एकदा एक कंजूस मारवाडी मरतो.
मरण्यापूर्वी तो आपल्या तीनही मुलांना जवळ बोलवतो आणि त्यांना म्हणतो, "मुलांनो, असं म्हणतात की मरताना माणूस आपल्याबरोबर काहीही घेऊन जात नाही. ही भावना मात्र मी आता खोटी ठरवणार आहे. माझ्याकडे ३ लाख रुपये आहेत. मी ते १ - १ लाख असे तीन लिफाफ्यांत भरले आहेत. मी प्रत्येकाला १-१ लिफाफा देणार आहे. माझी अंतिम इच्छा आहे, की तुम्ही माझे दफन करताना ते लिफाफे माझ्या थडग्यात टाकावेत."
वडिलांच्या अंतिम इच्छेप्रमाणे ते तिघेही आपापले लिफाफे अंतिम विधीच्यावेळी थडग्यात टाकतात.
परत येताना थोरला मुलगा म्हणतो, "मला मुलांच्या शिक्षणासाठी ४०००० लागत होते, म्हणून मी थडग्यात केवळ ६०००० रुपयेच टाकले."
मग मधला मुलगा म्हणतो, "मला नवीन धंद्यासाठी ६०००० रु हवे होते, म्हणून मी थडग्यात केवळ ४०००० टाकले."
नंतर धाकटा मुलगा म्हणतो, "तुम्ही वडिलांना दिलेला शब्द पाळला नाहीत, पण मी मात्र पाळला. मी थडग्यात पूर्ण १ लाखांचा चेक टाकून आलोय."
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.