Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

30 June 2011

जादुई चष्मा


एक आजोबा डॉक्टरकडे जातात. त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.

डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.

आजोबा : डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?

डॉक्टर : हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.

आजोबा : अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची. मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे...वा, वा, वा !!!

29 June 2011

झीरो फिगर


एक जाडजूड बाई आपलं वजन कमी व्हावं म्हणून दवाखान्यात येऊन म्हणते की तिला करीना कपूरसारखं झीरो फिगर व्हायचंय.

बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?

डॉक्टर : ५० वेळा.

बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?

डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.

28 June 2011

पोलिसाचा सल्ला


एक वाहतूक पोलीस चौकात वाहतुकीचे नियमन करीत असताना त्याला एक माणूस माकड आपल्या खांद्यावर घेऊन जाताना दिसला.

वाहतूक पोलिसाने त्याला बजावले, "ए भाऊ, त्या प्राण्याला प्राणिसंग्रहालयात घेऊन जा पाहू."

काही दिवसांनी पुन्हा त्या वाहतूक पोलिसाला तो माणूस माकडासमवेत जाताना दिसला.

वाहतूक पोलीस : का रे, तुला मी काय सांगितलं होतं? विसरलास काय?

माणूस : नाही हो. मी त्यादिवशी माझ्या या प्रिय माकडाला तिथे घेऊन गेलो होतो. आज त्याला चित्रपटाला घेऊन जातो आहे.

आम्हाला शिकवा तुम्ही sss...


बंड्या : बाबा, बाबा, हे बघा प्रगतिपुस्तक.

बाबा : काय रे हे मूर्खा??? हे काय??? १०० पैकी गणितात ३५, विज्ञानात २१, भूगोलात गोल म्हणजे शुन्य...अभ्यासाच्या नावानी बोंब आहे नुसती..., मठ्ठ कुठला.

बंड्या : अहो बाबा, हे प्रगतिपुस्तक मला त्या वरच्या माळ्यावर पडलेल्या जुन्या दप्तरात सापडलं. आई म्हणत होती की हे तुमचं आहे, आणि त्यावेळी तुम्ही ५ वीला होतात ना तेव्हा पाडलेला प्रकाश दिसतोय यातून.

27 June 2011

पेट्रोल लय महाग झालंय भाऊ


एक स्कूटरचालक रस्त्याने चालला होता.

त्याला एक भली मोठी, अवाढव्य अशी बाई आडवी आली. पुढचा रस्ताच दिसेना.

तो घाबरला न मग काय दिली एक जोरदार टक्कर.

बाई : काय रे मुडदया, तुला समोरून चाललेली माणसं दिसत नाहीत काय?

स्कूटरचालक : माफ करा बाई. पण काय आहे की पेट्रोल फारच महाग झालंय ना त्यामुळे तुम्हाला एवढा मोठा गोल वळसा घालून जाणं मला परवडलं नसतं.

26 June 2011

व्यसनाधीन संता


संता आपल्या वडिलांसमोर सिगारेट पित बसला होता.

बंता : अरे, तू तुझ्या वडिलांसमोर सिगारेट ओढतोस?

संता : मग काय झालं? ते माझे वडील आहेत, पेट्रोल पंप नाहीत.

साल २०२२


फेसबूकच्या यशाचा कानमंत्र


फेसबूक एवढं यशाच्या शिखरावर कसं काय पोचलं बरं?
त्यात काय एवढं,
त्यांनी फक्त आयुष्याचं एक साधं-सोप्पं तत्वज्ञान वापरलं.

ते हेच की,

माणसाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यापेक्षा दुसर्‍याच्या आयुष्यातच जास्त रस असतो.

म्हणजे आपल्या गावठीत...

आपलं ठेवायचं झाकून अन दुसर्‍याचं पाहायचं वाकून.

25 June 2011

धातूंपासून काय बनते?


रसायनशास्राचे प्राध्यापक यंत्रशास्राच्या प्राध्यापकांना प्रश्न करतात,सांगा बरं, टंगस्टन, आयोडीन आणि लोह या धातूंपासून कोणतं हत्यार बनतं?

