Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label puneri. Show all posts
Showing posts with label puneri. Show all posts

03 July 2019

NO PARKING


पोलिसांनी बोर्ड लावला.....

"NO PARKING ZONE"
Penalty  ---  Rs 250/-

(कुणीच Care केले नाही,अगदी बोर्ड समोरच गाड्या लावल्या)

मग एका पुणेरी माणसाने
NO आणि PENALTY अक्षर पुसले आणि बोर्ड असा झाला...

( PARKING  ZONE Rs ---- 250/- )

कुणीच गाडी पार्क नाही केली..😁

वेलकम टू पुणे ...

🙏😆😆😂😂😅😅🙏

25 June 2019

पुणेरी पाटी @ मंगल कार्यालय

पुण्याला एकदा लग्नाला एका मस्त 🏨 hotel मध्ये गेले होते. तिथे पोचले तर दोन दारं🚪🚪 होती. एकावर लिहिलं होतं,
१. नवरीचे पाहुणे. आणि दुस-यावर
२. नव-याचे पाहुणे.

मी नवरीच्या दारात शिरलो.  पुन्हा दोन दरवाजे 🚪🚪
१. स्त्री.
२. पुरुष.

मी पुरुष लिहिलेल्या दारात शिरलो.
पुन्हा दोन दरवाजे. 🚪🚪

१. अहेर आणलेले पाहुणे.
२. अहेर न आणलेले पाहुणे.

मी अहेर न आणलेले या दारातून आत शिरलो.
आणि पाहिले तर होटेलचं पाठीमागं बाहेर पडायचं दार होते. 🚪

तिथे एक पाटी होती ज्यावर लिहिलं होतं,
"मग काय इतक्या महागाईच्या दिवसात चांगल्या होटेल मध्ये येवुन अहेर न आणता काय फुकटात खाऊन पिऊन जाणार होता? प्रश्र्णच नाही. टा टा बाय!" 👋🏼👋🏼

एकटेच हसू नका, पुढे पाठवा.  😂😂😂😂😂

31 May 2019

राशीभविष्य

लग्न झालेले नवरे शक्यतो..

पेपरमध्ये राशी भविष्य बघत नाहीत

📰

ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात..

आजचा दिवस कसा जाणार??

😝😝😜😆😆😆😆😂😂

Ohh my God...

विमानामध्ये सर्वांना दारू देतील पण
भारतीय लोकांना जास्त दारू का देत नाही माहिती आहे?

🤔🤔

विमानामध्ये 4-5 ग्लास दारू पिल्यानंतर वेगवेगळ्या देशातील माणसांच्या प्रतिक्रिया....... 😇

इंग्लड : I will sleep now 😴

अमेरिका : I want to work on internet. 😁😁

जर्मनी  : I will watch movies now. 😏😏

चीन : I will listen to music now.😎😎

भारतीय :  आता विमान mi  चालवणार .!!🤣🤣🤣

आदरणीय गडकरी जी...

आदरणीय गडकरी जी,

काय होतं माहितीए का
महामार्गावर  *घरी कुणीतरी वाट पाहत आहेत*  असा फलक लावल्यामुळे लोक उत्सुकतेपोटी गाड्या भरधाव चालवतात आणि अपघात होतात . आणि शिवाय घरी कोणीच आलेलं नसतं.

त्यापेक्षा
*घरी बायको वाट पहात आहे* असा फलक लावा, नाय लोकांनी वेग निम्मा केला तर बघा. रमत गमत उद्या परवा पोचतील .

😬😉😉😉😜😜😜😜😝😝😝😝😝😝🙏🏼🙏🏼🙏🏼

*10 yr challenge..*


2009-
इंजिनिअरिंगला लै स्कोप आहे,
आपण इंजिनीअरिंग करू मग लाईफ सेट.....

2019-
भावा, एक लिंक पाठवतो अँप डाउनलोड कर तुला पन्नास येतील मला पन्नास येतील.

😝😝😝😝😝

पुण्यातील 9 प्रकारचे शाकाहारी लोक...

पुण्यातील 9 प्रकारचे शाकाहारी लोक...

1.शुद्ध शाकाहारी.
2.अंड खातो पण चिकन नाहीं खात.
3.अंड्याचा केक खातो पण आमलेट खात नाहीं .
4. रस्सा खातो पण चिकन पीस नाही खात.
5. बाहेर खातो पण आमच्या घरी बनवत नाही.
6. फक्त "पिताना" खातो बाकी वेळेस नाही.
आणि सगळ्यात important
7. लग्ना अगोदर खायचो पण "आता" खात नाही.

खतरनाक -
8. खाताना "माळ" "काढुन" ठेवतो..
😂😂😂😂😂

आणि लास्ट पण बेस्ट.

9. खातो पण बायकोला माहीत नाही*

😎😝😜😃😃😃

पुणेरी trick

पोलिसांनी बोर्ड लावला.....

"NO PARKING ZONE"
Penalty  ---  Rs 250/-

(कुणीच Care केले नाही,अगदी बोर्ड समोरच गाड्या लावल्या)

मग एका पुणेरी माणसाने
NO आणि PENALTY अक्षर पुसले आणि बोर्ड असा झाला...

( PARKING  ZONE
Rs ---- 250/- )

कुणीच गाडी पार्क नाही केली..😁

वेलकम टू पुणे ...

