एक अमेरिकन आपला देश बघायला येतो आणि एका
खेड्यातील एका मजुराच्या घरी राहतो.
तो त्या मजुराला विचारतो, “तुम्हाला काही प्रश्न विचारू का?”
मजूर : हो, विचारा की.
अमेरिकन : तुम्हाला अणुउर्जेबद्दल काय वाटतं?
मजूर : ते काय असतं?
अमेरिकन : तुम्ही अशिक्षित दिसता. असोत.
मजूर : बरं साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का?
अमेरिकन : हो, हो.
विचारा ना.
मजूर : हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही
मंदिरांमध्ये घंटा असते. तर, ख्रिश्चन मंदिरातील घंटा
ही हिंदूंच्या मंदिरातील घंटेपेक्षा मोठी का असते?
अमेरिकन : अं,
माहीत ना.
मजूर : मला माहीतच होतं की तुम्ही जरी
अणुऊर्जेच्या बाता मारत असला तरी तुम्हाला काय घंटापण माहीत नसणार.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.