एकदा काय होतं, नागपूरकर एका पुणेकराच्या शेजारी राहायला येतात.
नागपूरकर म्हणजे लय डांबिस माणूस असतो. शेजारी राहणारे आपले पुणेकर बंधु मात्र त्याला आपण पुण्यात राहत आहोत याची सातत्याने जाणीव करून देत असतात.
एक दिवस पुणेकरांना एक आयतीच संधी चालून येते.
नागपूरकर त्या दिवशी संध्याकाळी आपल्या पत्नीसोबत खरेदीला बाहेर पडतात. आपल्या बाइकवरून जात असताना त्यांचं पाकीट त्यांच्या नकळत खिशातून रस्त्यावर पडतं.
आपले पुणेकर बंधु कुणाच्याही नकळत हे उचलतात आणि घरात घेऊन जातात. पाकीट उघडून पाहतात तर काय, ५०० च्या २० नोटा त्यात असतात. आता ह्या डांबिस नागपूरकरला चांगला धडा शिकवायचा पण तोही पुणेरी स्टाइलमध्ये असा ते निश्चय करतात.
नागपूरकराला रोज दुपारी २:०० च्या सुमारास रेडिओ मिरचीवरचा “आपकी फर्माईश” हा कार्यक्रम ऐकायची सवय असते.
पुणेकर नेमक्या याच वेळी रेडिओ मिरचीला फोन लावतात.
पुणेकर : मला एक पाकीट सापडेलेलं आहे. त्यात १०,००० रुपये, वाहन चालवण्याचा परवाना, क्रेडिट कार्ड, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे आहेत. त्या व्यक्तीचा ओळखपत्रावरील पत्ता आहे, श्री. हेमंत नागपूरकर, रा. सदाशिव पेठ, स्वप्न कुंज, ३ रा मजला...
रेडिओ जॉकी : अच्छा, किती प्रामाणिकपणा...म्हणजे तुम्हाला ते पाकीट परत करायचं आहे तर.
पुणेकर : नाही हो. माझी तुम्हाला एक विनंती आहे की, आपल्या "आपकी फर्माईश" या कार्यक्रमात त्यांच्यासाठी एक दु:खी गाणं लावावं.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.