यंत्रशास्राच्या प्राध्यापकांना मात्र उत्तर काही येत नाही.

कारण मुळातच आयोडीनचा संबंध टंगस्टन आणि लोहाशी जोडून कुठला मिश्रधातू (alloy) तयार होतो, हे कदाचित तुम्हीही सांगू शकणार नाही.

तरीही प्रयत्न करून पहा.

ते भयानक हत्यार कोणतं असेल त्याची कल्पना करून पहा.

हरलात? तर खाली वाचा.
.
.
.
.
.
.
ते भयानक हत्यार म्हणजे...बायको.

आश्चर्यचकित झालात? कसं ते सांगतो.

बायको म्हणजे WIFE म्हणजे (W+I+Fe)

24 June 2011

वट्पोर्णिमेचा महिमा


प्रत्येक बाई वट्पोर्णिमेला वडाच्या झाडाला फेरे मारून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून का बरं प्रार्थना करत असते?
.
.
.
.
.
.
कारण,

या जन्मात नवर्‍याला जे प्रशिक्षण (training) दिलंय ते वाया जाऊ नये आणि पुढच्या जन्मी पुन्हा नव्याने मेहनत घ्यावी लागू नये म्हणून.

23 June 2011

शाळेत जाण्याआधी


बंड्याला शाळेत घालण्यासाठी त्याचे बाबा त्याला घेऊन शाळेत जातात.

तेथील मुख्याध्यापक बंड्याची मुलाखत घेतात.

मुख्याध्यापक : तुझं नाव काय?

बंड्या : बंडोपंत धोंडोपंत खेकडे.

मुख्याध्यापक : बरं बंडूबाळ, तू जेवणापूर्वी प्रार्थना करतोस काय?

बंडू : नाही, कारण माझी आई चांगलं जेवण करते.

22 June 2011

दारुड्याची ऐश(?)


एक दारुडा हातभट्टीतून फुगा घेऊन घरी येतो.

जेवताना तो हळूच फुगा काढून बायकोची नजर चुकवत ग्लासमध्ये थोडी दारू ओततो.

पण, त्याची चाणाक्ष बायको मात्र त्याला पकडते.

बायको : काय हो, तुम्हाला हजारदा सांगूनही अजिबात डोक्यात बसत नाही का दारू प्यायची नाही म्हणून? नुसती ऐश करत जगायची सवय लागलीय. जरा बायको-पोरांचा तरी विचार करा की.

दारुड्या नवरा तो दारूचा ग्लास त्याच्या बायकोच्या तोंडाला लावतो आणि तिला थोडीशी दारू पाजतो.

बायको : छी ! थू ! कित्ती घाण वास येतोय?

दारुड्या नवरा : पाहिलंस? आणि तू म्हणतेस की मी ऐश करतोय म्हणून.

21 June 2011

20 June 2011

जमाना बदलही गया



बायको : आपलं नवीन नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा तुम्ही मला जास्त खाऊ घालायचा आणि आता मात्र नाही, असं का?


नवरा : आता तुला जेवण बनवायला चांगलं जमतंय.


सरदारजीची मुलाखत भाग ३





मॅनेजर : तुमचं लग्न झालं का?

सरदारजी : हो, एका मुलीशी झालं.

मॅनेजर : अहो, लग्न मुलीशीच होतं ना.

सरदारजी : असं काय म्हणता सर, माझ्या बहिणीचं लग्न मुलाशी झालंय.

बोध



बाबा रामदेव ह्यांना अटक झाली ह्यावरून आपण काय बोध घ्यावा..?
.
.
.
.

.
.
.
.
.
.
लहानपणी आजी खरे बोलत होती कि...जेवण नाय केले तर पोलीस पकडून नेतील.




From : विशाल कोंडे, पुणे


धन्यवाद.

19 June 2011

बत्ती गूल


एका मारवाड्याची बायको आजारी असते.

त्याच्या घरात मात्र त्यादिवशी वीज नसते त्यामुळे सगळं अंधार पसरलेला असतो.

तो मग एक मेणबत्ती पेटवतो.

आता बायको जास्त आजारी असल्याने डॉक्टरला बोलावून आणायला त्याला जावंच लागणार होतं.

