Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

29 October 2010

नातेवाईक

एकदा पती आणि पत्नी फिरायला जातात.

वाटेत त्यांना एक गाढव गवत खाताना दिसतं.

पत्नी : अहो, तो बघा तुमचा नातेवाईक कसा गवत खातोय. त्याला नमस्ते वगैरे म्हणा की.

पती : नमस्ते सासरेबुवा.

28 October 2010

एप्रिल फूल

तो दिवस होता, १ एप्रिलचा.

सरदारजी कोणाला एप्रिल फूल करायचं म्हणून बराच वेळ विचार करून मग ऑफिसकडे जायला निघाला.

बसने जाताना त्याने कंडक्टरकडून तिकीट घेतले आणि म्हणाला, "एप्रिल फूल."

कंडक्टरच्या काही लक्षात आले नाही. त्याने विचारले का?

तर सरदारजी म्हणतो कसा, "माझ्याकडे ऑलरेडी बसचा पास आहे."

फायनल

संता : डॉक्टर साहेब, मला रात्री ना स्वप्नं पडतात की काही माकडे फूटबॉल खेळताहेत.

डॉक्टर : मग असं करा, रोज रात्री झोपण्यापूर्वी हे औषध घ्या.

संता : ठीक आहे, पण मी आज नाही घेणार.

डॉक्टर : का बरं?

संता : आज रात्री फायनल आहे ना !!!

coin box

एकदा संता मंदिरात जातो, देवाच्या पाया पडायला.

संता पाहतो की लोक, तिथे लोक देवासमोरील पेटीत नाणे ( coin ) टाकतात आणि देवाला प्रार्थना करतात.

तो आश्चर्याने उद्गारतो, "अरे वा, किती छान. लोकं देवाशी coin फोनवरून बोलताहेत आणि तेही receiver शिवाय."

27 October 2010

नंदू सबका बंधू

नंदू समोरून येणार्‍या गाढवासमोर चुकून पडला.

तेवढ्यात तेथून जाणार्‍या एका मुलीने त्याला टोचून विचारले, "काय रे, आपल्या लाडक्या बंधूंच्या पाया पडत होतास काय, हां."

नंदू : हो, वहिनी.

नात्याने भाऊ

संता : तुझाबरोबरचा हा मुलगा तुझा कोण लागतो?

बंता : तो माझा लांबून भाऊ लागतो.

संता : कसा काय?

बंता : त्याच्या आणि माझ्यामध्ये ९ बहीण-भाऊ अजून आहेत.

१ लिटर दूध

गिर्हाइक : एक लिटर गाईचं दूध द्या.

दुकानदार : अहो, तुम्ही आणलेल पातेलं खूपच लहान आहे.

गिर्हाइक : ठीक आहे, मग बकरीचं द्या.

पैज

एकदा एक खेडूत आणि प्रोफेसर यांची आगगाडीत भेट झाली.
वेळ घालवण्यासाठी एकमेकांना त्यांनी कोडं घालायचं ठरवलं.

प्रोफेसर : तुझं कोडं मला सांगता आलं नही तर मी तुला दोन रुपये देईन.

खेडूत : पण मी तुमच्या एवढा शिकलेला नाहीय. म्हणून तुमचं कोडं मला सोडवता आलं नाही तर मी तुम्हाला एकच रुपया देईन. कबूल आहे?

प्रोफेसर : ठीक आहे, चालेल. सांग काय आहे तुझं कोडं?

खेडूत : असा कोणता प्राणी आहे, की जो साडेतीन पायावर चालतो?

प्रोफेसर : (विचार करून) अरे, मला तर याचं उत्तर काही येत नाही बुवा. जाऊ दे, हे घे २ रुपये आणि तूच सांग त्याचं उत्तर.

खेडूत : हा घ्या १ रुपया, मलाही त्याचं उत्तर येत नाही.

25 October 2010

स्वातंत्र्यसैनिक

एकदा प्रौढ शिक्षण वर्ग भरतो.

शिक्षक विचारतात, "सांगा पाहू, स्वातंत्र्यसैनिक कोणाला म्हणतात?"

एक म्हातारा उठतो आणि म्हणतो, "मास्तर, लग्नानंतर प्रत्येक माणसाला स्वातंत्र्यसैनिक म्हणतात."

