : असं करू आपण हे पैसे फिफ्टी-फिफ्टी (अर्धे अर्धे) घेऊ.


सरदार : ठीक आहे. पण मग राहिलेल्या चारशे रुपयांचं काय करायचं?

क्रूरकर्मा सरदारजी

एकदा एक पक्षी सरदारजीला फार सतावत होता.
सरदारजीने त्याला धरलं आणि त्याला क्रूरपणे मारायचं ठरवलं.

त्यासाठी तो एका शंभर मजली इमारतीच्या शंभराव्या मजल्यावर गेला.
अगदी वीज नव्हती तर लिफ्ट चालत नाही म्हणूनही तो त्या पक्षावर इतका चिडला होता की सरदार जिने चढून वर गेला.
मग त्याने पक्षाला खूप क्रूरपणे मारले.

कसे माहितीये?


त्याने त्या पक्षाला शंभराव्या मजल्यावरून खाली फेकून दिले, तेव्हा कुठे त्याचा राग शांत झाला.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...