Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

30 March 2011

प्रामाणिक बंडू बाळ




बंड्या : (आजीला) आजी, आजी, तुला अॅक्टिंग येते का गं?

आजी : नाही. पण का रे बाळा?

बंड्या : कारण सकाळी आई पप्पांना म्हणत होती की ही म्हातारी अजून काही दिवस इथे राहिली तर सगळा तमाशा होईल म्हणून.

29 March 2011

डॉक्टर की न्हावी?


एकदा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना एक विचित्र दृश्य दिसतं.

एक डॉक्टर एका रुग्णाच्या मागे धावत जात असतात.

तेवढ्यात एक रुग्ण डॉक्टरांना थांबवून विचारतो, “काय झालं हो डॉक्टर?

डॉक्टर : काय माणूस आहे हा. चार वेळा माझ्याकडे आला आणि म्हणाला माझ्या मेंदूची शस्रक्रिया करायची आहे म्हणून.

रुग्ण : मग?

डॉक्टर : मग काय मग? हा दरवेळेस येतो आणि डोक्याचे केस कापले की पळून जातो.

अरे हो, जरा दमानं !!!


एका दवाखान्यासमोर सकाळी १०:३० च्या सुमारास एक लांब रांग लागली होती.

त्या रांगेकडे बघत बघत एकजण पुढे जायचा मग पुढचे लोक त्याला ढकलून मागे पाठवायचे.

असं चार-पाच वेळा झालं.


शेवटी तो वैतागून म्हणाला
,तशीच झक मारत बसा तुम्ही सगळे. आज मी दवाखानाच उघडणार नाही.

27 March 2011

केसावर जाऊ नका




नागपूरकर : अहो काका, तुमचे केस किती दाट आहेत हो. जसं गवतच उगवलंय.



पुणेकर : तरीच मी विचार करतोय मघापासून, की माझ्याजवळ हे जनावर का उभं आहे?

एक शोकांतिका...

त्सुनामीत बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून...

एक शोकांतिका...जिचा खरंतर विनोद बनवणे म्हणजे विनोदाची चेष्टा होईल.

पण त्या देवाने तरी का अशी क्रूर चेष्टा करावी मानवजातीची?

काय घडलं असेल त्या भयाण रात्री स्वर्गात? ते थोडंसं उपहासात्मकपणे...

यमराज : (आपल्या दूतास) जा, पान घेऊन ये.

यमदूत जातो आणि "जापान" घेऊन येतो.





IPL मधील एक छान दृश्य

मान गये सरदारजी...

लाइट गेलेली असल्याने सरदारजी मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करतो.

जेवण झाल्यावर थोडा वेळ बसतो. त्याला सिगारेट पिण्याची तलफ होते.

तो मेणबत्ती उचलतो, आतल्या घरात जातो आणि माचिस शोधतो.

बराच वेळ शोधुनही माचिस काही सापडत नाही.

मग तो मेणबत्ती विझवून झोपी जातो.

26 March 2011

वयाची अट

गुरुजी शाळेत विद्यार्थ्यांना समजावून सांगतात की रोज वर्तमानपत्र वाचल्याने चालू घडामोडींची माहिती मिळते. या जगात कसं जगायचं ते कळतं.

बंड्या दुसर्‍याच दिवसापासून वर्तमानपत्र चालू करतो.
तिसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर...

बंड्या : गुरुजी, तुम्ही आम्हाला रोज रोज काहीही प्रश्न विचारता. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. बघू तुम्हाला उत्तर येतंय का?

गुरुजी : ठीक आहे, विचार.

बंड्या : सांगा पाहू, की सरकारने मतदान करता यावे म्हणून नागरिकाचे वय १८ वर्षे असल्याचा कायदा केला आहे. पण लग्नाचं वय मात्र २१ वर्षे केलेलं आहे. असं का?

गुरुजी : (जरा डोकं खाजवतात) कारण माणूस १८ वर्षांनी सज्ञान होतो म्हणून.

बंड्या : मग लग्नाचं वय पण १८ वर्षेच असायला पाहिजे ना?

गुरुजी : (जरा विचार करून) हो, हो, बरोबर आहे.

बंड्या : पण तसं नाही गुरुजी, जरा विचार करून सांगा.

गुरुजी : (डोक्यावरची टोपी काढून बोटांची वाढलेली पाचंही नखं पांढर्‍या केसांत घालून थोडा वेळ खाजवतात) हरलो बुवा. तूच सांग.

