Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

27 September 2012

अण्णा हजारेंपासून सावधान !!!


अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा सरकारविरोधात आंदोलन छेडलं, तेव्हा भले-भले घाबरले. आता काहीतरी क्रांती वगैरे होणार म्हणून सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या.

यामुळं केवळ भ्रष्टाचारी, राजकारणी लोकच नव्हे तर चक्क एक चौथीचा विद्यार्थीपण घाबरला.

तो आपल्या वर्गमित्रांना म्हणाला, “अरे, कुणीतरी आवरा या अण्णांना. यांना नाही आवरलं तर आपल्या इतिहासाच्या पुस्तकात अजून एक धडा येईल.”

02 September 2012

शेक्सपियरला ई-मेल


संता एकदा शेक्सपियरला ई-मेल पाठवतो.

त्याचा मित्र म्हणतो, “अरे मूर्खा शेक्सपियर तर मेलेलाय ना.”

संता : मग त्यात घाबरायचं काय एवढं? त्यानेही मला परत उत्तर नाही पाठवलेलं.

देशपांडेंचा रुग्ण


पु.ल. वाचून अनेकजण प्रेरित होतात.
त्यातलीच ही एक व्यक्ती.

या व्यक्तीचा एक पाय तुटतो. त्याला रुग्णालयात भरती केले जाते.

त्याच्या खाटेच्या बाजूला एक रुग्ण झोपलेला असतो. त्या रुग्णाचे दोन्ही पाय तुटलेले असतात.

ही व्यक्ती त्याला विचारते, “काय हो, तुम्हाला दोन बायका आहेत का?

पैसे सुट्टे नाहीत...


संता एकदा केस कापायला जातो. अगदी निग्रोसारखे बारीक केस कापून येतो.

केस कापून आल्यावर त्याचा मित्र त्याला विचारतो, “तू केस एवढे बारीक करून का आलास?

संता : काय करणार? वरचे तीन रुपये सुट्टेच नव्हते. मग न्हाव्याला म्हणालो, अजून तीन रुपयांचे काप.

संताचं भविष्य

संता एकदा ज्योतिषाला आपला हात दाखवतो आणि आपलं भविष्य विचारतो.
ज्योतिषी : ठीक आहे. मला तुझी कुंडली दाखव.

संता ज्योतिषाच्या हाती एक पुस्तक देतो.
ज्योतिषी त्या पुस्तकाचे समोरचे, मधले आणि सगळ्यात मागचे पान उघडून वाचतो.

मग संताला म्हणतो,तुला एक मुलगा आहे आणि तू आताच ५ किलो गहू घेऊन आला आहेस.
संता खुश होतो आणि म्हणतो,काका, तुम्ही तर अंतर्यामी आहात.

ज्योतिषी : “अरे गाढवा, पुढच्यावेळेस येताना रेशनकार्ड घरी ठेऊन ये आणि कुंडली आण.

01 September 2012

लपाछपी एक महागडा खेळ


जोशीकाकांची बायको त्यांना म्हणते, “चला आपण आज लपाछपी खेळुया.”
जोशीकाका एकदम दचकतात. आज कसं काय हिला खेळावसं वाटतंय म्हणून.

बायको : आधी राज्य तुमच्यावर. मी लपते, मग तुम्ही मला शोधा. मी तुम्ही मला शोधलंत तर आपण “बिग बझार”ला जावूयात.

जोशीकाका तिच्या या खेळकर बोलण्यातला “ट्विस्ट” ओळखतात.
मग ते म्हणतात, “ आणि जर तूच मला सापडली नाहीस तर?”

बायको : तर काय? मी लपायला थोडीच लांब माझ्या माहेरला जाणार आहे. इथेच तर दारामागे लपणार आहे.

हुशार कंडक्टर


बसथांब्यावर बस थांबते. त्यात दोन महिला चढतात.
बसमध्ये केवळ एकच सीट रिकामी असते.

दोन्ही महिला पटकन सीटजवळ जातात आणि आधी कुणी सीट धरलं म्हणून भांडू लागतात.
कंडक्टर या प्रकाराने वैतागतो.

कंडक्टर या सीटवर कोण बसणार याचा फैसला सुनावतो.
कंडक्टर : या सीटवर तुमच्यापैकी जी बाई जास्त वयाची असेल, तीच बसेल.

आणि...

ती सीट बसच्या शेवटच्या थांब्यापर्यंत रिकामीच राहते.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...