मतदान

एकदा आमदारपदाची निवडणूक होते. मतदान मोजणी झाल्यानंतर एका आमदाराला धक्काच बसतो.

तो विचारात पडतो. त्याला समजतच नाही,


तो म्हणतो, "च्यामारी, कोण होता तो ज्याने एकट्याने मला मत दिलं."

24 October 2010

Google



गुगल फार वेगवान search engine असेलही, पण ते काही तुम्हाला तुमची देवळात हरवलेली चप्पल शोधून देऊ शकत नाही.



दात आणि जीभ

एकदा दात जिभेला म्हणतो, "मी जर तुला जोरात चावलो, तर तुझे तुकडे होतील."

जीभ दाताला म्हणते, "मी जर एखादयाबद्दल एक चुकीचा शब्द उच्चारला तर एकाच वेळी तुम्ही सर्व ३२ च्या ३२ बाहेर याल."

शहाणे कोण ?

प्राध्यापक : मूर्ख लोक खूपच प्रश्न विचारतात आणि काही वेळा इतके की शहाणासुद्धा वेड्यात निघतो.



विद्यार्थी : तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे सर, परीक्षेच्या वेळी आम्हाला याचा अनुभव येतो.

23 October 2010

अवघड विषय

परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका पाहून असे वाटले की हा पेपर खूपच अवघड आहे, तर एक काम करा.

शांतपणे डोळे मिटा.

मनातल्या मनात स्वत:ला सांगा,

"हा विषय खूप खूप रोचक आणि चांगला आहे;

आणि म्हणूनच,



मला तो पुन्हा द्यायचा आहे."

22 October 2010

MATHS म्हणजे काय ?

प्राध्यापक : MATHS म्हणजे काय ?

















विद्यार्थी : Mentally Affected Teacher Harassing Students.

20 October 2010

अंडे

एकदा एका पोल्ट्री फार्मचा मालक तावातावाने पोल्ट्रीत जातो आणि कोंबड्यांना म्हणतो, "तुम्ही जर रोज २-२ अंडी नाही दिलीत तर मी तुम्हा सगळ्यांना कापून टाकीन."

दुसर्‍या दिवशी तो जाऊन बघतो तर काय, सगळ्या कोंबड्यांनी २-२ अंडी दिलेली. एकानेच फक्त १ अंड दिलेलं.
तो रागाने विचारतो, "तु एकाच अंड का दिलस?"

प्रतिक्रिया : अहो बॉस, हे जे १ अंड दिलय न ते पण तुमच्या भीतीने दिलय. मी तर एक कोंबडा आहे.

17 October 2010

दोन हात

एकजण आपल्या मित्रांना सांगत होता, "अरे, काल काय झालं माहितीये; काल माझी बायको चक्क आपल्या गुडघ्यांवर चालत आली माझ्याकडे."

मित्र : कसं काय रे, हे कसं शक्य आहे? आम्ही तर वहिनींना चांगलच ओळखतो. बरं मग पुढं काय झालं?

पहिला  : अरे, ती आली अन मला म्हणते कशी, "मुकाट कॉटखालून बाहेर या आणि चांगलं माणसासारख दोन हात करा माझ्याशी."

16 October 2010

सरदारजी बनतो शिक्षक

एक सरदारजी एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होतो.

पी.टी. चा तास चालू असताना त्याच्या लक्षात येतं की सर्व मुले फूटबॉल खेळत आहेत, परंतु एक मुलगा मात्र बाजूला शांतपणे उभा आहे.

सरदारजी त्या मुलाकडे जाऊन त्याला विचारतो, "का रे बाळा, तू का खेळत नाहीयेस?"

तेव्हा तो मुलगा मात्र सरदारजीकडे नाराजीने, वैतागलेल्या सुरात पाहत म्हणतो, "सर, मी गोलकीपर आहे."

किती वाजले

एकदा रस्त्याने जाणारा सरदार एका वाटसरुला वेळ विचारतो.

वाटसरु : आता बघा, ४ वाजून ३० मिनिटे झाली आहेत.


सरदार (वैतागून) : काय पण लोकं आहेत, सकाळपासून मी जवळजवळ २०-२५ लोकांना हा प्रश्न विचारला, पण प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिलं.

