Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

31 May 2011

सॉफ्टवेअर म्हणी


१) एक ना code, भाराभर bugs
२) code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
३) मरावे परी bugs रूपी उरावे
४) आपलाच code आणि आपलेच bugs

५) आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
६) इकडे code तिकडे release
७) project आला होता, पण deadline आली नव्हती
८) Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही
९) अतीशहाणा त्याचा code रिकामा
१०) logic थोडे printfs फार


११) Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
१२) code कळला तरी bugs मिळत नाहीत
१३) bonus नको पण workload आवर
१४) स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
१५) दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
१६) दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं
१७) जो Google वरती विसंबला, त्याची deadline बुडाली
१८) कुठे manager ची Honda-city आणि कुठे programmer ची activa
१९) इकडे keyboard तिकडे mouse
२०) promotion ही गेलं, increment ही गेलं, हाती आली pink-slip


२१) developer जातो जिवानिशी, manager म्हणतो आळशी
२२) release सरो, client मरो
२३) developer मेला workload ने आणि manager मेला tracking ने
२४) अडला manager, client चे पाय धरी
२५) developer ने डोळे मिटून code ढापला, म्हणून manager ला कळायचं राहत नाही
२६) code सलामत तो outputs पचास
२७) release गेला आणि bug-fix केला
२८) manager चा feedback, वाकडा ते वाकडाच
२९) manager पुढे दिली PPT, आणि कालची meeting बरी होती
३०) job सलामत, तो increments पचास


३१) fresher च्या program ला printf पासून तयारी
३२) deadline पाहून coding करावे
३३) उतावळा client, on-site posting
३४) उचलला phone आणि लावला कानाला
३५) बुडत्याला Google चा आधार
३६) ज्याचा लिहावा code, तो म्हणतो माझंच credit
३७) आलीया deadline, लिहावा program
३८) हपापाचा code गपापा
३९) मूर्ख manager पेक्षा शहाणा client बरा
४०) झाकला code सव्वाशे lines चा


४१) चार line चा code आणि बारा line च्या comments
४२) ज्याच्या हाती code, तोच programmer
४३) चार दिवस manager चे, चार दिवस developer चे
४४) कोडात नाही तर output कुठून येणार
४५) ऑफिसात राहून HR शी वैर करू नये
४६) ऐकावे manager चे, करावे client चे
४७) आयजीच्या code वर बायजी हुशार
४८) आधीच increment, त्यात profit sharing
४९) results झाकले म्हणून deadline यायची राहत नाही.
५०) reports मोठे, results खोटे


५१) programmer सोडून reviewer ला सुळी
५२) programmer च्या शापाने HR मरत नाही.
५३) manager चा cubicle असावा शेजारी
५४) intern ची धाव Google पर्यंत
५५) HR तारी त्याला कोण मारी
५६) हा code आणि हा client
५७) Google वाचून error गेला
५८) Google वरचा code, चालला तर चालला, नाहीतर delete केला
५९) error नाही त्याला डर कशाला?
६०) developer च्या मनात lay-off


६१) coding येईना hard-disk तोकडी
६२) code आहे तर compiler नाही, compiler आहे तर code नाही
६३) हातच्या printout ला laptop कशाला
६४) client ला manager साक्ष
६५) bug रामेश्वरी अन fix सोमेश्वरी
६६) लहान तोंडी मोठा seminar
६७) review चा code आणि release चा code वेगळा असतो
६८) project गेला आणि report राहिला
६९) आपलेच bugs आणि आपलेच fixes
७०) कठीण code येता Google कामास येतो.


७१) एक project बारा भानगडी.
७२) code थोडी अऩ सोंग फार.
७३) काखेत कळसा आणि Google ला वळसा


Received from : Mr. Anup Ghogare by e-mail
Appreciation : Thank you buddy...


(¨`•.•´¨)      Always
`•.¸(¨`•.•´¨)  Keep
(¨`•.•´¨)¸.•´  Smiling !!!
`•.¸.•´........Take Care

30 May 2011

समजावण्याची पुणेरी पद्धत



एके दिवशी एका पुणेरी मुलाचं त्याच्या गर्लफ्रेंडशी कडाक्याचं भांडण होतं.

पण डोक्यातला राग शब्दांशिवाय व्यक्त करील आणि तोही खास आपल्या स्टाइलने तो पुणेरी मुलगा कसला?

