Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label सरकारी. Show all posts
Showing posts with label सरकारी. Show all posts

04 February 2013

पोल-खोल


एका प्यूनचा ऑफिसात पहिला दिवस असतो.

त्यादिवशी मालक ऑफिसात येतात.

मालक त्या नवीन प्यूनला बोलावून घेतात आणि विचारतात, “तुम्हाला मॅनेजरने काम काय करायचे ते समजावून सांगितले का?”

प्यून : हो. ते म्हणाले, मी जरा डुलकी घेतो. साहेब आले की मला उठव.

सरकारी उत्तर


एक सरकारी कर्मचारी घोड्यांच्या रेसवर पैसे लावतो आणि नशिबाने जिंकतोही.

त्याचा बॉस हे ऐकून खुश होतो आणि त्याला सल्ला देतो की अशी हुशारी ऑफिसातपण दाखवलीस तर तुला बढती मिळेल.

कर्मचारी : हो. बरोबर आहे साहेब. मी ऑफिसच्या वेळेतच रेसवर पैसे लावले आणि जिंकलो.

02 May 2011

हजरजबाबी


एक सरकारी कर्मचारी आपल्या टेबलावर माशा मारत बसलेला असतो.

वरिष्ठ अधिकारी त्याचवेळी तेथे येतात.

अधिकारी : काय हो, काय चाललंय?

कर्मचारी : माशा मारतोय.

अधिकारी : अच्छा ! किती मारल्यात?

कर्मचारी : ८ ! ५ नर आणि ३ माद्या.

अधिकारी : (आश्चर्यचकित होऊन) तुम्हाला कसं कळलं?

कर्मचारी : कारण, ५ बियरच्या बाटलीवर बसल्या होत्या. तर ३ त्या फोनवर बसल्या होत्या.

13 November 2010

शब्दाचा पक्का

कंत्राटी कर्मचारी : साहेब, तुम्ही मागच्याच महिन्यात सांगितलं होतं ना, की पुढच्या महिन्यात पगार वाढवतो म्हणून.

साहेब : मी माझा शब्द कधीच फिरवत नाही. मागच्या महिन्यात जे सांगितलं होतं, तेच आताही सांगतो.

24 September 2010

शिष्टाचार

एका कार्यालयातील बॉस आपल्या हाताखालच्या कर्मचार्‍यांना प्रचंड छळत असे. त्यामुळे कर्मचारीवर्ग फार कंटाळला होता.

एक कर्मचारी सेवानिवृत्त झाला. तो शिष्टाचार म्हणून बॉसचा निरोप घ्यायला गेला.

बॉस : मी मेल्याची बातमी जर तुला कळली, तर तू माझ्या प्रेतावर नक्कीच थुंकशील.
 
कर्मचारी : माझ्याकडे रांगेत उभे राहायला वेळ नाहीये.

प्रामाणिकपणाच बक्षीस

“मला तुमच्या खुर्चीखाली २ रुपये सापडले, हे घ्या.” असे म्हणून कर्मचार्‍याने साहेबांस ते पैसे दिले. 

साहेबांना त्याच्या प्रामाणिकपणाच कौतुक वाटल.

साहेब : राहू देत तुला, बक्षीस म्हणून.

काही दिवसांनी साहेबांचे ५०० रुपये हरवले.

साहेब : अरे, तुला माझे ५०० शे रुपये सापडले का ?
 
कर्मचारी : हो साहेब, पण मी ते बक्षीस म्हणून खर्चून टाकले.

गुटखा

साहेब : येथे ‘गुटखा’ खाऊन कोण थुंकल ?
(कर्मचारी गप्प. तोंडात गुटखा)

साहेब : तू गप्प का…बोल ना...
 
कर्मचारी : (तेथेच थुंकून) साहेब, या अगोदर मी येथे थुंकलो नाही.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...