जोपर्यंत आपल्या शाळांमध्ये विज्ञान
आणि गणिताचे शिक्षक पी.टी.च्या शिक्षकांकडून तास उधार घेऊन शिकवणार, तोपर्यंत आपली
पोरं ऑलिम्पिकमध्ये नुसती हजेरीच लावून येणार.
Now we are on YouTube!!!
Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label शिक्षक. Show all posts
Showing posts with label शिक्षक. Show all posts
22 August 2016
26 July 2015
आरं बेटा हुशारी दाखव !!!
शाळेत शिक्षिका बंड्याला
प्रश्न विचारतात.
शिक्षिका : सांग बरं, छोटीशी
मधमाशी आपल्याला काय देते बरं?
बंड्या : मध.
शिक्षिका : बरोब्बर. सडपातळ
दिसणारी बकरी?
बंड्या : दूध.
शिक्षिका : बरोब्बर. आणि
मोठी म्हैस?
बंड्या : घरचा अभ्यास.
बिचारा बंड्या...
20 July 2014
खोटं बोल, पण रेटून बोल
एकदा वर्ग भरायच्या अगोदर
दोन विद्यार्थी आपापसांत भांडत होते.
तेवढ्यात शिक्षिका वर्गात
येतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही का भांडत आहात?
विद्यार्थी : आम्हाला
१ हजार रुपयांची नोट सापडली आणि जो सर्वात मोठ्ठं खोटं बोलेल त्यालाच ती मिळेल असं
ठरवलंय.
पण मी मोठ्ठं खोटं बोललो असल्याने ती मलाच मिळायला हवी.
शिक्षिका : काय रे नालायक
कार्टी आहेत. अरे लाजा वाटतात का तुम्हाला यासाठी भांडायला? अरे, मी तुमच्या
वयाची होते ना, तेव्हा खोटं बोलणं काय असतं हेसुद्धा माहीत नव्हतं मला.
दोन्ही विद्यार्थी एकमेकांकडे
पाहतात आणि ती १ हजारांची नोट बाईंना देतात.
02 October 2012
हुशार नव्हे स्मार्ट...बंड्या...!!!
एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप (अति) शहाणे समजत असत.
ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन मुलांना म्हणतात, “मी आज
तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण हुशार आहे तुमच्यापैकी.”
बंड्याला उभं राहायला सांगून त्याला विचारतात, “मला सांग
बंड्या, गाढवा, जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब
दिसला तर तू काय करशील?”
बंड्या : मास्तर, मी जरा वेळ वाट बघीन. कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन.
09 July 2012
आरपार की आर या पार?
प्रोफेसर संक यांचं विज्ञानाचं लेक्चर चालू होतं.
दोन पोरं नेहमीप्रमाणे धिंगाणा घालताना सरांना सापडली.
प्रोफेसर : नालायकांनो, धिंगाणा घालायचाच असेल तर कॉलेजच्या बाहेर जाऊन घाला ना. काहीतरी शिकून मोठे व्हावयाचे म्हणून पाठवतात ना तुमचे आई-बाप इकडे? तुमच्या थोबाडाकडं बघून तरी वाटत नाही तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवाल म्हणून.
आपले आई-बाप काढले म्हटल्यावर पोरं जाम उचकतात. ह्या मास्टरची टर कशी उडवायची ते ह्यांना माहीत असते.
पोरं सरांना म्हणतात, "ओ सर, तुम्ही आम्हाला "ढ" समजू नका. आम्ही ना आज एक शोध लावलाय."
दोन पोरं नेहमीप्रमाणे धिंगाणा घालताना सरांना सापडली.
प्रोफेसर : नालायकांनो, धिंगाणा घालायचाच असेल तर कॉलेजच्या बाहेर जाऊन घाला ना. काहीतरी शिकून मोठे व्हावयाचे म्हणून पाठवतात ना तुमचे आई-बाप इकडे? तुमच्या थोबाडाकडं बघून तरी वाटत नाही तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवाल म्हणून.
आपले आई-बाप काढले म्हटल्यावर पोरं जाम उचकतात. ह्या मास्टरची टर कशी उडवायची ते ह्यांना माहीत असते.
पोरं सरांना म्हणतात, "ओ सर, तुम्ही आम्हाला "ढ" समजू नका. आम्ही ना आज एक शोध लावलाय."
प्रोफेसर : कोणता बरं? मास्तर शिकवीत असताना खिडकीतून बाहेर कसं बघायचं ते?
पोरं : नाही सर, पण भिंतीच्या त्या बाजूचं ह्या बाजूला उभं राहूनही आरपार बघता येतं आमच्या प्रयोगाने.
प्रोफेसर : अस्स...मग दाखवा बघू तुमचा प्रयोग.
पोरं : मग चला आमच्या बरोबर आपल्या कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीसमोर.