त्याने सहजंच एक बाजूला रस्त्यावर पडलेलं वहीचं पान घेतलं आणि त्याचं रॉकेट बनवलं.

त्याने ते रॉकेट अतिशय शांतपणे तिला दिलं.

ती : (फणकार्‍याने) मी काय करू या कागदाच्या खेळण्याचं? ठेव तुझ्याकडेच.

तो : तुला तारे हवे होते ना? मग बस त्या रॉकेटवर आणि जा वर...

परीक्षेचे नवे नियम


आता IPL T20 च्या धर्तीवर T20 चे नियम हे परीक्षेत आणायला हवेत असं आमचं प्रामाणिक मत आहे.

ते नियम कसे असावेत ते थोडक्यात लिहिलं आहे खाली.

नियम १ : परीक्षेचा वेळ ३ तासांवरून १ तास करण्यात यावा.

नियम २ : परीक्षा १०० गुणांऐवजी ४० गुणांची करण्यात यावी.

नियम ३ : पॉवरप्ले – पहिल्या पंधरा मिंनिटांमध्ये एकही परीक्षक परीक्षा हॉलमध्ये असता कामा नये.

नियम ४ : चीयर लीडर्स – प्रत्येक बरोबर उत्तर लिहिल्यावर नाचून आनंद व्यक्त करण्यासाठी.

नियम ५ : स्ट्रटेजिक टाइम आऊट – हा वेळ विद्यार्थ्यांना आपापसांत चर्चा करण्यासाठी उपलब्ध व्हावा.

छोटा बच्चा समझ के...




एक डॉक्टर एका लहान मुलाच्या घरी जातात.

त्यांना त्या मुलाच्या पायाचे टाके काढायचे असतात.

त्यावेळी त्याचं लक्ष दुसरीकडे राहावं म्हणून झाडाकडे बोट दाखवून त्याला म्हणतात, “ती बघ तिकडे चिमणी.”

लहान मुलगा : ओ चिमणीचे मामा, खाली नीट बघा नाहीतर पाय कापाल माझा.

बंड्याची हुशारी


पप्पा : बंड्या, तू कधी स्वप्नात तरी कधी असं काम केलंय का की ज्यामुळे माझी मान उंचावली आहे.

बंड्या : हो पप्पा. मी एकदा तुमच्या डोक्याखाली तीन उशा ठेवल्या होत्या.

29 May 2011

खरी जादू ???


तुम्हाला माहितीये या जगातली सगळ्यात मोठी जादू कुठे होते?
मी सांगतो ना तुम्हाला...

ते ठिकाण आहे......ब्युटीपार्लर.

एक होता मारवाडी



एक मारवाडी आपल्या म्हशीला हिरवं गवत खायला घालत असतो.

त्या गवतात चुकून मारवाड्याच्या मोबाइलचं सीम कार्ड पडतं आणि ते म्हैस गवताबरोबर खाऊन टाकते.

पण अजून एक गोष्ट होते, ती म्हणजे म्हैस पळून जाते.


मारवाडी म्हशीला खूप शोधतो पण म्हैस काही सापडत नाही. मग घाबरून तो मोबाइल कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रास (Customer Care) फोन लावतो.

मारवाडी : हॅलो, माझं सीम कार्ड म्हशीने खाल्लं आणि ती पळून गेली.

Customer Care : ठीक आहे, पण मग मी काय करू शकतो?

मारवाडी : मला एक सांगा, त्या सीम कार्डला रोमिंग तर लागत नाहीये ना.

28 May 2011

एका इंजिनियरची कहाणी


एका इंजिनियर माणसाच्या स्नानगृहातील एक पाइप गळत असतो. तो प्लंबरला बोलावून तो ठीक करून घेतो.

प्लंबर : साहेब, मी पाइप बदलून त्याजागी नवीन बसवला आहे. आता काही काळजी करू नका.

इंजिनियर : बरं ठीक आहे. तुझी मजुरी किती द्यायची?

प्लंबर : ८५० रुपये साहेब.

इंजिनियर : एवढे? अरे दिवसाला एवढा पगार तर मलाही मिळत नाही.

प्लंबर : बरोबर आहे तुमचं. मी इंजिनियर होतो न तेव्हा पण मला एवढे पैसे दिवसाला मिळत नव्हते.

