Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label life. Show all posts
Showing posts with label life. Show all posts

05 April 2012

सुखी आयुष्याचा मंत्र...छू मंतर...


तुम्ही फारच वैतागलेले आहात का?

रोज सकाळी उशिरा उठता म्हणून आई-वडिलांची बोलणी खावी लागतात का?

प्रवासातपण कुणी अतिशहाणे भेटतात का?
ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसची कटकट असते का?

सुट्टीच्या दिवशी लांबचे नातेवाईक उगाचच काहीतरी कामानिमित्त तुमच्या घरी येऊन तुम्हाला कामाला लावून जातात का?

ठीक आहे..
मग या सर्वांतून कसे सुटाल?

एकच काम करा...लग्न करा.

म्हणजे तुम्हाला तुमच्या या सगळ्या समस्या अगदीच फालतू वाटतील आणि तुम्ही अतिशय आनंदाने त्यांना सामोरे जाल आणि आई-वडील, नातेवाईक, बॉस, इतर व्यक्तींशी अतिशय प्रेमाने वागताल.

08 July 2011

मृत्यूदर

शिक्षक : आपल्या देशात मृत्यूदर काय आहे?

बंड्या : १०० टक्के.

शिक्षक : १०० टक्के??? कसा काय?

बंड्या : आपल्या देशात जो जन्माला येतो, तो प्रत्येकजण मरतोच ना.



इंधन वाचवा

एक माणूस मरतो. त्याला तिरडीवर ठेवून ती तिरडी एका वाहनात ठेवली जाते.

आता अंत्यसंस्कारांसाठी हे वाहन स्मशानभूमीपर्यंत चालू करून नेण्याऐवजी लोक ढकलत ढकलत नेट असतात.

रस्त्याने जाणारी एक व्यक्ती त्यांना याचं कारण विचारते.

तर एकजण म्हणतो, "जो मेला आहे ना, त्याची अंतिम इच्छा होती की कुठल्याही परिस्थितीत पेट्रोल वाचवा."


05 July 2011

लग्नानंतर अनुभवता येणारे विविध प्रकारचे वास :

लग्नानंतर १ वर्ष : फुले आणि अत्तरांचा सुवास

नंतरची १० वर्ष : Talcum Powder चा वास

राहिलेलं आयुष्य : विक्स आणि झंडू बामचा वास



10 June 2011

आयुष्याचे ४ टप्पे


१. वय : १ ते १५ – तुमचा सांताक्लोजवर विश्वास असतो.

२. वय : १६ ते २५ – तुमचा सांताक्लोजवर विश्वास नसतो.

३. वय : २५ ते ३५ – तुम्ही सांताक्लोज होता.

४. वय : ३६ पासून पुढे – तुम्ही सांताक्लोजसारखे दिसू लागता.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...