Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

27 July 2013

पुणेकराची शिकवणी

एक नागपूरकर : काय हो तुम्हाला मेंदू आहे का?

पुणेकर : हो, आहे की.

नागपूरकर : मग काय त्याच्यापर्यंत तुमच्या शरीरातलं रक्त पोहोचत नाही का?

पुणेकर : नाही ना.

नागपूरकर : तरीच...तुम्ही असे तिरसट स्वभावाचे आहात.

पुणेकर : हो, असेल कदाचित. काय हो, याचा अर्थ तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा चांगलाच होतोय म्हणायचं की.

नागपूरकर : (पुणेकराने एवढ्या सहजपणे आपली लाज घालवून घेतली या खुशीत) म्हणजे काय???


पुणेकर : म्हणजे काय माहितीये? याचं तुम्हाला वैज्ञानिक उत्तर देतो बघा. याचा अर्थ असा की द्रव पदार्थ हा नेहमी रिकाम्या जागेकडे वाहतो, हा नियम इथे लागू पडतो.

भन्नाट डोक्याचा सरदार

एक उद्योगपती सरदार अमेरिकेत वास्तव्यास असतो.

तो तेथील बँकेत जाऊन आर्थिक अडचणीसाठी दहा हजार डॉलरचं कर्ज मागतो आणि दोन आठवड्यांनंतर भारतातून परत येताना तो ही रक्कम आणून कर्ज फेडण्याचं आश्वासन देतो.

बँक त्याला गॅरंटी म्हणून बँकेकडे काय गहाण ठेवणार म्हणून विचारते?
सरदार त्याची नवी कोरी फेरारी बँकेकडे ठेवण्याचं मान्य करतो.

बँक त्याला कर्ज देते आणि ही महागडी कार सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात ठेवते. दोन आठवड्यांनी सरदार परत आल्यावर बँकेचे कर्ज म्हणून दहा हजार डॉलर आणि व्याज म्हणून १०० डॉलर अशी रक्कम परत करतो.

बँक त्याला विचारते, “तुम्ही करोडपती असताना केवळ १०००० डॉलरसाठी ही ३ लाख डॉलरची गाडी चक्क गहाण का ठेवलीत?


तेव्हा सरदार म्हणतो, “त्याचं काय आहे, भारतात महत्वाच्या कामासाठी तातडीने जावं लागणार होतं. तेव्हा गाडी कुठे पार्क करणार हा मोठा प्रश्न होता. तो प्रश्न १०० डॉलरमध्ये असा सोडवला.”

नोकरीसाठी…

एक उमेदवार नोकरी मागण्यासाठी एका नामांकित कंपनीत गेला.

त्याचा तो ज्या पदासाठी नोकरी मागत होता, त्याच्याशी काहीएक संबंध नव्हता.

साहजिकच, मॅनेजरने त्याला नकार दिला.

मॅनेजर : मला क्षमा करा. पण तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडं काहीही काम नाहीये.


उमेदवार : अहो साहेब, कामाची चिंता करू नका. तुम्ही मला फक्त नोकरी द्या. तुमच्याकडे मी कधीही कामाची मागणी करणार नाही.

अदृश्य पोलीसमामा

एकजण चौकात सिग्नलला लाल दिवा असताना आपली गाडी दामटतो.

झाडामागे लपलेले पोलीसमामा चटकन गाडीसमोर येऊन त्याला बाजूला घेतात.

मामा : काय रे, लाल दिवा दिसला नाही का?


तो : साहेब, लाल दिवा दिसला की. पण तुम्ही नाही दिसलात ना.


माशीही पिते लस्सी?

एकदा सरदार एका हॉटेलात लस्सी प्यायला गेला.

तर त्या लस्सीत चक्क माशी पडली होती.

तेव्हा सरदारने वेटरकडे त्याची तक्रार केली.


वेटर : अहो साहेब, त्यात काय एवढं? एवढुशी माशी किती लस्सी पिणार आहे?

23 July 2013

कोण होईल मराठी करोडपती? : १

सचिन खेडेकर : रुपये १ करोडचा हा प्रश्न तुमच्यासमोर.

“खालीलपैकी पर्यायांपैकी Electronic Funds Transfer या पद्धतीनंतरची पैसे transfer करण्याची सर्वात वेगवान पद्धत कोणती? आणि पर्याय आहेत...