ज्योतिषी बंड्या




बंड्या : पप्पा, पप्पा जर मी तुम्हाला सांगितलं की मी पास झालोय तर तुम्हाला कसं वाटेल?

पप्पा : मी आनंदाने वेडा होईल.

बंड्या : मला माहीत होतं, म्हणूनच तर घाबरून मी नापास झालोय.

वजन किती ???


डॉक्टर : तुमचं वजन किती?

रुग्ण : चष्मा धरून साठ किलो.

डॉक्टर : (विचारात पडतात आणि मग विचारतात) आणि चष्म्याशिवाय?

रुग्ण : दिसतच नाही हो.

26 May 2011

शहाणा बंड्या

बंड्या एके दिवशी वर्गात एक गाढव घेऊन जातो.

गुरुजी : काय रे बंड्या, हे गाढव वर्गात का घेऊन आलास?

बंड्या : गुरुजी, काल तुम्हीच तर म्हणाला होतात की मी आजपर्यंत कित्येक गाढवांना चांगला माणूस बनवलं आहे. म्हणूनच मी यालापण घेऊन आलो, माणूस बनवायला.

जेवायला या

नागपूरकरांची पत्नी बाजूला राहणार्‍या पुणेकरांच्या म्हणजे जोशींच्या पत्नीला म्हणते, "अहो, तुम्ही तर एकदम सुगरणच आहात की हो. तुम्ही स्वयंपाक करत असला ना की मस्त सुगंध दरवळतो बघा. आम्हाला जेवायला बोलवा की एकदा."

झालं, जोशीकाकू पण कुठे हो-ना, हो-ना करायचं म्हणून हो म्हणून टाकतात.

दुसर्‍या दिवशी नागपूरकर त्यांच्या पत्नीसोबत दुपारी जोशींच्या घरी जेवायला येतात.

जोशी मात्र वैतागलेले असतात. त्यांचा पोरगाही वैतागलेला असतो. पण याला थेट नाहीपण म्हणता येत नव्हतं, कारण पत्नीनेच आमंत्रण दिलेलं होतं ना.

जोशींच्या दारात त्यांच्याप्रमाणेच वागणारा एक मोत्या नावाचा कुत्रा बांधलेला होता.

जोशीकाकू सर्वांना जेवायला वाढतात.

सौ. नागपूरकर : काकू जेवण एकदम झकास हं.

जोशी : (मनातल्या मनात) फुकटच मिळालंय, ढोसा.

श्री. नागपूरकर : अहो, तुमचा मोत्या बराच वेळ झालं माझ्याकडे खूपच खुन्नसनी पाहतोय हो.

जोशींचा मुलगा : अहो काका, बघताय काय मग त्याच्याकडे परत. चला आवरा लवकर.

श्री. नागपूरकर : का रे, काय झालं?

मुलगा : मला वाटतं, त्याला त्याची प्लेट ओळखू आलेली आहे.

अभ्यासात मदत

पप्पा : बंडू बाळ, तुला अभ्यासात मी काही मदत करू का?

बंडू बाळ : नाही पप्पा, यावेळी मला तुमच्या मदतीशिवायच नापास व्हायचं आहे.


25 May 2011

नातलग

एकदा बायको आपल्या नवर्‍याला दचकवण्यासाठी काळे कपडे घालून अंधारात लपून बसते.

नवरा संध्याकाळी घरी येतो, तेव्हा ती नवर्‍यासमोर थयाथया नाचत उभी राहते.

नवरा : कोण तू???

बायको : मी हडळ आहे, हडळ...हा हा हा !!!

नवरा : वा, वा, वा...मग हात मिळव माझ्याशी...मी तुझ्या बहिणीचा नवरा.

24 May 2011

स्थापत्य अभियंता : चित्रपट निर्माता


स्थापत्य अभियंते चित्रपट बनवायला लागले, तर चित्रपटांची नावे काय असतील???

Curing हो ना हो
जानम Dewatering करो
आ अब Concreting करे
कभी M20, कभी M30
हमारा Tape आपके पास है
पत्थर तोडा तो डरना क्या
RCC नं १
Execution कोई खेल नही
थापीवाले ओळंबा ले जायेंगे
मैने Execution क्यु किया?
Honeycombing ना मिलेगी दोबारा
Plaster को Putty से प्यार हो गया
हम Concrete डाल चुके सनम
साहब है कि मानता नही
मैने Checking किया


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...