15 October 2010

न्यूटनचे नियम

सफरचंदाची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण न्यूटनने २ रा आणि ३ रा नियम कसा शोधला माहितीये ?


तो शेळ्या वळत असताना त्याने एका शेळीला "F" एवढा force लावला तर शेळी जोरात ओरडली, mA.
म्हणून न्यूटनने निष्कर्ष काढला : F = mA


पण लगेच शेळीने त्याला लाथ मारली.

तेव्हा न्यूटनला समजलं : For every action, there is equal & opposite reaction.

14 October 2010

तुम्ही वेडे आहात...

तुम्हाला जर कुणी वेडा म्हणाले, 

तर अजिबात दु:खी होऊ नका,
अजिबात रडू नका,
अजिबात घाबरू नका,
अजिबात रागाऊ नका,
अजिबात नाराज होऊ नका,



फक्त एकच करा,
एक ग्लास थंड पाणी घ्या,
आणि विचार करा,








च्यायला, ह्याला कसं काय कळलं.

कॉम्प्लिमेंट

एकदा एका पती-पत्नीला चांगला मराठी चित्रपट पाहायला जायचे होते.
पत्नी बराच वेळ मेकअप करीत होती. पण तिचं मन काही समाधानी नव्हतं.

पत्नी (आरशात बघत) : अहो, आजकाल का कुणास ठाऊक पण मला अगदीच जाड झाल्यागत, वयस्कर आणि ठेंगण असल्यागत वाटतय. माझा तर मुडच गेलाय अगदी. माझा मूड ठीक करण्यासाठी एखादी कॉम्प्लिमेंट द्या की मला.

पती : अरे वा, तुझी नजर अगदी छान आहे या वयात.

13 October 2010

अंतिम इच्छा

एकदा एक कंजूस मारवाडी मरतो.

मरण्यापूर्वी तो आपल्या तीनही मुलांना जवळ बोलवतो आणि त्यांना म्हणतो, "मुलांनो, असं म्हणतात की मरताना माणूस आपल्याबरोबर काहीही घेऊन जात नाही. ही भावना मात्र मी आता खोटी ठरवणार आहे. माझ्याकडे ३ लाख रुपये आहेत. मी ते १ - १ लाख असे तीन लिफाफ्यांत भरले आहेत. मी प्रत्येकाला १-१ लिफाफा देणार आहे. माझी अंतिम इच्छा आहे, की तुम्ही माझे दफन करताना ते लिफाफे माझ्या थडग्यात टाकावेत."

वडिलांच्या अंतिम इच्छेप्रमाणे ते तिघेही आपापले लिफाफे अंतिम विधीच्यावेळी थडग्यात टाकतात.

परत येताना  थोरला मुलगा म्हणतो, "मला मुलांच्या शिक्षणासाठी ४०००० लागत होते, म्हणून मी थडग्यात केवळ ६०००० रुपयेच टाकले."

मग मधला मुलगा म्हणतो, "मला नवीन धंद्यासाठी ६०००० रु हवे होते, म्हणून मी थडग्यात केवळ ४०००० टाकले."

नंतर धाकटा मुलगा म्हणतो, "तुम्ही वडिलांना दिलेला शब्द पाळला नाहीत, पण मी मात्र पाळला. मी थडग्यात पूर्ण १ लाखांचा चेक टाकून आलोय."

कशी जिरवली

नागपूरची एक वृद्ध व्यक्ती आपल्या मुलाकडे पुण्यात राहायला येते.

रोज सायंकाळी तो वृद्ध आपल्या बाजूला राहणार्‍या नाडकर्ण्यांसोबत सारसबागेतफिरायला जातो.
तो वृद्ध नेहमी आपल्या नागपुरी स्टाइलमध्ये सगळ्यांना बोलून बोलून बेजार करतो.

एक दिवस तो बोलता बोलता म्हणतो, "अहो, तुम्हाला माहीत आहे काय, जगातले सगळे शास्रज्ञ यावर संशोधन करत आहेत की माणूस मेंदूशिवाय किती काळ जिवंत राहू शकतो."

यावर नाडकर्णी म्हणतात, "अहो, मग त्यात संशोधन करण्यासारख काय आहे? तुम्ही त्यांना तुमचं वय का नाही सांगत."