मारवाडी : अगं, मी आत्ता जातो आणि डॉक्टरसाहेबांना घेऊन येतो. हे बघ, जर तुला वाटलंच की तू आता वाचणार नाहीस, तर मग ही मेणबत्ती मात्र विझवून टाक बरं.

पाहुणचार







एका मारवाड्याच्या घरी पाहुणे येतात.

मारवाडी : तुम्ही काय घेणार? थंड की गरम?

पाहुणे : अं, दोन्ही...

मारवाडी : (बायकोला) अगं, दोन ग्लास पाणी आण बरं. एक ग्लास फ्रीजमधलं आणि एक ग्लास गिझरमधलं.

18 June 2011

भविष्य









प्राणिसंग्रहालयात एक माकड दुसर्‍या माकडाचा हात बघून त्याचं भविष्य सांगतं,मला तुझं भविष्य अंधकारमय दिसत आहे. तू पुढं जाऊन माणूस बनणार आहेस.

सवाल-जवाब


गुरुजी : मुलांनो, A च्या नंतर काय येतं?
.
.
.
बंड्या : (जरा विचार करून) ए, क्या बोलती तू?

17 June 2011

सत्यवचनी कर्मचारी

एक कर्मचारी ऑफिसच्या वेळेत बाहेर जाऊन केस कापून येतो.

बॉस : ऑफिसच्या वेळेत तुम्ही केस कापायला का गेलात?

कर्मचारी : ते ऑफिसच्या वेळेतच वाढले होते ना, म्हणून.

बॉस : केस तर तुम्ही घरी असताना पण वाढतातच की.


कर्मचारी : काय बोलताय तुम्हीपण. मी पण काय टक्कल थोडंच केलंय. जेवढे ऑफिसमध्ये वाढले, तेवढेच कापलेत.

खरा वाघ



खरा वाघ तोच जो बाथरूममध्ये सीलिंगला पाल चिकटलेली असतानाही पूर्ण आंघोळ करून बाहेर येतो.


काय काय बायका पण ना...

त्यांना नुसती दुसर्‍यांचीच पडलेली असते. नुसत्या प्रश्न विचारत असतात.

बंड्या, तुमच्या घरात कोण कोण राहतं?

तुझे वडील काय करतात? त्यांना पगार किती आहे?

आई काय करते?

तू कितवीला आहेस?


बंड्या : काकू, तुम्ही सीबीआयमध्ये जा.

भारतातली सर्वकालीन सर्वोत्कृष्ट विद्यापीठे

तुम्हाला माहितीये,  भारतातली सर्वकालीन सर्वोत्कृष्ट विद्यापीठे कोणती आहेत ती?

ती आहेत.

1. पानवाल्याची टपरी

2. न्हाव्याचं दुकान

3. बेवडा माणूस

4. रेल्वेचा जनरल डब्बा

हा कुणावर गेला?


एक काळ्या रंगाचा मुलगा खूप वैतागलेला असतो.

कारण त्याच्या रंगाकडे बघून सगळे त्याला चिडवत असतात.

तो वैतागून जातो आणि गोठ्यात जाऊन बसतो.

तिथे एक म्हैस टाकलेला हिरवा चारा खाऊन रवंथ करीत बसलेली असते.

म्हशीकडे बघून तो चिडून म्हणतो,बघ, सगळे कसे मला चिडवतात मी तुझ्यासारखा काळा दिसतो म्हणून.

म्हैस गालातल्या गालात हसत म्हणते,तू माझं दूध पिलास आणि बिलकुल माझ्यावर गेलास.

16 June 2011

मुंबईचा भैय्या


एक नुकताच गावाहून आलेला मराठी माणूस एका भैय्याच्या टॅक्सीने प्रवास करत असतो.

मराठी माणूस : मुझे तो टॅक्सी से सफर करते टाइम एक ही बात का डर लगता है, और वो है, ब्रेक।

भैय्या : डरो मत साब, इस टॅक्सी को ब्रेक नही है।

15 June 2011

सत्य


गुरुजी : बंड्या, सांग बरं. लहान मुलांमध्ये आणि इतर प्राण्यांच्या पिलांमध्ये काय फरक आहे तो?

