Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

28 July 2014

खतरनाक प्रयोग

प्रयोगाचे नाव : आपल्यावर खरे प्रेम कुणाचे याचा शोध घेणे.

साहित्य : घड्याळ, दोन खोल्या, स्वत:चा कुत्रा व स्वत:ची बायको

कृती :
१.     कुत्र्याला एका खोलीत सोडून बाहेरून दार लावून घ्यावं.
२.     तत्क्षणी, बायकोलाही दुसर्‍या खोलीत सोडून बाहेरून दार लावावं.
३.     लगेचच घड्याळात वेळ पाहून तिची नोंद करून ठेवावी.
४.     किमान दोन तासांनी पहिल्यांदा कुत्रा असलेल्या बंद खोलीचा दरवाजा उघडावा आणि कुत्र्याचे तुमच्याप्रती असलेले निरीक्षण वहीत नोंदवावे.
५.     आता बायको असलेल्या खोलीचा दरवाजा उघडावा आणि बायकोचे तुमच्याप्रती असलेले निरीक्षण वहीत नोंदवावे.
६.     खालीलपैकी योग्य ते निरीक्षण नोंदवा.

निरीक्षण :
                    १.  कुत्रा/बायको चावला/ली.
                     २. कुत्रा पळाला/बायकोने घटस्फोट दिला.
३                   कुत्र्या/बायकोने धुडगूस घातला.


(कृपया, हा प्रयोग करताना योग्य ती काळजी घ्यावी. आपल्यास भयंकर शारीरिक आणि मानसिक इजा होऊ शकते. आणि हो, आम्ही यास कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.)


आदर व्यक्त करण्याची पद्धत


जुनी पिढी मोठ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी

डोक्यावर टोपी असेल तर ती काढायचे

आणि आताची पिढी कानातला हेडफोन काढते.

साक्षर की निरक्षर?


एक माणूस दुकानात जातो आणि दुकानदाराला एका वस्तूकडे बोट दाखवून विचारतो, “हा फ्रीज केवढ्याला?
दुकानदार : आम्ही निरक्षर लोकांना वस्तू विकत नाही.

मग तो माणूस घरी जातो आणि दुसर्‍या दिवशी केस कापून, दाढी करून आणि मस्त पावडर लावून दुकानात जातो. पुन्हा दुकानदाराला तोच प्रश्न विचारतो.

पण दुकानदार पुन्हा तेच उत्तर देतो.

पुन्हा तो माणूस घरी जातो, नवीन कपडे घालतो आणि परत येतो. पुन्हा दुकानदाराला विचारतो, “हा फ्रीज केवढ्याला?
तरी पण दुकानदार तेच उत्तर देतो.

मग तो माणूस वैतागून दुकानदाराची गचांडी धरतो आणि म्हणतो, “काय रे भामटया? नीट सांगतो का कच्चा खाऊन टाकू?


दुकानदार गयावया करत म्हणतो, “अहो साहेब, तो फ्रीज नाही, वाशिंग मशीन आहे.”

घंटा माहितीये?

एक अमेरिकन आपला देश बघायला येतो आणि एका खेड्यातील एका मजुराच्या घरी राहतो.

तो त्या मजुराला विचारतो, “तुम्हाला काही प्रश्न विचारू का?
मजूर : हो, विचारा की.

अमेरिकन : तुम्हाला अणुउर्जेबद्दल काय वाटतं?
मजूर : ते काय असतं?

अमेरिकन : तुम्ही अशिक्षित दिसता. असोत.
मजूर : बरं साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का?

अमेरिकन : हो, हो. विचारा ना.
मजूर : हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही मंदिरांमध्ये घंटा असते. तर, ख्रिश्चन मंदिरातील घंटा ही हिंदूंच्या मंदिरातील घंटेपेक्षा मोठी का असते?

अमेरिकन : अं, माहीत ना.

मजूर : मला माहीतच होतं की तुम्ही जरी अणुऊर्जेच्या बाता मारत असला तरी तुम्हाला काय घंटापण माहीत नसणार.

20 July 2014

जरूर वाचा : The Fact...?

एकदा एक मुलाखतकार उमेदवाराला प्रश्न विचारतो.

मुलाखतकार : तुम्ही तुमचा आधीचा जॉब का सोडला?


उमेदवार : त्या कंपनीने इथलं ऑफिस बंद केलं आणि दुसरीकडे गेली. पण मला सांगितलंच नाही कुठे ते.


जाहिरातीचे तंत्र


एकदा एका इमारतीत दोन रेस्टोरंट होती.

एकाने आपल्या हॉटेलबाहेर बोर्ड लावला, “या शहरातील सर्वोत्तम हॉटेल.”
हे पाहून दुसर्‍याने बोर्ड लावला, “महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल.”

मग पहिल्याने बोर्ड बदलला, “या देशातील सर्वोत्तम हॉटेल.”
मग दुसर्‍यानेही बोर्ड बदलला, “जगातील सर्वोत्तम हॉटेल.”


मग मात्र पहिल्याचा पारा चढला आणि त्याने बोर्ड लावला, “या इमारतीतील सर्वोत्तम हॉटेल.”


हुशार कामगार


एकदा दोन कामगार कामाच्या प्रचंड ताणामुळे वैतागलेले असतात.
एकजण दुसर्‍याला म्हणतो, “हुश्श, खूप थकलोय. हा मॅनेजर काही सरळ सरळ मागून एक दिवसाची सुट्टी देईल असं वाटत नाही. बघ मी आता काय करतो ते.”

