Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

17 December 2011

पोपट झाला



त्यादिवशी एका माणसाने मोठ्या आवेशात येऊन रस्त्यावर पडलेला कचरा उचलून तो कचरा पेटीत टाकला.

बाजूला चावडीवर बसलेल्या ३-४ जणांनी टाळ्या वाजवल्या.


नंतर कळलं की ते तंबाखू मळत बसले होते ते.


10 December 2011

अण्णा हजारे : जनलोकपाल आंदोलनानंतर

अण्णा हजारेंच्या गाजलेल्या जनलोकपाल आंदोलनानंतर केवळ भारतीय जनमानसावरच नव्हे तर देवावरही त्याचा प्रभाव पडलेला दिसून आला.

एकजण इंजिनीयर झाल्यावर आनंदाने उड्या मारत मिठाई घेऊन गणपतीच्या देवळात गेला.

विद्यार्थी : देवा, तुझी कृपा अशीच राहुदे माझ्यावर. हे १५१ रुपये आणि मिठाई आणली आहे मी तुझ्यासाठी. आता मला चांगल्या पगाराची नोकरी मिळू दे.

देव : ए मर्कटा, मारतोस काय मला. अण्णा हजारेंनी पाहिलं तर???...ती मिठाई आणि पैसे मागून दे, समोर ठेऊ नकोस.

सरदारजीची मुलाखत-भाग ४


माणूस नावाचा प्राणी

उजाड वाळवंटात एक पठाण एका माकडाला आपल्या खांद्यावर बसवून घेऊन चालला होता.

बाजूने एक माणूस चालला होता. त्याने विचारले, "हा कोणता प्राणी आहे बरं?"

तेवढ्यात माकडाने उत्तर दिले, "पठाण."

10 November 2011

सत्य बोलल्याचा परिणाम

दिग्विजयसिंग यांच्या कारखाली येऊन एक कुत्र्याचे पिल्लू मरते.

दिग्गी आपल्या ड्रायव्हरला खाली उतरून त्या कुत्र्याच्या मालकाला शोधून आणायला सांगतो.

ड्रायव्हर बाजूच्याच गल्लीत जातो आणि जेव्हा परत येतो तेव्हा त्याच्या गळ्यात हार घातलेले असतात.

दिग्गी विचारतात तर ड्रायव्हर म्हणतो, "मी फक्त तिथल्या लोकांना सांगितलं की, मै दिग्विजयसिंग का ड्रायव्हर हूं। कुत्ते का बच्चा (दिग्गी) मर गया है।"

08 November 2011

दरपत्रक


मला सांगा, २५ रुपयांत पावभाजी मिळते,

तर

“१००” रुपयांत काय मिळेल?



सोप्पं आहे...




“पुरी”भाजी

28 October 2011

दिवाळी स्पेशल-दिवाळीचा बोनस

एक कामचुकार कामगार मालकाला दिवाळीचा बोनस पाहिजे म्हणून मागे लागलेला असतो.


मालक पुणेरी असतो.


मालक कामगाराला बोलावून घेतो आणि म्हणतो, "हे बघ, (तिरसटपणे) तू यावर्षी खूपच मन लावून आणि मेहनतीने काम केले आहेस, म्हणून मी तुला हा ५००० रूपयांचा धनादेश बोनस म्हणून देत आहे."


कामगार धनादेश घेतो आणि आनंदाने निरखून पाहतो. पाहत असताना त्याच्या लक्षात येतं की त्यावर साहेबांची स्वाक्षरी राहिलेली आहे.


कामगार : मालक, यावर तुमची सही राहिलीय.


मालक : अरे घोड्या राहिली नाहीय. तू जर असाच मेहनत करीत राहिलास तर पुढल्या वर्षी मी त्यावर सही करेन.

27 October 2011

दिवाळी स्पेशल-पोपटाचा लिलाव

एक माणूस आपल्या मधुर आवाजात बोलणार्‍या पोपटाचा लिलाव मांडतो.

एकजण येतो आणि बोली लावतो.

हळूहळू बोली वाढत जाते आणि शेवटी तो माणूस हा बोलका पोपट २१०० रुपयांना विकत घेतो.

तो त्या पोपटाच्या मालकाला पुन्हा एकदा विचारून खात्री करतो की हा पोपट खरोखरच बोलतो का हो?

मालक : अहो, बोलतो म्हणजे काय? आता तुमच्याविरुद्ध बोली तोच तर लावत होता.

25 October 2011

दिवाळी स्पेशल-बेवडा


एक बेवडा ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुल्ल टाईट होऊन येतो.

बायको : काय हो, तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तरी पिणार नाही म्हणून वचन दिलं होतंत ना मला सकाळी?

वेबडा : हो, बरोबर आहे. पण मी तरी काय करणार? रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती ना.

