Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

28 May 2012

वाडा की गोठा?


एकदा दोघे प्रवासी पुणे दर्शनाला पुण्यात आलेले असतात.

तेव्हा रात्री मुक्काम करायला ते भाड्याची एखादी खोली मिळते का ते शोधत असतात.
ते सदाशिव पेठेतील एका वाड्याजवळ येऊन पोचतात.

ते तिथेच उभ्या असलेल्या एका वृद्ध आजोबांना विचारतात, “अहो आजोबा, इथे आम्हाला मुक्कामासाठी एखादी भाड्याची खोली मिळेल का?

आजोबा चष्म्याच्या वरून दोघांकडे खालून वरपर्यंत आणि मग वरून खालपर्यंत असा काही हिणवल्यासारखा कटाक्ष टाकतात की ते दोघे प्रवासी एकदम बिचकतात.

आजोबा त्यांना एका पडक्या वाड्याची खोली दाखवतात.

ती खोली पाहून त्यातला एक प्रवासी म्हणतो,अहो, ही कसली खोली? हा तर गोठा आहे गोठा.

आजोबा त्याच्याकडे पुन्हा एक कटाक्ष टाकतात.

मग दूसरा प्रवासी म्हणतो,बरं असू देत. गोठा तर गोठा. या खोलीचे भाडे किती आजोबा?

आजोबा : एका बैलाचे ३०० रुपये आणि दोन बैलांचे ५०० फक्त.

19 May 2012

भुक लागली?


साठे सरांच्या बाजूला एक नागपूरकर कुटुंब राहायचं.
साठे सरांचा मुलगा सकाळी नाश्ता करायला बसला की ह्या नागपूरकरांचा पोरगा कुठून तरी वास आल्यासारखा सरांच्या घरी यायचा.
आजपण तो आला.

मुलगा : काकू, राजू आहे का घरी?
साठे सरांची बायको : हो आहे ना. आताच तयार झालाय. नाश्ता करतोय. जरा थांब हं. बरं, तुला भूक लागलीय ना?
मुलगा : हो हो.

आता साठे सरांनी ओळखलं की आता आपली बायको ह्याला ४ चपात्या वाढणार आणि हा सोकावलेला बैल निर्लज्जाप्रमाणे हादडणार.

मग ते प्रसंगावधान राखून म्हणाले, “अरे बाळ, मग आमच्या राजुचा नाश्ता होईपर्यंत घरी जाऊन तूही नाश्ता करून ये बघू.”

11 May 2012

आता तरी देवा मला पावशील का?



एक सरदार देवाला प्रार्थना करतो की, “हे देवा, मला लॉटरी लागू दे.”

मग अशी प्रार्थना तो रोज करू लागतो. त्यातच ११ वर्षे निघून जातात.

शेवटी ११ वर्षांनी देव वैतागून त्याच्यासमोर प्रकट होतो आणि त्याला म्हणतो, “अरे मूर्खा, आधी लॉटरीचं तिकीट तर घे.”

07 May 2012

रेल्वेचा कंडक्टर

बंड्या शाळेतून घरी आल्यावर अंगणात तुळशीभोवती रेलगाडी रेलगाडी खेळत असतो.

त्याचे वडील बाजूलाच त्याचा खेळ बघत बसलेले असतात.

बंड्या तुळशीला वेढे घालत असतो आणि एक वेढा झाला की मोठयाने ओरडत असतो, “ज्या कुणा मूर्खांना चढायचंय त्यांनी चढून घ्या, ज्या मूर्खांना उतरायचंय त्यांनी उतरून घ्या.”

असे त्याचे ८-१० वेढे होतात.

मग मात्र तिथे बसलेल्या त्याच्या वडिलांचं डोकं भणभणू लागतं.

वडील जोराने ओरडतात, “काय रे काय चाललंय हे? जा गप्प बस बघू तिकडं.”

बंड्या गपचूप निमूटपणे बाजूला जाऊन बसतो.

थोडा वेळ झाला की बंड्याला पुन्हा एकदा रेलगाडी खेळायची इच्छा होते.
तो पुन्हा तुळशीपाशी जाऊन तुळशीला एक वेढा मारतो आणि म्हणतो, ज्या कुणा मूर्खांना चढायचंय त्यांनी चढून घ्या, ज्या मूर्खांना उतरायचंय त्यांनी उतरून घ्या. आधीच एका मूर्खामुळे गाडी तासाभराने उशिरा आलीये.”

का बरं?


तापलेल्या तव्यावर मक्याचे दाणे टाकले तर ते तडातडा का उडतात?

सांगा बरं?

नाही सांगता येत?

बरं जाऊ द्या.

त्यापेक्षा एकदा तापलेल्या तव्यावर बसूनच बघा, म्हणजे कळेल.

05 May 2012

उदाहरण द्या...


शिक्षक : त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली, या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.

बंड्या : गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता.

03 May 2012

वर्गाचा CPU


गणिताचा तास संपलेला असतो आणि इतिहासाचे शिक्षक वर्गात येईपर्यंत वर्गात मुलांचा धिंगाणा चालू होतो.

मुलांचा गोंधळ कमी करण्यासाठी एक मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो, “सगळ्यांनी शांत बसा नाहीतर मी गोंधळ करणार्‍यांची नावे फळ्यावर लिहीन.”

बंड्या त्याला विचारतो, “काय रे, तू कोण आमची नावं लिहिणार? गप खाली बस.”

मुलगा : मी वर्गाचा Monitor आहे.

बंड्या : मग मी वर्गाचा CPU आहे, समजलं?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...