बंड्या : कारण, सरकारलाही माहीत आहे की कमी वयातही देश सांभाळणे हे बायको सांभाळण्यापेक्षा सोप्पं आहे.

25 March 2011

माणूसही गाढवच (English)

Equation 1

Human = eat + sleep + work + enjoy

> Donkey = eat + sleep
>
> Therefore:
> Human = Donkey + Work + enjoy
>
> Therefore:
> Human-enjoy = Donkey + Work
>
> In other words,
> A Human that doesn't know how to enjoy = Donkey that works.




Equation 2
 Man = eat + sleep + earn money

> Donkey = eat + sleep
>
> Therefore:
> Man = Donkey + earn money
>
> Therefore:
> Man - earn money = Donkey
>
> In other words
> Man who doesn't earn money = Donkey

Equation 3
Woman= eat + sleep + spend

> Donkey = eat + sleep
>
> Therefore:
> Woman = Donkey + spend
> Woman - spend = Donkey
>
> In other words,
> Woman who doesn't spend = Donkey


To Conclude:
From Equation 2 and Equation 3

> Man who doesn't earn money = Woman who doesn't spend
>
> So Man earns money not to let woman become a donkey!
> And a woman spends not to let the man become a donkey!
>
> So, We have:
> Man + Woman = Donkey + earn money + Donkey + Spend money
>
> Therefore from postulates 1 and 2, we can conclude
>
> Man + Woman = 2 Donkeys that live happily together
.

24 March 2011

बहिणीची माया




मल्लिका शेरावत एका चित्रपटाच्या शूटिंगला जात असते.

तेवढ्यात एक भिकारी येऊन म्हणतो, “बहेनजी, १० रुपया दे दो इस गरीब को। भुखा हूं दो दिन से।”

मल्लिका : ये लो। (असं म्हणून ती त्याच्या हातात १०० रुपयांची नोट टेकवते.)

सचिव : अहो मॅडम, तो फक्त दहा रुपयेच मागत होता. त्याला १०० ची नोट का दिली?

मल्लिका : कारण, आज मला पहिल्यांदा कुणीतरी बहीण म्हणलं.

23 March 2011

एक भिकारी SMS








जसं १-२ मच्छर मारून तुम्ही होत नाही शिकारी,

तसंच १-२ SMS करून तुम्ही होत नाही भिकारी.

22 March 2011

विद्येसाठी...

गुरुजी : बंड्या, तू शाळेत कशासाठी येतोस?

बंड्या : विद्येसाठी.

गुरुजी : मग मूर्खा झोपतो का आहेस?

बंड्या : ती आज आली नाही ना म्हणून.

21 March 2011

याला कंजूष म्हणावं की भिकारी

भिकारी : साहेब, १ रुपया द्या हो. तीन दिवस झाले, उपाशी आहे.

मारवाडी : (हळूच) मी तुला १ नाही १० रुपये देतो. पण मला एक गोष्ट सांग.

भिकारी : कोणती?

मारवाडी : १ रुपयात जेवण कुठं मिळतं?

20 March 2011

अभिमान आहे भिकारी असल्याचा...

दोन मुलांमधलं संभाषन.

पहिला : तुझे पप्पा काय करतात रे?

दूसरा : ते सगळ्यांना आशीर्वाद देतात.

पहिला : ते काय देव आहेत का?

दूसरा : नाही ते भिकारी आहेत.

भिकार्‍याचा आशीर्वाद

एका घरात नवरा-बायकोची जोरदार भांडणं चालू असतात.

जरा कुठे शांतता झालेली असते की भिकारी दारात येतो.

भिकारी : ताई, रोज १ रुपयांचं दान करत जा मला. तुझं सौभाग्य १०० वर्षे राहील.

बाई : मुडदया, रोग बसला नेऊन तुझ्यावर. तुला तर आता फुटकी कवडी पण मिळणार नाय. चल फुट.

18 March 2011

असं का?

एका सरदारजीच्या अंगावर वीज पडते आणि तो मरून पडतो.
पण त्याच्या मृतदेहाचा चेहरा मात्र हसरा असतो.

सरदारजीचा आत्मा स्वर्गात जातो.
त्याचा हसरा चेहरा पाहून देव मात्र चकित होतो.

देव त्याला याचं कारण विचारतो.

सरदारजी : देवा, त्याचं काय आहे, जेव्हा आकाशात वीज चमकली ना तेव्हा मला वाटलं की कुणीतरी माझा फोटोच काढतय म्हणून.

