Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label दिवाळी. Show all posts
Showing posts with label दिवाळी. Show all posts

14 November 2020

इको फ्रेंडली दिवाळी कशी करावी...??

इको फ्रेंडली दिवाळी कशी करावी...??

1. स्वयंपाकघरात उभे रहा.
2. आपल्या बायकोने बनवलेला फराळ फस्त करा. म्हणजे संपवा.
3. नंतर  म्हणा ... माझी आई तुझ्यापेक्षा छान फराळ बनवते.

...आणि फटाक्यांचा आनंद  घ्या.  😜😀🤣


12 November 2012

वा रे सरदारजी...

दिवाळीत सरदारजीने नवीन दुचाकी घेतली.
दिवाळी संपल्यावर सरदार रोज ऑफिसला येण्याजाण्यासाठी दुचाकी वापरू लागला.

एके दिवशी ऑफिस संपल्यावर सरदार आपली दुचाकी ढकलत ढकलत घरी जाऊ लागला.
हे पाहून ऑफिसमधल्या सहकार्‍याने सरदारला विचारले, “क्यु सरदार भाई? गाडी को धक्का मारते हुए क्यु जा रहे हो? क्या हुवा इसे?

सरदार : क्या करू? मै गाडी की चाबी घरपेही भूल आया.

सहकारी : तो आप सुबह गाडी लेके कैसे आए?

सरदार : कैसे मतलब? ऐसेही धक्का लगाते आया जी. 

28 October 2011

दिवाळी स्पेशल-दिवाळीचा बोनस

एक कामचुकार कामगार मालकाला दिवाळीचा बोनस पाहिजे म्हणून मागे लागलेला असतो.


मालक पुणेरी असतो.


मालक कामगाराला बोलावून घेतो आणि म्हणतो, "हे बघ, (तिरसटपणे) तू यावर्षी खूपच मन लावून आणि मेहनतीने काम केले आहेस, म्हणून मी तुला हा ५००० रूपयांचा धनादेश बोनस म्हणून देत आहे."


कामगार धनादेश घेतो आणि आनंदाने निरखून पाहतो. पाहत असताना त्याच्या लक्षात येतं की त्यावर साहेबांची स्वाक्षरी राहिलेली आहे.


कामगार : मालक, यावर तुमची सही राहिलीय.


मालक : अरे घोड्या राहिली नाहीय. तू जर असाच मेहनत करीत राहिलास तर पुढल्या वर्षी मी त्यावर सही करेन.

25 October 2011

दिवाळी स्पेशल-बेवडा


एक बेवडा ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुल्ल टाईट होऊन येतो.

बायको : काय हो, तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तरी पिणार नाही म्हणून वचन दिलं होतंत ना मला सकाळी?

वेबडा : हो, बरोबर आहे. पण मी तरी काय करणार? रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती ना.

03 October 2011

काहीतरी बनायचंय?


दर दिवाळीत घरोघरी मातीचे किल्ले बनवले जातात. अतिहौशी मुलं मग जो किल्ला बनवायचा तो प्रत्यक्षात पाहून येतात. मग जास्तीत जास्त प्रयत्न करतात की आपला किल्ला हुबेहूब कसा बनेल त्याचा.

अशीच ४-५ मुले एका किल्ल्यावर जातात. किल्ला पाहत असतानाच त्यांना पडक्या बुरूजाच्या एका दगडावर काहीतरी लिहिलेलं दिसलं.

जवळ जाऊन पाहिलं तर त्यावर लिहिलं होतं, "हा दगड फिरवून बघा. जादू घडेल आणि तुम्ही काहीतरी बनाल."

या मुलांना न राहवून त्यांनी महत्प्रयासाने तो मोठ्ठा दगड फिरवला.

तर त्याच्या मागे लिहिलं होतं, "बनलात की नाही मूर्ख?"

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...