बंड्या : गुरुजी, गाढवाचं पिलु गाढव असतं, माकडाचं पिलु माकड असतं, परंतु माणसाचं मूल मात्र गाढव, माकड, दोन्हीही असू शकतं.

14 June 2011

तेरी मेहेरबानिया !!!




नाडकर्णी साठेना एक किस्सा सांगतात.

नाडकर्णी : अहो, रोज सकाळी माझा कुत्रा वर्तमानपत्र स्वत:च्या तोंडात धरून मला आणून देतो ना, तेव्हा तो शेजारचा नागपुर्‍या रागाने लालबुंद होतो बघा.

साठे : का बरं? त्याचा काय संबंध?

नाडकर्णी : कारण, ते वर्तमानपत्र त्याच्याकडे टाकलेलं असतं वर्तमानपत्रवाल्याने.

मिशा कापायच्यात?




एका भैय्याने मुंबईत आल्यावर तोडकी-मोडकी मराठी शिकला आणि केशकर्तनालय टाकलं.

त्याच्याकडे एक गिर्हाइक आलं.

भैय्या : मिशा काढायच्या की ठेवायच्या?

गिर्हाइक : ठेवायच्या.

भैय्या मिशा काढतो आणि त्या गिर्हाइकाच्या हातात देत म्हणतो,ह्या घ्या तुमच्या मिशा आणि कुठे ठेवायच्या त्या ठेवा.

13 June 2011

कोड


एका रिक्षावाल्याला पोलीस अडवतो.

पोलीस : रिक्षा गॅसवर आहे?
रिक्षावाला : नाही.


पोलीस : मग डिझेलवर आहे?
रिक्षावाला : नाही.


पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
रिक्षावाला : नाही.


पोलीस : अरे मग कशावर आहे?
रिक्षावाला : हफ्त्यावर.

आळशीपणाचा कळस?


सरदारजीचे वडील : का रे, आज पेपर होता ना? मग परीक्षेला का गेला नाहीस?

सरदारजी : पेपर खूप अवघड होता?

वडील : परीक्षेला न जाताच तुला कसं काय कळलं?

सरदारजी : दोन दिवसांपूर्वीच पेपर फुटला होता, तो वाचून.

12 June 2011

खेळ खल्लास !!!


एका मोठ्या स्टेशनरीच्या दुकानात एक लहान मुलगा नेहमीप्रमाणे येतो.

त्याच्याकडे बघताच दुकानाचा मालक आनंदित होऊन दुकानातील आपल्या सगळ्या ग्राहक आणि 
कामगारांना सांगतो की हा मुलगा एक नंबरचा बावळट आणि मूर्ख आहे. मी हे सिद्ध करून दाखवतो.

तो मग मुलाला हाक मारतो.

दुकानदार आपल्या उजव्या हातात १०० रुपयांची नोट धरतो तर डाव्या हातात १० रुपयांच्या दोन नोटा धरतो.

आता त्या मुलाला म्हणतो, “तू डाव्या किंवा उजव्या कुठल्याही एका हातातल्या नोटा घेऊ शकतोस.”

यावर तो लहान मुलगा दुकानदाराच्या डाव्या हातातल्या १० रुपयांच्या दोन नोटा घेतो.

दुकानदार : (ग्राहकांना आणि कामगारांना उद्देशून) बघा मी म्हटलं नव्हतं, की हा किती बावळट आहे ते. वेडा कुठला.

तो मुलगा मात्र शांतपणे तिथून निघून जातो आणि बाजूच्याच दुकानात आईसक्रीम खातो.

तो दूसरा दुकानदार या लहानग्याला विचारतो, की हा रोज तुझी टिंगल करतो, तर उडवतो, चेष्टा करतो की तू बावळट आहेस म्हणून. तरीपण तू १०० ची नोट घेण्याऐवजी १० च्या नोटा का घेतोस?


मुलगा : अहो काका
, मी ज्यादिवशी १०० ची नोट घेईन त्यादिवशी हा सगळा खेळ खल्लास नाही का होणार.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...