छगनचं धाडस

एकदा वेड्यांच्या इस्पितळातील डॉक्टर ठरवतात की वेड्यांची मानसिक स्थिती टवटवीत राहण्यासाठी एक सहल काढायची.
ठरल्याप्रमाणे सहल जाते निसर्गरम्य अशा ठिकाणी. ते जातात धरण पाहायला.

पण तिथे भलतेच घडते. बबन नावाचा वेडा पाण्यात पडतो. त्यावेळी छगन नावाचा वेडा पाण्यात उडी मारून त्याचे प्राण वाचवतो.

सर्व डॉक्टर छगनचे कौतुक करतात. त्याला नीट झाल्याचे समजून इस्पितळातून घरी सोडतात.

ही बातमी जेव्हा सिनीयर डॉक्टरांना समजते, तेव्हा ते छगनच्या घरी जातात.

ते छगनला म्हणतात, "अरे छगन, तू तर अतिशय धाडसाचं काम केलंस. पण त्या बिचार्‍या बबनचं नशीबच खराब म्हणावं लागेल, तू त्याला वाचवलस आणि त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली बघ."

त्यावर छगन म्हणतो, "अहो डॉक्टर, मीच त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सुकण्यासाठी खुंटीला टांगल होतं."

11 October 2010

काहीच नाही

भिकारी : साहेब, एक रुपया द्या की.
साहेब : नाहीयेत, पुढे जा.
भिकारी : साहेब, मग एक भाकरीचा तुकडा द्या ना.
साहेब : ए बाबा, सांगितलं ना एकदा नाही म्हणून.










भिकारी : साहेब, मग एक वाडगा हातात घ्या, आणि चला माझ्याबरोबर.

10 October 2010

मीटर बंद

एकदा एक कंजूस मारवाडी रिक्षातून प्रवास करीत असतो.

अचानक रिक्षाचे ब्रेक फेल होतात.

रिक्षा ड्रायव्हर : सर, रिक्षाचे ब्रेक फेल झालेत. काय करू?


मारवाडी : अरे मूर्खा, पहिलं मीटर बंद कर.

तिकीट तिकीट

एक साधू रेल्वेने प्रवास करत असतो. तेवढ्यात तिकीट चेकर येतो.


चेकर साधूला विचारतो, "कुठे जायचय?"
साधू : जिथे रामाचा जन्म झाला होता, तिथे; अयोध्येला.


चेकर : बरं ठीक आहे, तिकीट दाखवा.
साधू : तिकीट तर नाहीय.




चेकर : चला मग.
साधू : कुठे?


चेकर : जिथे कृष्णाचा जन्म झाला होता, तिथे; जेलमध्ये.

09 October 2010

वाचन

एकदा एक वाचक लायब्ररीत जातो. तो लायब्ररीयनला विचारतो, "अहो, आत्महत्येवरचं पुस्तक मिळेल का?"

लायब्ररीयन : हो, मिळेल की. पण ते मी तुम्हाला नाही देऊ शकत.

वाचक : का हो, का ?

लायब्ररीयन : कारण मला ते परत मिळणार नाही म्हणून.

लग्नाला विरोध

एकदा हत्ती बकरीच्या प्रेमात पडतो.

पण बकरीच्या घरचे या लग्नाला कडाडून विरोध करतात.

का?


कारण,



मुलाचे दात बाहेर आलेले आहेत म्हणून.

08 October 2010

उपचार

रुग्ण : डॉक्टर साहेब, मला नक्की निमोनियाच आहे ना.

डॉक्टर : हो, हो, तुम्हाला नक्की निमोनियाच आहे. एवढं घाबरून जाऊ नका.

रुग्ण : अहो डॉक्टर, मी एका रुग्णाबद्दल असं ऐकलंय, की त्याला निमोनिया होता. डॉक्टर तसा उपचार करत होते, पण नंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्याला टायफॉइड होता. तो रुग्ण मग मेला.

डॉक्टर : काही काळजी करू नका,माझ्यासोबत असं होत नाही कधी. माझ्या रुग्णाला निमोनिया झाला असेल, तर तो निमोनियानेच मरतो.

रिक्षाचे भाडे

एकदा एक कंजूस मारवाडी रिक्षाने प्रवास करतो.

रिक्षाचे भाडे होते १०० रुपये.

