Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

25 November 2012

नियम कुणाला माहीत...???...???

एकदा दोन सरदारांच्या ट्रकची आमनेसामने धडक होते.

दोघेजण खाली उतरून भांडू लागतात.

पहिला सरदार : मी तुला हेडलाईट चालू करून पास दिला होता ना. दिसत नाही का तुला?

दूसरा सरदार : मी पण माझ्या ट्रकचे वायपर चालू करून “नाही, नाही” म्हणून इशारा दिला होता तुला.

लढवा शक्कल, बघा बायकोची अक्कल

नवरा बायकोत एकेदिवशी जोरदार भांडण होतं.

नवरा रागा-रागाने मेडिकलमध्ये जाऊन विषाची बाटली घेऊन येतो.
घरात येऊन बायकोसमोर ते बाटलीभर विष पितो.

परंतु,

नवरा काही मरत नाही, तर फक्त आजारी पडतो.
मग बायकोचा पारा चढतो.

ती म्हणते, तुम्हाला हजारदा सांगितलं की कधी काही वस्तु विकत घेतली तर ती चांगली आहे का ते व्यवस्थित बघून घेत चला म्हणून. आता पैसेही गेले अन ज्या कामासाठी पैसे घालवले ते तर काही झालं नाही.

14 November 2012

संधीसाधू



प्रोफेसर साठे वर्गात किचकट विषय शिकवत असतात.
(अर्थातच; विषय सोपा असतो, पण तो किचकट करून शिकवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नसतं.)

ते मुलांना शिकवताना सारखे सारखे प्रश्न विचारत असतात.
ह्या मास्तराच्या अशा वागण्याने सगळी पोरं वैतागलेली असतात.
साठे मग एक अभिनव कल्पना अमलात आणण्याचं ठरवतात.

ते मुलांना म्हणतात, “हे बघा, जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल, त्याला एक लेक्चर ऑफ घेता येईल.”

तेवढ्यात एक मुलगा हातातला पेन साठे सरांच्या दिशेने भिरकावतो.
साठे सर : कुणी फेकला रे पेन?

मुलगा : सर, मी. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता मला एक लेक्चर ऑफ लावा पटकन.

12 November 2012

वाचलो बुवा

संता एकदा रस्त्याने जात होता.

त्याच्या अंगावर विजेची तार पडते.

तो आता तडफडून तडफडून मरणार, तोच त्याच्या लक्षात येतं कि अरेच्चा; दोन दिवसांपासून गावात वीजच नाहीये.


मग तो उठून बसला, स्वत:शीच हसला आणि म्हणाला, “च्यायला, वीज गेलीय हे माझ्या वेळीच लक्षात आलं नसतं तर मेलो असतो. वाचलो बुवा.


This Really Works…Diwali Special


नवरा ऑफिसमधून सुटल्यावर बायकोला एक मेसेज पाठवतो की,मी घरी येईपर्यंत माझे सगळे कपडे धुवून ठेव आणि जेवण तयार करून ठेव.

पण,

उत्तरादाखल बायकोचा काहीही मेसेज येत नाही.

मग नवरा पुन्हा एक मेसेज पाठवतो,आज मला दिवाळीचा मस्त बोनस मिळालाय म्हणून आज येताना मी नवीन कार घेऊन येत आहे.

बायकोचा लगेच मेसेज येतो,अय्या...खरंच???

नवरा त्याला उत्तर म्हणून मेसेज पाठवतो,काही नाही. जास्त खुश नको होवूस. मला फक्त खात्री करायची होती की तुला माझा पहिला मेसेज मिळाला की नाही याची.

वा रे सरदारजी...

दिवाळीत सरदारजीने नवीन दुचाकी घेतली.
दिवाळी संपल्यावर सरदार रोज ऑफिसला येण्याजाण्यासाठी दुचाकी वापरू लागला.

एके दिवशी ऑफिस संपल्यावर सरदार आपली दुचाकी ढकलत ढकलत घरी जाऊ लागला.
हे पाहून ऑफिसमधल्या सहकार्‍याने सरदारला विचारले, “क्यु सरदार भाई? गाडी को धक्का मारते हुए क्यु जा रहे हो? क्या हुवा इसे?

सरदार : क्या करू? मै गाडी की चाबी घरपेही भूल आया.

सहकारी : तो आप सुबह गाडी लेके कैसे आए?

सरदार : कैसे मतलब? ऐसेही धक्का लगाते आया जी. 

10 November 2012

पुणेरी फेरीवाला


फेरीवाला जरी असला तरी तो पुणेकर असल्यास...

एक फेरीवाला आपली चाकू-सूर्‍यांना धार लावायची सायकल घेऊन गल्लोगल्ली फिरत असतो.
फेरीवाला : धार लावणार...चाकू-सूर्‍यांना धार लावणार...ssss धारवाला......ssss

एक नागपूरकर नुकतेच पुण्यात राहायला आलेले असतात.

दुसर्‍याची टिंगल करण्याच्या आपल्या सवयीप्रमाणे ते धारवाल्याला म्हणतात, “काय रे, अकलेलापण धार लावून देतो का?

पुणेरी फेरीवाला : हो, देतो की. जरा घेऊन या बरं तुमची अक्कल.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...