असं म्हणून तो डोकं खाली अन पाय वर अशारीतीने पंख्याच्या हुकला लटकतो.
हे मॅनेजर पाहतो आणि त्याला म्हणतो, “हे काय रे? काय चाललंय हे?

कामगार : साहेब मी बल्ब झालोय.
मॅनेजर : जास्त काम करून तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. असं कर, आजच्या दिवस सुट्टी घे.

मग हा कामगार त्या मॅनेजरला धन्यवाद देऊन दुसर्‍या कामगाराकडे बघून स्मितहास्य करत निघून जातो.
पण दूसरा कामगारही काही कमी नसतो.

तो पण ह्या पहिल्या कामगाराच्या मागे मागे चालायला लागतो.
हे पाहून मॅनेजर त्याला विचारतो, “तुला सुट्टी दिलेली नाहीये. तू कुठे चाललास?


दूसरा कामगार : साहेब, मी अंधारात काम नाही करू शकत.

खोटं बोल, पण रेटून बोल


एकदा वर्ग भरायच्या अगोदर दोन विद्यार्थी आपापसांत भांडत होते.
तेवढ्यात शिक्षिका वर्गात येतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही का भांडत आहात?

विद्यार्थी : आम्हाला १ हजार रुपयांची नोट सापडली आणि जो सर्वात मोठ्ठं खोटं बोलेल त्यालाच ती मिळेल असं ठरवलंय. 

पण मी मोठ्ठं खोटं बोललो असल्याने ती मलाच मिळायला हवी.

शिक्षिका : काय रे नालायक कार्टी आहेत. अरे लाजा वाटतात का तुम्हाला यासाठी भांडायला? अरे, मी तुमच्या वयाची होते ना, तेव्हा खोटं बोलणं काय असतं हेसुद्धा माहीत नव्हतं मला.


दोन्ही विद्यार्थी एकमेकांकडे पाहतात आणि ती १ हजारांची नोट बाईंना देतात.

व्याकरणाचा अभ्यास : काळ ओळखा


एक गृहिणी आपल्या मुलांचा अभ्यास घेत असते.

ती आपल्या मुलाला व्याकरणातला एक प्रश्न विचारते, “सांग बरं, मी सुंदर आहे; या वाक्याचा काळ कोणता?


बाजूला बसलेला नवरा पटकन म्हणतो, “अर्थातच, भूतकाळ.”


देवा तुला शोधू कुठं...?

एक इंजिनियरिंगचा विद्यार्थी देवाचे असे आभार मानतो.


ए देवा, सर्वेश्वरा, या वाढणार्‍या महागाईच्या जमान्यात एक लिटर पेट्रोल ६० वरून ८० रुपयांवर गेलं;

एक रुपया ४० वरून ६० वर-७० वर गेला;

सगळं काही महागलं;

पण तरीही आमचे पासिंगचे मार्क ४० वरंच ठेवल्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद.


शून्याचा शोध


तुम्हाला हे माहिती आहे का, की शून्याचा शोध कसा लागला?


" 0 "


मग मी सांगतो.

जेव्हा आर्यभट्टाने त्याच्या एका शिष्याचा पेपर चेक केला ना,

तेव्हा त्याला शून्याचा शोध लागला.


19 July 2014

फुकटचा सल्ला जपून द्या.

एक माणूस रस्त्याने चाललेल्या भिकार्‍याला थांबवत विचारतो, “का रे, भीक का मागतोस? ही खूप वाईट गोष्ट आहे.”

भिकारी : साहेब, तुम्ही कधी भीक मागितली आहे का?

माणूस : नाही. का?


भिकारी : मग तुम्हाला कसं माहीत की ही वाईट गोष्ट आहे ते?

16 July 2014

सपनो की रानी?

बायको : मी तुमच्या स्वप्नात येते का हो?

नवरा : नाही.

बायको : का?


नवरा : मी झोपताना हनुमान चालीसा वाचून झोपतो.

15 July 2014

हॉकी टीमचा कोच कोण?


कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चनने स्पर्धकाला एक प्रश्न विचारला, “भारताच्या महिला हॉकी टीमचा कोच कोण?


स्पर्धकाने उत्तर दिले, “शाहरुख खान.”

14 July 2014

OMG !!!


एक माणूस कुत्र्यांच्या दुकानात एक कुत्रा विकत घेण्यासाठी गेला.
ग्राहक : तुमचा कुत्रा चावतो का?

दुकानदार : नाही.

मग ग्राहक एका कुत्र्याच्या जवळ जाऊन त्याला गोंजारू लागतो, तर तो कुत्रा त्याला चावतो.

ग्राहक : विव्हळत...तुम्ही तर म्हणालात की तुमचा कुत्रा चावत नाही म्हणून.


दुकानदार : हो. पण तो माझा कुत्रा नाहीय.


08 July 2014

गोत्र


एकदा एका मुलाचं एका मुलीशी लग्न ठरतं.

त्यांचं एकमेकांशी बोलणं होतं. त्यावेळी मुलगी मुलाला म्हणते की तू नालायक आहेस.

अर्थातच, ते दोघं हे लग्न मोडायचं ठरवतात.

आई-वडील त्यांना कारण विचारतात.


तेव्हा मुलगा म्हणतो, “ती म्हणते की आपलं गोत्र एकच आहे.”

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...