प्रार्थना संताची

एकदा संताचं गाढव हरवतं.

मग संता देवळात जातो आणि देवाला प्रार्थना करू लागतो.

तिथे बंताही त्याच्यासोबत असतो.

बंता संताला म्हणतो, "तू देवाला हीच प्रार्थना करत असशील ना की तुझं गाढव तुला परत मिळू दे म्हणून."

संता : नाही रे, उलट मी देवाचे आभार मानत आहे की, मी त्यावेळी गाढवावर बसलो नव्हतो म्हणून, नाहीतर मीसुद्धा हरवलो असतो ना.

चोरी...सरदारजीच्या घरी

एका सरदारजीच्या घरात एक चोर घुसतो, मध्यरात्रीला.

चोर चोरी करण्यासाठी घुसतो, त्याला मोबाइल दिसतो. तो त्याने उचलताच सरदारजीच्या बायकोला जाग येते.
ती मोठमोठ्याने ओरडू लागते, "चोर, चोर, चोर, चोर."

हा आवाज ऐकून चोर घाबरतो आणि तिथून धूम ठोकतो.
बायकोचा आवाज ऐकून सरदारजी जागा होतो.

बायको त्याला सांगते, "अहो, पळा त्या चोराच्या मागे. त्याने तुमचा मोबाइल चोरून नेला."

सरदारजी : जाऊ दे. त्याला काय त्याचा उपयोग? चार्जर तर माझ्याकडे आहे.

नवर्‍याचा राग

एक बायको आपल्या नवर्‍याला लाडात येऊन विचारते, अहो, तुमचं ना आजकाल माझ्यावर प्रेमच राहिलेलं नाहीये.

नवरा नुकताच कामावरून वैतागून आलेला. तो जाम भडकतो.
तेवढ्यात त्याची ४ मुले त्याच्याकडे पप्पा, पप्पा म्हणत धावत येतात.

तेव्हा नवरा म्हणतो, तुला काय वाटलं ही चार पोरं मी काय Google वरून डाऊनलोड केलेली आहेत काय?

व्वा रे ग्राहक !!!

एक खेडवळ ग्राहक एका मोबाइलच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला विचारतो की, मोबाईलमध्ये गाणी भरायची आहेत, तेव्हा भरून मिळतील का?

दुकानदार : हो, मिळतील की.

ग्राहक : मग हा घ्या मोबाइल आणि जुनी हिंदी, मराठी गाणी भरून द्या.

दुकानदार : मोबाइलची गरज नाही, फक्त मेमरी कार्ड द्या.

ग्राहक : (जरा विचार करून) नाही हो, मेमरी कार्ड नाहीये. हो, पण रेशन कार्ड चालेल का?

साम्य

सांगा बरं, लग्न आणि ११:५९ ही वेळ यांमध्ये काय साम्य आहे?

सोप्पं आहे,

या दोन गोष्टी झाल्या की,

१२:०० वाजतात आणि एकदम दिवस बदलतात.

14 March 2011

वाहतुकीचा संदेश








जर तुमची मुले बर्‍यापैकी प्रौढ झाली नसतील तर तुमच्या मुलांना गाडी चालवू देऊ नका.

अन्यथा ती कधीही प्रौढ होऊ शकणार नाहीत.

व्यवसायाचं गमक


मुंबईतील एका प्रसिद्ध केशकर्तनालयातील ही पाटी


आम्हाला आमचा व्यवसाय चालवण्यासाठी तुमच्या डोक्यांची गरज आहे.

12 March 2011

Be careful !!!


मुंबईतील एका प्रसिद्ध ब्युटीपार्लर बाहेर लावलेली ही पाटी –

कृपया येथून बाहेर पडणार्‍या मुलींकडे बघून शिट्टी वाजवू नका.

कारण ती कदाचित तुमची आजी असू शकेल.

प्रवास

एक सरदारजी रेल्वेने प्रवास करत होता.

त्याला रेल्वेच्या डब्यातली वरची सीट मिळालेली असते.

सरदारजीला वरच्या सीटवर प्रवास करण्याची सवय नसल्याने रात्रभर काही झोप येत नाही.

मित्राकडे पोचल्यावर त्याचा मित्र त्याला विचारतो की प्रवास कसा झाला?

सरदारजी : काय सांगू मित्रा, मला वरची सीट मिळाल्याने रात्रभर झोपच लागली नाही.