अ) पासबुक
ब) धनादेश
क) मनीऑर्डर
ड) लग्न”

स्पर्धक : ड) लग्न वर शिक्का मारा.

सचिन खेडेकर : राजे) लग्न या पर्यायावर शिक्का मारा.


आणि......काय आश्चर्य, स्पर्धक करोडपती होतो.

16 July 2013

AIR INDIA


जेवणाची वेळ झाल्यावर एयर इंडियाच्या विमानात एक हवाईसुंदरी एका प्रवाशाला विचारते, “तुम्हाला भोजन हवंय का?

प्रवाशी : यात पर्याय कोणकोणते आहेत?


हवाईसुंदरी : फक्त दोनच, हो किंवा नाही.

07 July 2013

बोधगयातील बॉम्बस्फोटाचा तपास

बोधगयातील विश्वप्रसिद्ध बौद्ध मंदिरात आठ बॉम्बस्फोट झाल्यावर संशयितांना पकडण्यासाठी बिहारच्या
मुख्यमंत्र्यांनी एक पथक नेमायचं ठरवलं. तशा पोलिसांना सूचना दिल्या.

पोलीस महासंचालकांनी नुकतंच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तीन सरदारांना बोलावून घेतलं.
त्यातल्या पहिल्या सरदारला त्यांनी संशयिताचा एक फोटो दाखवून विचारलं, “याला तू शोधू शकतोस?

पहिला सरदार : हो, नक्कीच. कारण, याला एकच डोळा आहे. तेव्हा एक डोळा असलेला माणूस सहज पकडून आणीन.

पोलीस : अरे मूर्खा, तो त्याचा एका बाजूने काढलेला फोटो होता.
ते हाच फोटो दुसर्‍याला दाखवतात.

दूसरा सरदार : हो, नक्कीच. कारण, याला एकच कान आहे. तेव्हा एक कान असलेला माणूस सहज शोधून आणीन.

पोलीस साहेब आपल्या कपाळाला हात मारतात. ते हाच फोटो तिसर्‍या सरदारला दाखवून म्हणतात, “ऐकलंस ना. तू तरी शहाण्यासारखं विचार करून उत्तर दे.”

तिसरा सरदार : हो, नक्कीच. कारण, हा डोळ्यांत कॉनटॅक्ट लेन्सेस घालतो. तेव्हा याला सहज शोधून आणीन.

साहेब हे उत्तर ऐकून आश्चर्यचकित होतात. ते त्या संशयिताचा बायोडेटा तपासतात, तर काय आश्चर्य ते खरंच असतं. हे तिसर्‍या सरदारची हुशारी पाहून त्याला विचारतात, काय रे? तुला फोटो पाहून हे कसं कळलं?”

तिसरा सरदार : अहो साहेब, त्याला एकच कान आहे म्हणजे तो चष्मा घालू शकत नाही. म्हणजेच तो लेन्स वापरत असणार ना.

06 July 2013

सरदारची इंग्रजी

सरदारजी इंग्रजीचा क्लास लावतो आणि थोडंफार शिकलेला असतो.

तो एकदा हॉटेलात जातो. जेवण वगैरे झाल्यावर तो हात धुवायला वॉश बेसीन कडे जातो.

पण, तिथे तो हात धुण्याऐवजी ते वॉश बेसीनच धुवायला लागतो.

हॉटेलचा मालक धावत जाऊन त्याला थांबवतो आणि विचारतो, “पाजी, हे काय करताय तुम्ही?


सरदार म्हणतो, “अहो मालक, तुम्हीच तर इथे बोर्ड लावलाय ना? WASH BASIN.

05 July 2013

SARDAR IS ALWAYS COOL…

एक सरदार पेट्रोल पंपावर आपल्या स्कूटीमध्ये पेट्रोल भरायला जातो.

तिथे भाव वाढल्याने एक माणूस सहज त्या सरदारला म्हणतो, “पाजी ये पेट्रोल दिन ब दिन महंगा होता जा रहा है. हमारे जैसे आम आदमी का तो बॅंड बज गया है.”

सरदार : लेकीन हमको कुछ फरक नही पडता सर जी. हम हमेशा १०० रु का ही पेट्रोल डालता हू गाडी मे.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...