बंड्या शाळेतून घरी आल्यावर अंगणात तुळशीभोवती रेलगाडी रेलगाडी
खेळत असतो.
त्याचे वडील बाजूलाच त्याचा खेळ बघत बसलेले असतात.
बंड्या तुळशीला वेढे घालत असतो आणि एक वेढा झाला की मोठयाने
ओरडत असतो, “ज्या कुणा मूर्खांना चढायचंय त्यांनी चढून घ्या, ज्या मूर्खांना उतरायचंय त्यांनी उतरून घ्या.”
असे त्याचे ८-१० वेढे होतात.
मग मात्र तिथे बसलेल्या त्याच्या वडिलांचं डोकं भणभणू लागतं.
वडील जोराने ओरडतात, “काय रे काय चाललंय हे? जा गप्प बस बघू तिकडं.”
बंड्या गपचूप निमूटपणे बाजूला जाऊन बसतो.
थोडा वेळ झाला की बंड्याला पुन्हा एकदा रेलगाडी खेळायची इच्छा
होते.
तो पुन्हा तुळशीपाशी जाऊन
तुळशीला एक वेढा मारतो आणि म्हणतो, “ज्या कुणा मूर्खांना चढायचंय त्यांनी
चढून घ्या, ज्या मूर्खांना उतरायचंय त्यांनी उतरून घ्या. आधीच
एका मूर्खामुळे गाडी तासाभराने उशिरा आलीये.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.