Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

04 February 2013

पुण्याची आपत्कालीन यंत्रणा


एकजण रस्त्यात झाड पडले आणि रस्ता बंद झाला म्हणून आपत्कालीन यंत्रणेला फोन करतो.

बराच वेळा फोन लावून ती व्यक्ती वैतागते कारण कुणीच फोन उचलत नसतं.

अर्ध्या तासाने फोन उचलला जातो.

हा माणूस चिडून म्हणतो, च्यायला, मी काय मूर्ख आहे का हजारदा फोन करायला? माझं डोकं फिरलंय का?

पलीकडून आवाज येतो, सॉरी, नंबर चुकीचा आहे. ही पुण्याची आपत्कालीन यंत्रणा आहे, हॉस्पिटल नाही....आणि फोन ठेऊन दिला जातो.

सरदारजीचा अपघात


दोन सरदारजींच्या गाड्यांची समोरासमोर टक्कर होते.

दोघे भांडू लागतात.

पहिला सरदार : आंधळा कुठला? दिसत नाही का?

दूसरा सरदार : , टक्कर मी तुला मारलीय. मग मी आंधळा कसा?

पप्पांची भविष्यवाणी


बंड्या : पप्पा, तुम्ही ज्योतिषी आहात.
पप्पा : कसा काय?

बंड्या : सहा महिन्यांपूर्वी तुम्ही सांगितलं होतंत की मी कधी पास होऊ शकत नाही म्हणून.

पोल-खोल


एका प्यूनचा ऑफिसात पहिला दिवस असतो.

त्यादिवशी मालक ऑफिसात येतात.

मालक त्या नवीन प्यूनला बोलावून घेतात आणि विचारतात,तुम्हाला मॅनेजरने काम काय करायचे ते समजावून सांगितले का?

प्यून : हो. ते म्हणाले, मी जरा डुलकी घेतो. साहेब आले की मला उठव.

सरकारी उत्तर


एक सरकारी कर्मचारी घोड्यांच्या रेसवर पैसे लावतो आणि नशिबाने जिंकतोही.

त्याचा बॉस हे ऐकून खुश होतो आणि त्याला सल्ला देतो की अशी हुशारी ऑफिसातपण दाखवलीस तर तुला बढती मिळेल.

कर्मचारी : हो. बरोबर आहे साहेब. मी ऑफिसच्या वेळेतच रेसवर पैसे लावले आणि जिंकलो.

03 February 2013

चूकच झाली...


एक पुणेकर म्हणजे जोशीकाका आणि एक नागपुरकर काका शेजारी शेजारी राहत असतात, पुण्यात.
एक दिवस नागपूरकर काकांच्या घरी पाहुणे येतात.

ते चुकून चपला जोशीकाकांच्या दरवाजासमोर काढतात.

हे नवे लोक असल्याने एकदम चपला भिरकावून देण्यापेक्षा यांना पुण्याचे नियम सांगावे म्हणून जोशीकाका नागपूरकर काकांच्या घरी तावातावाने जातात.

जोशीकाका : हे बघा. तुमच्या पाहुण्यांनी आमच्या घरासमोर चपला काढल्यात. त्या आधी उचला नाहीतर त्या मिळवण्यासाठी कचरा-डेपोत जावे लागेल आणि पुन्हा असले नखरे आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला चांगला सज्जन समजत होतो मी आणि तुम्हाला एवढं कळत नाही?

नागपूरकर काका : अहो जोशी, मीपण तुम्हाला चांगला सज्जनच समजत होतो.

जोशीकाका : हो. तुम्ही बरोबरच समजत होतात. चूक माझीच झाली.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...