एका मोठ्या स्टेशनरीच्या दुकानात एक लहान मुलगा नेहमीप्रमाणे येतो.
त्याच्याकडे बघताच दुकानाचा मालक आनंदित होऊन दुकानातील आपल्या सगळ्या ग्राहक आणि
कामगारांना सांगतो की हा मुलगा एक नंबरचा बावळट आणि मूर्ख आहे. मी हे सिद्ध करून दाखवतो.
तो मग मुलाला हाक मारतो.
दुकानदार आपल्या उजव्या हातात १०० रुपयांची नोट धरतो तर डाव्या हातात १० रुपयांच्या दोन नोटा धरतो.
आता त्या मुलाला म्हणतो, “तू डाव्या किंवा उजव्या कुठल्याही एका हातातल्या नोटा घेऊ शकतोस.”
यावर तो लहान मुलगा दुकानदाराच्या डाव्या हातातल्या १० रुपयांच्या दोन नोटा घेतो.
दुकानदार : (ग्राहकांना आणि कामगारांना उद्देशून) बघा मी म्हटलं नव्हतं, की हा किती बावळट आहे ते. वेडा कुठला.
तो मुलगा मात्र शांतपणे तिथून निघून जातो आणि बाजूच्याच दुकानात आईसक्रीम खातो.
तो दूसरा दुकानदार या लहानग्याला विचारतो, की हा रोज तुझी टिंगल करतो, तर उडवतो, चेष्टा करतो की तू बावळट आहेस म्हणून. तरीपण तू १०० ची नोट घेण्याऐवजी १० च्या नोटा का घेतोस?
मुलगा : अहो काका, मी ज्यादिवशी १०० ची नोट घेईन त्यादिवशी हा सगळा खेळ खल्लास नाही का होणार.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.