17 October 2011

गिफ्ट

वाढदिवसाला बायको नवर्‍याला विचारते, “काय गिफ्ट आणलंय माझ्यासाठी?”

नवरा : ती समोर उभी असलेली लाल रंगाची गाडी दिसतेय?

बायको : वॉव….


नवरा : त्या रंगाचं नेलपॉलिश आणलंय.

10 October 2011

दिवाळी स्पेशल-माझ्या हाती सत्ता द्या

राहुल गांधी पुण्यात युवक कॉंग्रेसची सभा घेण्यासाठी आलेले असतात. पांढरा शर्ट, गांधी टोपी, पायजमा असा त्यांचा पेहराव असतो.

पुणेकरांना उद्देशून ते म्हणतात, "माझ्या हातात देशाची सत्ता द्या. मी देश बदलून दाखवतो."

नाडकर्णी पुढे येतात आणि म्हणतात, "बाळा, आधी पायजमा बदल. सकाळपासून बघतोय उलटा घालून फिरतोयस."

सरदारजीची मुलाखत-भाग ४


मुलाखतकार : आम्हाला एक जबाबदार व्यक्ती या पदासाठी हवी आहे.

सरदार : हो, हो. मग मला जरूर घ्या तुम्ही.

मुलाखतकार : कसं काय बरं?

सरदार : कारण, आतापर्यंत मी जिथे जिथे काम केलंय तिथल्या बॉसने काही चुका झाल्या की दरवेळी मलाच जबाबदार धरलंय.

अपमान ssss

स्थापत्य अभियांत्रिकीच्या भूगर्भशास्राचा तास चालू असतो.

वर्गात प्रोफेसर बोर्डवर एक मोठा नकाशा लावून हातातील छडीने भारतात आढळणारे विविध खडकांचे प्रकार समजावून सांगत असतात.

एकजण नेहमीप्रमाणे पहिल्या बाकावर बसून झोपलेला असतो.

प्रोफेसर त्याला उठवतात आणि पुढे बोलावतात.

प्रोफेसर त्या मुलाकडे आपल्या हातातील छडीचे एक टॉक करून त्याला उद्देशून इतर मुलांना म्हणतात, "बघा, या छडीच्या एका टोकाकडे. तुम्हाला एक धोंडा दिसतोय ना."

खाली बसलेल्यांपैकी एक विद्यार्थी : कोणत्या टोकाकडे सर?

09 October 2011

तब्येत खराब आहे

संता : काय रे आज तू डॉक्टरांकडे जाणार होतास ना?

बंता : हो, ना. पण आज माझी तब्येत खराब आहे. तेव्हा उद्या जाईन म्हणतो.

08 October 2011

दिवाळी स्पेशल-लिलाव

दिवाळीच्या निमित्ताने लोक नवनवीन वस्तु खरेदी करत असतात.

एकजण असाच दिवाळीच्या मुहूर्तावर कार बाजारात जातो आणि सेकंड हँड कार विकत घेऊन येतो. तीही ८ लाखांना.

मित्र त्याला विचारतात, "काय रे, बाजारात ह्या नव्या कारची किंमत फक्त साडेतीन ते चार लाख असताना तू एवढी दामदुप्पट किंमत देऊन ही जुनी खटारा कार का आणलीस?"

पहिला : अरे मूर्खांनो, ह्या कारची एक खासियत आहे. ह्या कारला आत्तापर्यंत १४ वेळा अपघात झाला आहे.

मित्र : ए शहाण्या, हे तुझ्या बायकोला कळलं ना तर तुझा जीवच घेईल ती.

पहिला : ह्या...ती काय जीव घेणार माझा. तुम्हाला माहीत नाही, ज्या ज्या वेळेला या कारला अपघात झालाय ना, त्या त्या वेळेस फक्त बायकोच मरते आणि नवरा मात्र सही-सलामत वाचतो.

05 October 2011

दिवाळी स्पेशल-नेत्यांचं भाषण

एक नेता दिवाळीचा फायदा घेऊन गर्दी जमलेली दिसली की भाषणं द्यायचा.

पुण्यात असं कुणीही कधीही उठून कुठेही काहीही केलेलं पुणेकरांना अजिबात आवडत नाही.

लोकांनी एका चोकात याचं भाषण चालू असताना त्याला अजिबात दाद दिली नाही की साध्या टाळ्यासुद्धा वाजविल्या नाहीत.

नेता भाषण संपल्यावर संध्याकाळी आपल्या कॉलनीत गेला. तो तिथल्या लोकांना सांगू लागला की आपण कसं जोशात आणि मुद्देसूद भाषण केलं ते.

वर परत म्हणाला, "एवढं चांगलं भाषण करूनही ह्या पुणेकरांनी साध्या टाळ्यापण वाजविल्या नाहीत. मूर्ख, गाढवच आहेत राव सगळे."