मित्र : अरे मग खालच्या सीटवरील एखाद्याला विनंती करून बदलून घ्यायची ना.

सरदारजी : घेतली असती रे, पण खालच्या सीटवर कुणीच झोपलेलं नव्हतं ना.

10 March 2011

चोराची चोरी की बायकोची शिरजोरी?


एक चोर एका कापडाच्या दुकानात चोरी करताना पकडला जातो.

त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाते.

चौकशी करताना :-

पोलीस : काय रे, तू एकाच दुकानात चोरी करण्यासाठी दुसर्‍यांदा का केलास?

चोर : साहेब, मी फक्त एकच ड्रेस चोरला हो. पण माझ्या बायकोला तो आवडला नाही म्हणून तो बदलून दूसरा आणण्यासाठी पुन्हा जावं लागलं.

09 March 2011

शतकातील एक छान षटकार

हा व्हिडिओ जरूर पहा.

बुद्धिमत्ता कशी मिळते?


बंड्या : पप्पा, पप्पा, मला बुद्धी कुठून आली?

पप्पा : तुला बुद्धी नक्कीच तुझ्या आईकडून मिळाली. कारण, माझी बुद्धी माझ्याकडे आहे.

08 March 2011

रन आऊट

कपिलदेवने शिकवला चांगलाच धडा. नियम पाळून खेळा.

दोन्हीकडचे फलंदाज बाद

बाप से बेटा सवाई??? Nope…


बंड्या आज रडत रडत शाळेतून घरी आला.

त्याच्या पप्पानी त्याला रडण्याचं कारण विचारलं.

बंड्या : आज गुरुजींनी विचारलं की ताजमहाल कुठे आहे? मला उत्तर आलं नाही म्हणून मारलं त्यांनी मला.

पप्पा : बरोबरच आहे त्यांचं. मारणारच ते. तरी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे की तुझ्या सगळ्या वस्तू नीट सांभाळून ठेवत जा म्हणून.

झोपेचा वेळ





प्रोफेसर : तुम्हा विद्यार्थ्यांना दिवसाला कमीत कमी ७ तास झोप आवश्यक आहे.

विद्यार्थी : सर, हे कसं शक्य आहे? कॉलेज तर ६ तासांचं असतं.

07 March 2011

पर्याय

एक दारुड्या फुल्ल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत, डुलत डुलत चालला होता.

एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले, "एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा ?"

दारुड्या : काय करणार साहेब, बाटलीचं झाकणंच हरवलं त्यामुळे दूसरा मार्गच नव्हता बघा.

फुकट्या

एक मारवाडी रस्त्याने ऑफिसला चाललेला असतो.

वाटेत त्याला एक ज्योतिषी दिसतो.

मारवाडी : अहो महाराज, माझं आजचं भविष्य सांगाल का?

"अवश्य, हात बघू तुझा," ज्योतिषी.

 कंजूष मारवाडी आपला हात त्या ज्योतिषाच्या हातात देतो.

ज्योतिषी जरा विचार करतो आणि म्हणतो, "आज तुमच्यामुळे कुणीतरी निराश होईल असं दिसतंय."

मारवाडी : हो की, बरोबरच आहे. मी माझं पॉकेट घरीच विसरून आलोय.

विद्यार्थ्यांना एक सल्ला : मद्यविक्री करणार्‍या कंपनीकडून



जेव्हा कुणी मद्य घेतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनातलं सगळं जसंच्या तसं आणि खरंखरं बाहेर पडतं. 

मग उशीर कसला करताय?

परीक्षेला जाण्याआधी एक पेग मारूनच जा.



This is just a joke...please don't try...we don't give guarantee of u getting pass in your examination !!!

06 March 2011

सचिनची पहिली मुलाखत



सचिनची ही पहिलीच मुलाखत :

सचिन काय बोलतोय यावेळी हे येथे लक्षपूर्वक ऐका.
टॉमने जेव्हा त्याला विचारले की, "तुला सर्वजन प्रश्न विचारू लागले आहेत तुझ्या या चांगल्या कामगिरीबद्दल. तर तुला काय वाटते?"
तेव्हा सचिन म्हणतो, "ही तर फक्त सुरुवात आहे."

त्याने दिलेल्या या काही मिनिटांच्या मुलाखतीतून, त्याचा आत्मविश्वास आणि जिद्द तर दिसतेच.
पण असंही वाटतं की, कदाचित सचिनला त्याचवेळी माहीत होतं की, आपण पुढे जाऊन यशाच्या शिखरावर नक्कीच जाणार आहोत.