🙏😆😆😂😂😅😅🙏

विमान चालक

पुण्याहुन  गोव्याला जाणारे विमान भयानक वादळात अडकले.
विमानातील सर्व प्रवाशी घाबरले. विमानचालकाने पण इच्छाशक्ती सोडली.
सर्वजण देवाला प्रार्थना करू लागले.
.
पण तेवढ्यात एक व्यक्ती उठते
आणि विमान चालकाला बाजुला सारुन स्वतः विमान त्या वादळातुन सुखरूप गोव्याला पोहचवते.
गोवा सरकारकडुन त्याचा सत्कार होतो.
.
त्याला विचारतात इतक्या अवघड परिस्थीतीत तुम्ही  वादळातुन विमान कस काय काढलत.
.
त्यावर ती व्यक्ती बोलली.
" मी माळवाडी ड़ेपो मधे PMPML चा ड्रायवर आहे. माळवाडी ते हडपसर (202) गाडी चालवतो
तुळशीबाग मधुन गाडी काढतो राव
वादळ क्या चीझ है..🤪

काही...

पुणेकर सहजासहजी कोणालाही डोक्यावर घेत नाहीत.....
मग ते हेल्मेट
असो की दुसरं काही...

😇😂

पुणेरी शंका

आपल्या परंपरेत...
मुर्ती नसेल तर *सुपारी* ठेवतात,

पत्रिका दिल्यावर *विडा* नसल्यास
*सुपारी* देतात

पुजेला बायको नसेल तर...
*सुपारी* कमरेला बांधतात.

तसे,
..
..
.
.
.
.
*हेल्मेट* ऐवजी
खिशात *सुपारी* ठेवली तर चालेल का...?

... *एक आपली*......
*पुणेरी शंका* ..?😜

😂😝😎😆😉

10 November 2016

जादू


एक पुणेरी दुकानदार आपल्या दुकानाबाहेर एक पाटी लावतो.


उधारी म्हणजे एक जादू आहे. उधार दिले कि ग्राहक गायब होतो.


24 October 2015

रिक्षावाला


एकदा एक पुणेकर नागपूरला गेला.

तिथे एका रिक्षावाल्याला हात केला. रिक्षा थांबली.

पुणेकर : सीता-बर्डीला जाणार का?

रिक्षावाला : हो.

पुणेकर : किती घेणार?

रिक्षावाला : २०० रुपये.

पुणेकर : ५० देईन.

रिक्षावाला : अहो, ५० रुपयांत कोण नेतं? नाही जमणार.

पुणेकर : नेतो ना मी. तुम्ही मागे बसा.

 

12 August 2015

लाड

पुण्यात भलते लाड चालत नाहीत.

एक मुलगा बाबांना म्हणतो, “बाबा, बाबा, मला ब्लॅकबेरी नाहीतर अॅपल पाहिजे."


बाबा : नालायका, फणस आणलाय तो संपव आधी.


06 August 2015

प्रामाणिक पुणेकर(ही) असतात बरं का...

पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावलेला होता.

“आमच्याइथे दारू पिणारा आयुष्यात हमखास लखपती होतोच होतो. *

*...जर तो आधी करोडपती असेल तर.



सूचना : वरील बोर्ड नीट वाचा, भिकार्‍यासारखे १० वेळा आम्ही कधी लखपती होणार म्हणून विचारायला येऊ नये. अपमान करण्यात येईल.


26 July 2015

एलिअन पुण्यात

एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवरएक अवकाश यान येते..

आकाशातून मोठी लाईट मारुन एलिअन घोषणा करतात..

" आजपासून पुणे आमच्या ताब्यात 
आहे..!! "
.
.
. .
.
.
.
खालून कुलकर्णी काकू: ते काही असू दे... पण गाडी गेट समोर लावायची नाही.


                                                                        ...फेसबूकवरुन साभार


09 June 2015

काय जमाना आहे...



आजकालची तरुण पिढी,
लगेच रस्ता बदलून पुढे जाते,

फक्त त्यांना कुणीतरी सांगायला पाहिजे,
.
.
.
.
.

की पुढे मामा लोकं पावत्या फाडताहेत.


05 May 2015

काय ऐकतोय मी हे?

एकदा एक पुणेकर नागपुरात विधानसभा बघायला गेले होते.

तिथे ते एका समोसे विकणार्‍या विक्रेत्याकडे रोज समोसे खात असत.

(एक दिवस) पुणेकर : काय हो, आज समोसे फारसे चवदार लागत नाहीयेत. कालचे उत्तम होते.

विक्रेता : हे पण कालचेच है ना भौ.


मग पुणेकराने पुढे त्याचा कसला अपमान केला असेल ना, च्या मारी...

04 February 2015

तुम्ही हसताय की रडताय ते कमेंटमध्ये लिहा.


एक मुलगी रस्त्याने जाणार्‍या रिक्षावाल्याला हात करते.

रिक्षा थांबते.

रिक्षावाला : कुठे जायचं मॅडम?

मुलगी : घरी.

रिक्षावाला : पत्ता?


मुलगी : काय नालायक आहे? माझ्या घरचा पत्ता मी का सांगू तुला?

15 September 2013

हॉटेलच्या शोधात...

एक पुणेकर एकदा सहलीसाठी कुलु-मनालीला जातो.
तिथे त्याला जाम भूक लागते.

जवळच दोन जाडजूड-अगडबंब व्यक्ती उभ्या असतात. तेही पर्यटकच असतात.

पुणेकर : अहो, मला खूप भूक लागलीये. इथे कुठे चांगलं हॉटेल आहे का?

एक जाड्या : काही माहिती नाही बुवा. आम्हीही इथे नवीनच आहोत.

पुणेकर : काही हरकत नाही. आपण एकत्रच फिरूया.

दूसरा जाड्या : , काय संबंध? आपली ना ओळख ना पाळख?

पुणेकर : तसं नाही ओ. तुमच्या शरीरयष्टीकडे बघून मला अंदाज आलाय की थोडा वेळ तुमच्याबरोबर राहिलो ना तर मला हॉटेल नक्की सापडेल. 

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...