तिथे एक पुणेकर आजोबा बसले होते या महाशयांचं बोलणं ऐकत.

ते चटकन म्हणाले, "हो, हो. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तरीच तुम्ही सारखे सारखे म्हणत होतात की माझ्या बंधु आणि भगिनींनो."

03 October 2011

काहीतरी बनायचंय?


दर दिवाळीत घरोघरी मातीचे किल्ले बनवले जातात. अतिहौशी मुलं मग जो किल्ला बनवायचा तो प्रत्यक्षात पाहून येतात. मग जास्तीत जास्त प्रयत्न करतात की आपला किल्ला हुबेहूब कसा बनेल त्याचा.

अशीच ४-५ मुले एका किल्ल्यावर जातात. किल्ला पाहत असतानाच त्यांना पडक्या बुरूजाच्या एका दगडावर काहीतरी लिहिलेलं दिसलं.

जवळ जाऊन पाहिलं तर त्यावर लिहिलं होतं, "हा दगड फिरवून बघा. जादू घडेल आणि तुम्ही काहीतरी बनाल."

या मुलांना न राहवून त्यांनी महत्प्रयासाने तो मोठ्ठा दगड फिरवला.

तर त्याच्या मागे लिहिलं होतं, "बनलात की नाही मूर्ख?"

01 October 2011

दिवाळी स्पेशल-सॉलिड अपमान

दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.


पण या पहिल्याच दिवशी नवरा बायकोत प्रचंड भांडण होतं.


किचनमधून हॉलमध्ये पलंगावर झोपलेल्या नवर्‍याच्या अंगावर एक एक भांडं येत असतं आणि नवरा आपली कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय असं ते दृश्य असतं.


नवरा समजून चुकलेला असतो की बायकोला समजावण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं. पण आपणही माघार घ्यायची नाही. आता डोक्यानेच काम घ्यायला हवं.


नवरा किचनमधून येणारे प्रहार चुकवत बायकोकडे जातो आणि एक senti dialogue मारतो.


नवरा : हे प्रिये, तूच माझं आयुष्य आहेस. फक्त तूच माझी जिंदगी आहे.


बायको एका क्षणात खुलते.


बायको : अस्सं??? पुन्हा म्हणा...


नवरा : हे प्रिये, तूच माझं आयुष्य आहेस. फक्त तूच माझी जिंदगी आहे.


बायको : पुन्हा एकदा.


नवरा : हे प्रिये, तूच माझं आयुष्य आहेस. फक्त तूच माझी जिंदगी आहे.


बायको : हम्म, त्याच्यापुढे.


नवरा : त्याच्यापुढे?


बायको : हो, त्यापुढे.


नवरा : त्यापुढे ??? "......थू अशा जिंदगीवर."



बायकोचा मेकअप आणि नवर्‍याचा मेक-अप

नवरा : ए, चल पटापट तयार हो बघू. मी आज पिक्चरची तिकिटे आणलीयेत.

बायको : हे काय? ही तिकीट तर पुढच्या आठवड्यातली आहेत.

नवरा : हो. तुला तयार व्हायला पण वेळ लागतोच ना. गेल्या दोन वेळा नाही का अर्धे पिक्चर पाहावे लागले.

26 September 2011

फक्त समजा...

असं समजा की मुली खूप हुशार असतात.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.

.
.
.
.
.
हा हा हा...

.
.
.
.
.
पाहिलंत, आपण समजुही शकत नाही...हा हा हा !!!


24 September 2011

अपना डोका खुजाओ

समुद्र आहे पण पाणी नाही आणि पृथ्वी आहे पण तीवर जीव नाही अशी जागा कोणती?

खुजाओ

खुजाओ

अपना डोका खुजाओ



उत्तर : नकाशा

भिकार्‍याचं स्लोगन

आजकालचे भिकारी असेही भीक मागू लागले आहेत बरं...

एक भिकारी बागेत झोपलेला असतो आणि त्याच्या बाजूला त्याने एक ताट आणि एक छोटासा फलक लिहून ठेवलेला असतो.

त्या फलकावर लिहिलेलं असतं...

"कृपया, पैशांची नाणी ताटात फेकून येथील शांतता भंग करू नये. त्यापेक्षा नोटा टाकून सहकार्य करावे."

सिंग इज किंग

सरदार आपल्यावर होणार्‍या विनोदांसाठी प्रसिद्ध आहेतच. असाच एकजण एका सरदारकडे जाऊन त्याला एक थाप मारतो, यावर सरदारजीची प्रतिक्रिया त्याला ऐकायची असते म्हणून.

व्यक्ती : माझे वडील दुकानातून जेव्हा काडेपेटी विकत घेतात ना, तेव्हा ते त्यातील प्रत्येक काडी न काडी मोजून घेतात.

