Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label hell. Show all posts
Showing posts with label hell. Show all posts

05 April 2012

सुखी आयुष्याचा मंत्र...छू मंतर...


तुम्ही फारच वैतागलेले आहात का?

रोज सकाळी उशिरा उठता म्हणून आई-वडिलांची बोलणी खावी लागतात का?

प्रवासातपण कुणी अतिशहाणे भेटतात का?
ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसची कटकट असते का?

सुट्टीच्या दिवशी लांबचे नातेवाईक उगाचच काहीतरी कामानिमित्त तुमच्या घरी येऊन तुम्हाला कामाला लावून जातात का?

ठीक आहे..
मग या सर्वांतून कसे सुटाल?

एकच काम करा...लग्न करा.

म्हणजे तुम्हाला तुमच्या या सगळ्या समस्या अगदीच फालतू वाटतील आणि तुम्ही अतिशय आनंदाने त्यांना सामोरे जाल आणि आई-वडील, नातेवाईक, बॉस, इतर व्यक्तींशी अतिशय प्रेमाने वागताल.

02 April 2012

मला शिकायचंय मास्तर...


बंड्या : मास्तर, मला संस्कृत शिकवा.
मास्तर : का रे, आपल्या शाळेत संस्कृत हा विषयच नसताना तुला संस्कृत शिकावसं का वाटतंय?
बंड्या : कारण ती देवांची भाषा आहे आणि मला स्वर्गात गेल्यावर ती फार उपयोगी पडेल म्हणून.
मास्तर : ए गुंडाड माणसा, तुला कशावरून वाटतंय तुला स्वर्ग मिळेल म्हणून? ठीक आहे असू दे, पण समजा नरक मिळाला तर?
बंड्या : ssss य मास्तर, त्याची काय पण काळजी नाय आपल्याला. शिव्या देण्यात आपण डिग्री मिळवलेली हाय.

06 July 2011

सर्वांत खतरनाक

खालीलपैकी या जगातील सर्वांत खतरनाक गोष्ट कोणती?
१. गुंड
२. बायको

अर्थातच, बायको.

कारण,

गुंडाला माणसाचा जीव किंवा त्याच्याकडचा पैसा हवा असतो, पण बायकोला मात्र या दोन्हीही गोष्टी.

03 July 2011

गैरसमज







बायको : काय हो, तुम्ही काल मला झोपेत शिव्या देत होतात.

नवरा : तुझा काहीतरी गैरसमज होतोय?

बायको : कसला गैरसमज? मी माझ्या कानांनी ऐकलंय.

नवरा : गैरसमज हाच की मी झोपेत होतो म्हणून.

24 September 2010

नरक


एक दारुड्या लटपटत बसमध्ये चढला आणि साधूजवळ जाऊन बसला.

तो साधू दु:खी स्वरात त्याला म्हणाला, बाळ, तुला ठाऊक नाही की, तू सरळ नरकात जात आहेस.

हे ऐकून तो दारुड्या उठला आणि जोराने ओरडला, ड्रायव्हर, बस थांबव. मी चुकीच्या बसमध्ये चढलोय.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...