काळजी नसावी


आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही.

असं जर असेल तर मग काळजी कसली करताय?

फक्त घड्याळाचा सेल काढून टाका आणि आयुष्य आनंदाने जगा.

काय म्हणाल?


एक Electric Wire दुसर्‍या Electric Wire च्या प्रेमात पडते.

याला तुम्ही कोणत्या प्रकारचं प्रेम म्हणाल?

हा हा हा !!!

याला तुम्ही Current Affair म्हणून शकता.

05 March 2011

राहुल द्रविडची मुलाखत - चक्क मराठीतून

थोडं सामान्यज्ञान


आपण पेपरमध्ये कधीकधी etc. असे लिहितो.

त्याचा अर्थ काय आहे याचा कधी विचार केलाय तुम्ही?

जाउद्या, तो काही का असेना.

पण,

तो काय असू शकतो, ते पहा.

E म्हणजे End of
T म्हणजे Thinking
C म्हणजे Capacity

कॉलेजचा सुविचार


जर कॉलेजच्या विद्यार्थ्याला कॉलेजमधील आयुष्य खरोखरच जगायचं असेल, तर त्याने पुढील दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

१. आपणच प्राचार्य आहोत अशा थाटात आपलं चालणं असावं,


२. तुमचं चालणं असं असावं की प्राचार्य कोण आहेत याच्याशी तुम्हाला काही देणं-घेणं नाही.

04 March 2011

सचिन द डॉन

जशी आज्ञा


गुरुजी : बंड्या, मला वाटतं की तू थोडंसं लक्ष द्यावंस वर्गात.

बंड्या : हो गुरुजी. मी कमीत कमी लक्ष देण्याचा प्रयत्न करीन.

Team India in danger


एक सरदार टीव्हीवर भारत वि. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना पाहत होता.

त्यावेळी त्याने त्याच्या टीव्हीवर एक बॉम्ब ठेवला होता.

सरदारजीची पत्नी : अहो, टीव्हीवर बॉम्ब ठेवून काय पाहता आहात?

सरदार : जर आज इंडिया मॅच हारली तर सगळी टीमच उडवून देणारे मी बॉम्बने.

03 March 2011

सरदार अटकेत


एकदा रोड अपघातात सरदारजीला पोलीस अटक करतात.

न्यायाधीश : तुमच्या गाडीचा अपघात कसा झाला?

सरदारजी : मला काहीच माहीत नाही साहेब. मी तर झोपलेलो होतो.

जरा मदत करा


एक पती-पत्नी देवदर्शनाला जातात. संध्याकाळी एका हॉटेलवर मुक्कामाला राहतात.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचं कडाक्याचं भांडण होतं.

पती पळत पळत हॉटेल मॅनेजरकडे जातो.

पती : अहो, जरा मदत करा ना...(दम खात)

मॅनेजर : बोला सर. मी काय मदत करू शकतो आपल्याला?

पती : अहो, माझं माझ्या बायकोबरोबर जोरदार भांडण झालंय. तिची खिडकीतून उडी मारून जीव द्यायची इच्छा आहे.

मॅनेजर : अहो साहेब, तुमच्या नवरा-बायकोच्या भांडणात मी तुमची काय मदत करू शकतो?

पती : अरे मूर्खा लवकर चल. त्या खिडकीची काच उघडत नाहीये.

02 March 2011

पतीचा प्रेमळ सल्ला


पत्नी : (रागाने) अहो, मी आपल्या कारच्या ड्रायव्हरला उद्यापासून कामावरून काढून टाकते आहे.

पती : का? काय झालं?   

पत्नी : कसली भयानक गाडी चालवतो तो. आज मी तिसर्‍यांदा मरता मरता वाचले.

पती : (गालातल्या गालात स्मितहास्य करीत) अगं जाऊदे ना. त्याला अजून एक संधी तर दे.

बापाला वाचवतो?


सरदारजी : काल माझे पप्पा समोरच्या विहिरीत पडले. ते काल जोरजोरात ओरडत होते, वाचवा वाचवा म्हणून.

मित्र : अरेरे, बरं मग आता त्यांची तब्येत कशी आहे?

सरदारजी : काल संध्याकाळपासून अजिबात आवाज आला नाही. म्हणजे ठीक आहे.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...