रिक्षावाला : साहेब, १०० रुपये झाले.
मारवाडी ५० रुपयांची एक नोट काढतो आणि रिक्षावाल्याच्या हातावर टेकवतो.

रिक्षावाला : साहेब, ही तर गुंडगिरी आहे. मीटरप्रमाणे १०० रुपये झालेत.

मारवाडी : ए भाय, तू पण या रिक्षात माझ्याबरोबर बसून आले ना. मग तुझा पैसा पण मीच द्यायचे काय.

अपघात

एक मोठ्ठा अपघात होतो.

तिथे पडलेला एक माणूस जोरजोराने ओरडत असतो. देवा रे देवा, माझा डावा हात गेला रे.

तेवढ्यात संता त्याला म्हणतो, "अरे ओरडू नकोस, तुझा तर फक्त डावा हातच गेलाय. तिकडे बघ त्या माणसाचं डोकच गेलय, तरी तो एक शब्दही बोलत नाहीये."

बहिरा

जीवशास्राचे प्राध्यापक मोठ्या जोशात मुलांना शिकवत असतात.

ते मध्येच एका मुलाला एक प्रश्न विचारतात. बिचारा मुलगा गोंधळलेला असतो.

प्राध्यापक : ऐकू येत नाही अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल?

मुलगा : सर, त्याला तुम्ही काहीही म्हणा. त्याला ऐकुच येणार नाही.

05 October 2010

धन्यवाद

एक दारुड्या फुल्ल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत, डुलत डुलत चालला होता.





एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले, "चालता येत नाही एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा ?"

दारुड्या : धन्यवाद हवालदार साहेब, तुम्ही मला सांगितल्याबद्दल.
              मला वाटले, मी लंगडा झालोय.

04 October 2010

मोठ्ठं आव्हान

संता : सगळ्यात मोठ्ठं आव्हान कोणतं?




बंता : पूर्ण पेपर कोरा ठेवायचा आणि त्याखाली लिहायचं, "हिम्मत असेल तर पास करून दाखवा."

मेहनत की रोटी

विश्वासराव : खूप मार लागलेला दिसतोय तुम्हाला. नेमकं सांगा तरी काय झालं?

अशोकराव : काय सांगू, रात्री चोरट्यांनी अडवल.

विश्वासराव : अहो, मग देऊन टाकायचं ना मग सगळं काही. कशाला उगीच मार खाल्ला?

अशोकराव : अहो, मी म्हणालो, माझ्याकडचं सगळं घ्या. मी दागिने, पैसे, चेन, घड्याळ, अंगठी आणि अगदी चष्मासुद्धा काढून दिला हो.

विश्वासराव : आणि तरी मग तुम्हाला कसं काय मारलं?

अशोकराव : अहो, नाही नाही म्हणत असतानाही चोर म्हणतात कसे, "हम मेहनत की रोटी खाते है, फुक्कट की नही."

03 October 2010

कमाई

तीन मित्र असतात. एकाचे वडील वकील, दुसर्‍याचे डॉक्टर आणि तिसर्‍याचे मंत्री असतात.
त्यांची आपल्या वडिलांच्या दिवसभरातील कमाईबाबत चर्चा चालू असते.

वकिलाचा मुलगा : माझे वकील सकाळी कोर्टात जातात, संध्याकाळी येताना ते जवळपास ३००० रुपये कमवून  आणतात.

डॉक्टरचा मुलगा :  माझे वडील एक ऑपरेशन करतात आणि केवळ तीन तासात १०००० रुपये कमवून आणतात.

मंत्र्याचा मुलगा : हे तर काहीच नाही, माझे वडील केवळ २० मिनिटांचे भाषण देतात आणि एवढा पैसा गोला करतात की तो घरी आणायला ४ माणसे पुरत नाहीत.

01 October 2010

देव कुठे आहे ?

गुरुजी मुलांना विचारतात, "सांगा पाहू, देव कुठे आहे ?"


सगळी मुलं विचार करू लागतात.
तेवढ्यात बंड्या म्हणतो, "सर, माझ्या वडिलांनी पाहिलाय. ते रोज सकाळी उठून बाथरूमसमोर थांबतात आणि म्हणतात; "अरे देवा लवकर बाहेर ये."