कॉलेजचं मैदान बरंच मोठं असल्याने कंपाऊंडची भिंत पण भली लांब. ह्या म्हातार्या सरांना ३००-४०० मीटरचं अर्ध-पाऊण मैदान फिरवून पोरं त्यांना एका ठिकाणी नेतात.
पोरं : (भिंतीला पाडलेल्या एका भोकाकडे बोट दाखवीत) हा बघा आमचा शोध. इकडून पाहिलं की पलीकडच सगळं दिसतं...असं म्हणून पोरं पळून जातात...आणि मास्तर आपणच ह्यांना शोधाची आयडिया देऊन आपल्या पायावर कुर्हाड मारली म्हणून स्वत:लाच दोष देत निघून जातात.
21 June 2012
स्मार्ट विद्यार्थी
शिक्षक : जो माझ्या प्रश्नाचं बरोबर
उत्तर देईल, तो विद्यार्थी शाळेतून लवकर घरी जाऊ शकतो.
हे ऐकताच एक विद्यार्थी आपलं दप्तर
खिडकीतून बाहेर टाकून देतो.
शिक्षक : ते दप्तर कुणी टाकलं रे
बाहेर?
12 June 2012
पडलो आणि लागलं...
शिक्षक : बंड्या, तू काल शाळेत का आला नाहीस?
बंड्या : गुरुजी, काल मी पडलो आणि लागलं.
शिक्षक : अरे, कुठे पडलास आणि कुठे लागलं?
बंड्या : काल रात्री मी पलंगावर पडलो आणि माझा डोळा लागला.
07 May 2012
रेल्वेचा कंडक्टर
बंड्या शाळेतून घरी आल्यावर अंगणात तुळशीभोवती रेलगाडी रेलगाडी
खेळत असतो.
त्याचे वडील बाजूलाच त्याचा खेळ बघत बसलेले असतात.
बंड्या तुळशीला वेढे घालत असतो आणि एक वेढा झाला की मोठयाने
ओरडत असतो, “ज्या कुणा मूर्खांना चढायचंय त्यांनी चढून घ्या, ज्या मूर्खांना उतरायचंय त्यांनी उतरून घ्या.”
असे त्याचे ८-१० वेढे होतात.
मग मात्र तिथे बसलेल्या त्याच्या वडिलांचं डोकं भणभणू लागतं.
वडील जोराने ओरडतात, “काय रे काय चाललंय हे? जा गप्प बस बघू तिकडं.”
बंड्या गपचूप निमूटपणे बाजूला जाऊन बसतो.
थोडा वेळ झाला की बंड्याला पुन्हा एकदा रेलगाडी खेळायची इच्छा
होते.
तो पुन्हा तुळशीपाशी जाऊन
तुळशीला एक वेढा मारतो आणि म्हणतो, “ज्या कुणा मूर्खांना चढायचंय त्यांनी
चढून घ्या, ज्या मूर्खांना उतरायचंय त्यांनी उतरून घ्या. आधीच
एका मूर्खामुळे गाडी तासाभराने उशिरा आलीये.”05 May 2012
उदाहरण द्या...
शिक्षक : त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली, या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.
बंड्या : गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता.
03 May 2012
वर्गाचा CPU
गणिताचा तास संपलेला असतो आणि इतिहासाचे शिक्षक वर्गात येईपर्यंत वर्गात मुलांचा धिंगाणा चालू होतो.
मुलांचा गोंधळ कमी करण्यासाठी एक मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो, “सगळ्यांनी शांत बसा नाहीतर मी गोंधळ करणार्यांची नावे फळ्यावर लिहीन.”
बंड्या त्याला विचारतो, “काय रे, तू कोण आमची नावं लिहिणार? गप खाली बस.”
मुलगा : मी वर्गाचा Monitor आहे.
12 April 2012
मृत्यूदर
शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?
बंड्या : १०० टक्के.
शिक्षक : कसं काय?
बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना.
02 April 2012
मला शिकायचंय मास्तर...
बंड्या : मास्तर, मला संस्कृत शिकवा.
मास्तर : का रे, आपल्या शाळेत संस्कृत हा विषयच नसताना तुला संस्कृत शिकावसं का वाटतंय?
बंड्या : कारण ती देवांची भाषा आहे आणि मला स्वर्गात गेल्यावर ती फार उपयोगी पडेल म्हणून.
मास्तर : ए गुंडाड माणसा, तुला कशावरून वाटतंय तुला स्वर्ग मिळेल म्हणून? ठीक आहे असू दे, पण समजा नरक मिळाला तर?
बंड्या : अ ssss य मास्तर, त्याची काय पण काळजी नाय आपल्याला. शिव्या देण्यात आपण डिग्री मिळवलेली हाय.28 July 2011
15 July 2011
13 July 2011
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी म्हणींचा शोध
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...


