Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label थोडासा खोडकरपणा. Show all posts
Showing posts with label थोडासा खोडकरपणा. Show all posts

21 November 2016

मेरा भारत महान



भारतात पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे खूप भेटतील,

पण


पैसा नाही म्हणून तंबाखू, सिगारेट, दारू सोडणारा शोधून सापडणार नाही.


20 November 2016

याददाश

एक मित्र अनेक दिवसांनी इतर मित्रांना भेटतो.

पहिला मित्र : मी आपल्या सगळ्या मित्रांना विसरलो होतो. पण एक चित्रपट पाहिला आणि सगळे आठवले.

दुसरा मित्र : कोणता?


पहिला मित्र : कमीने.


09 November 2016

हे भगवान, उठाले रे

एकदा एक मुलगी पिझ्झा खायला दुकानात जाते.

पिझ्झा तयार होतो आणि पिझ्झा बॉय विचारतो, “किती तुकडे करू ४ कि ८ ?”


मुलगी : ४ च करा. ८ खाल्ले तर उगाच मोठी होईल अजून.



06 November 2016

ठग लोकं

एक मित्र : काय राव किती ठग लोकं आहेत या जगात.

दुसरा मित्र : काय सांगू, आज एका रिक्षावाल्याने सुट्टे पैसे देताना शंभराची खोटी नोट देऊन गेला.

पहिला मित्र : बघू, कुठे आहे?


दुसरा मित्र : मी पण ती नोट एका भाजीवाल्याला खपवून टाकली.


09 May 2016

नक्की हसाल हा विनोद वाचून


एकदा कोकिळेने कावळ्याला विचारले, “काय रे कावळ्या, तू अजून लग्न का नाही केलं?”


कावळा : काय सांगू कोकिळाताई, लग्न न करताच एवढी काव-काव आहे आयुष्यात. तर विचार केला कि लग्नानंतर काय होईल म्हणून.


24 October 2015

स्मार्ट “गाय”…


एक पोरगा स्वत:ला खूप शहाणा समजत असायचा.

एके दिवशी मला भेटला.

आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी मला म्हणाला, “जगामध्ये कांदा हे एकच फळ असं आहे, ज्यामुळे डोळ्यांत पाणी येतं.”

मी म्हटलं, “ए येडया, असं काही नाही. नारळामुळे पण येऊ शकतं.”

शास्रज्ञ असल्यासारखा मला म्हणाला, “मग सिद्ध करून दाखव.”

मग मी तरी काय कमी आहे?

मी घेतला नारळ आणि हाणला त्याच्या टाळक्यात.

अन ते गावभर बोंबलत पळालं...

 

17 October 2015

फेसबूकवर नाराज

फेसबूकने dislike करण्यासाठी नवीन बटन द्यायचं ठरवलंय.

पण

भारतीय लोक तरीही नाराज आहेत.

त्यांच्या मते,

फक्त dislike करून काय होणार?

त्यापेक्षा असं बटन द्या की,


ज्यावर क्लिक करताच कोर्टाची नोटिस पोस्ट टाकणार्‍याच्या थेट घरी पाठवली जाईल.


03 September 2015

हिंदुस्तानी-पाकिस्तानी भाई भाई


एकदा सेनेचा एक जवान आपल्या अधिकार्‍याकडे १ महिन्याची सुट्टी मागायला जातो.

अधिकारी : जा, आधी दुश्मनांचा एक रणगाडा घेऊन ये.

दुसर्‍या दिवशी तो जवान खरोखरच एक रणगाडा घेऊन येतो.

अधिकारी : अरे वा, शाब्बास. खूपच शूरवीर दिसतोस. पण हे तु कसं काय केलंस?


जवान : यात कोणती मोठी गोष्ट आहे सर? त्यांना जेव्हा १ महिन्याची सुट्टी हवी असते, तेव्हा ते पण आपल्याकडून रणगाडा घेऊन जातातच की.


मानसिकता


जपानी मानसिकता : जर तो ते करू शकतो, तर मीपण नक्कीच ते करू शकतो. जर ते कुणीच करू शकत नसेल, तर ते मला जरूर केलेच पाहिजे.


भारतीय मानसिकता : जर तो ते करू शकतो, तर त्याला ते करू देत. जर ते कुणीच करू शकत नसेल, तर मी काय जेम्स बॉन्ड आहे का?


06 August 2015

भागदौड भरी जिंदगी


आम्ही पण लहानपणी श्रीकृष्णासारखे सुंदर होतो,


पण


आयुष्याच्या पळापळीत,



आमचा पार भैरोबा झालाय...


03 August 2015

वजन कसं कमी कराल?

वजन कसं कमी कराल?

सोप्पं आहे.

एक सोप्पा व्यायाम करायचा.

तो असा की तोंड पहिल्यांदा डावीकडे वळवायचं मग उजवीकडे.

हा व्यायाम जेव्हा कुणी तुम्हाला काही खायला देईल, तेव्हा पुन्हा पुन्हा करायचा.

इतर वेळी नाही केलात तरी चालेल हं...


28 July 2015

मुर्खांची जनगणना


मुर्खांची जनगणना कशी केली जाते माहितीये?

विदेशी कंपन्यांना कंत्राट दिले जाते.

मग त्या कंपन्या फेसबुकसारख्या ठिकाणी एक app किंवा post टाकतात.

की,

“या post मध्ये १ लिहा आणि जादू पहा.”
.
.
.

तुम्ही कधी असे १,, वगैरे लिहिले आहे का?

असेल तर ही post like करा पटकन.


26 July 2015

मस्ती

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.

गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...

....
का?






अंगात मस्ती , दुसरं काय ?


05 July 2015

ग्रीस


ग्रीस दिवाळखोर देश म्हणून जाहीर झाला त्या पार्श्वभूमीवर...




बाबाजी का ठुल्लू


एक १५० वर्षांचे आजोबा मृत्युनंतर स्वर्गात जातात.

तिथे सुंदर अप्सरांचे नृत्य पाहून अतिशय दु:खी होतात.

एक देव त्यांना विचारतो,का हो आजोबा, तुम्ही तर स्वर्गात आलात. तरीपण दु:खी का?


आजोबा : काय सांगू, पृथ्वीतलावर त्या बाबा रामदेवच्या नादी लागलो नसतो तर कधीचा इथे आलो असतो.


14 June 2015

हे भगवान उठाले रे...मेरेको नही रे, इसको...


मुलगा : whatsapp अपडेट कर.

मुलगी : ते कसं करायचं?

मुलगा : प्ले स्टोरला जा अन कर.


मुलगी : आमच्या गावात नाहीये प्ले स्टोर.


07 June 2015

जय बाबा रामदेव की...

बंड्याला बिडी प्यायची सवय लागली.

ती सोडवण्यासाठी त्याचे बाबा त्याला बाबा रामदेवकडे घेऊन गेले.

आणि

आता


बंड्या पायानेपण बिडी पिऊ शकतो.

07 April 2015

स्कार्फ

आजकाल मुली स्कार्फ

असा बांधतात की जस काय...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अँक्टिव्हा नाही....पिठाची गिरणी चालवायची आहे....!!



                                                ...फेसबूकवरुन साभार


10 February 2015

शौक


एक बिहारी माणूस बायकोच्या त्रासाला वैतागून मेडिकलमध्ये जातो.

एक 50 रुपयांची विषाची बाटली घेतो आणि टपरीवर जाऊन 120 मावा घेतो.


...याला म्हणतात शौक !!!


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...