दान


एका मारवाड्याकडे पैसे नसल्याने तो जाम वैतागला होता. त्याने कळवळून देवाची प्रार्थना केली.

हे भगवान, मला शंभर रुपये दिलेस, तर त्यातले पन्नास रुपये मी तुझ्या दानपेटीत टाकीन.

थोडे पुढे गेल्यावर त्या मारवायाला पन्नास रुपयांची नोट सापडते.

नोट उचलत मारवाडी म्हणाला, हे भगवान, माझ्यावर एवढाही विश्वास नाही? आपले पन्नास रुपये आधीच कापून घेतलेस !

मित्राचा खून


न्यायाधीश : का रे, तु तुझ्या मित्राचा खून दगडाने ठेचून ठेचून का केलास?

आरोपी : सायब, आमी गरीब माणसं ! आमच्याकडं रायफल, बंदूक कशी असणार? दगड फुकटात मिळत्यात. म्हणूनशान मी त्याला ठेचूनच मारला बगा.

सारेगमप



एक छोटा डास त्याच्या आईला विचारतो, मी गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊ का?

आई : कोणता कार्यक्रम आहे?

छोटा डास : पल्लवी जोशींचा सारेगमप कार्यक्रम.

आई : जा, पण जरा सांभाळून रहा. कारण तिथे लोक सारखे टाळ्या वाजवित असतात.

मी भारतीय


काळोखातून आवाज आला, “थांब, कोण आहे रे तिकडे?”

उत्तर आले, “मी भारतीय.”

मग ‘जण-गण-मन’संपूर्ण म्हणा.


“मला संपूर्ण येत नाही.”




“ठीक आहे, म्हणजे तुम्ही नक्कीच भारतीय आहात; तुम्ही जाऊ शकता.”

रात्री


शिक्षक : मुलांनो, सांगा पाहू एका वर्षात कोटी रात्री येतात? बंड्या तु सांग.

बंड्या : सर, दहा !

शिक्षक : दहा? फक्त दहा? कशा ते सांग पाहू.

बंड्या : सर, नऊ नवरात्री आणि एक महाशिवरात्र !!!

गावचा सरपंच

पहिला वेडा : मी आपल्या गावचा सरपंच आहे.

दूसरा वेडा : तुला कोणी केल सरपंच?

पहिला वेडा : कोणी म्हणजे काय, प्रत्यक्ष परमेश्वरान केल.

दूसरा वेडा : काहीतरीच काय, मी कधी केल तुला सरपंच?

मुंग्या


तीन मुंग्या होत्या. त्या रस्त्याने चालल्या होत्या.

पहिली मुंगी : माझ्या मागे दोन मुंग्या आहेत.

दुसरी मुंगी : माझ्या पुढे एक आणि मागे एक मुंगी आहे.

तिसरी मुंगी माझ्या मागे दोन मुंग्या आहेत.

सांगा पाहू, कसे काय?

कारण, तीनही मुंग्या गोल गोल फिरत होत्या.

श्रेष्ठ


संता : सांग बर, हत्ती श्रेष्ठ की मुंगी श्रेष्ठ ?

बंता : मुंगी.

संता : कसे काय?
 
बंता: : मुंगी हत्तीच्या पायाखालून जाऊ शकते, पण हत्ती मुंगीच्या पायाखालून जाऊ शकतो का?

करतबगारी

शत्रूंची दाणादाण उडवल्यानंतर मेजर बहादुरसिंगानी एका सैनिकाला विचारले, की या लढाईत तु कसली करतबगारी दाखवलीस ?  

सैनिक म्हणाला, ‘सर, मी शत्रूकडच्या एका सैनिकाचा पायच उडविला.
पायाऐवजी तु त्याच मुंडक उडवायला हव होतस, मेजर म्हणाले.
"सर, मुंडक आधीच कुणीतरी उडवल होत," त्या शूर सैनिकाने सांगितले.

शादी



राहुल : माँ, तुम्हारी वजह से मेरी शादी नही हो रही है ।

सोनिया : क्युं बेटा ?

राहुल : जिधर भी देखो पोस्टर में लिखा है, सोनिया को बहु मत दो ।

पी पी पी

एक दूधवाला रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दूध पिऊन टाकतो... का?

कारण,

मागून गाडी हॉर्न वाजवते...पी...पी...पी...

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...