कूल सरदार नेहमीप्रमाणे उत्तर देतो....

सरदार : अहो, हे तर काहीच नाही. माझे वडील काडेपेटी घेतात ना तेव्हा प्रत्येक काडी पेटवून बघतात की ती जळते की नाही.

22 September 2011

भांडू नका

वर्गात शिक्षक मुलांना सांगतात की मुलांनी आपापसांत का भांडू नये ते.

नंतर मुलांना ते प्रतिप्रश्न करतात, "मुलांनो, तुम्हाला कळलं का मी काय सांगतोय ते? बंडू सांग पाहू, तुला काय कळलं ते?"

बंडू : आम्ही एकमेकांशी भांडायला नको.

शिक्षक : अगदी बरोबर. पण का भांडायला नको?

बंडू : कारण परीक्षेला कुणाच्यामागे नंबर येईल सांगता येत नाही ना.

21 September 2011

फायद्याचं बोला!

रुग्ण : डॉक्टर, मी गेले १५ दिवस झाले रोज ५० रुपयांचं औषध घेतो आहे. पण अजून तरी मला काहीच फायदा झाला नाही.

डॉक्टर : ठीक आहे. मग मी आजपासून ३० रुपयांचं औषध देतो. मग तुम्हाला रोज २० रूपयांचा फायदा होईल.

मुक्या प्राण्याला शिक्षा कशाला?

बायको : अहो, जेवायला येताय ना? की कुत्र्याला टाकू?

नवरा : नको नको. आण लवकर. माझी शिक्षा त्या बिचार्‍या मुक्या प्राण्याला नको.

18 September 2011

बुद्धीमंत बायका

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.

बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.

नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.

नवरा : काय झालं? काय झालं?

बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा.

11 September 2011

मजबूत नेटवर्क

एक पठाण मोबाइल कंपनीत मुलाखतीसाठी जातो.

एका प्रश्नाच्या उत्तरासाठी त्याला हाकलून देण्यात येतं.

त्याला विचारण्यात येतं की, "सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि मजबूत असं नेटवर्क कुणाचं आहे?"

पठाण : अल-कायदा.

04 September 2011

पोलिसांचा जर्मन बेकरी तपास sss

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिस धाडसत्र सुरू करतात.


ते एकदा संशयित गुन्हेगाराला पकडण्यासाठी गुन्हेगाराच्या ऐवजी चुकून कुलकर्णी महाशयांच्या घरात घुसतात.


पोलिस : आम्हाला संशय आहे की तुमच्या घरात स्फोटक सामग्री आहे.


कुलकर्णी : (मनातल्या मनात म्हणतात, "कशाला पोलिस झाले? कुणाच्या घरात घुसावं काय कळत नाही ह्यांना.") हो आहे ना.


पोलिस : कुठे आहे?


कुलकर्णी : ती माहेरी गेलीय.

कूल नवरा

नवरा बायकोची जोरदार भांडणं होतात आणि बायको नेहमीप्रमाणे नवर्‍याला धमकी देते की मी माहेरी निघून जाईन म्हणून.

पण नंतर राग शांत झाल्यावर बायको म्हणते, "मी माझं मन बदललंय."

नवरा : बरं झालं बाबा. नुसती कटकट होती. बरं, नवीन मन तरी ताळ्यावर आहे ना?

03 September 2011

पंतप्रधान मूर्ख?


अण्णांच्या आंदोलनानंतर प्रत्येक नागरिक आपापल्या प्रकारे सरकारचा निषेध करत आहे.

असाच एकजण एका पोलीस चौकीच्या बाहेर उभा राहून घोषणा देऊ लागला..."पंतप्रधान मूर्ख आहे, पंतप्रधान मूर्ख आहे, पंतप्रधान मूर्ख आहे."

पोलिसांनी त्याच्या घोषणा ऐकल्या आणि अजून जमाव होऊन परिस्थितीने वेगळंच वळण घेऊ नये म्हणून त्याला हटकले.

तर तो माणूस (बचावाच्या पवित्र्यात) पोलिसांना म्हणाला, "मी तर रशियाचा पंतप्रधान मूर्ख आहे, अशा घोषणा देत होतो."

हवालदार हे ऐकून त्या माणसाच्या दोन कानाखाली वाजवत म्हणाला, "तुला काय वाटलं??? आम्हाला माहीत नाही, कुठला पंतप्रधान मूर्ख आहे ते???"

रक्ताची चाचणी

एक जोडपं दवाखान्यात जातं. त्यांना त्यांचा रक्तगट माहीत करून घ्यायचा असतो.

डॉक्टर : अहो, तुम्हा दोघांचा रक्तगट एकच आहे.

नवरा : असेल, असेल. (बायकोकडे बोट दाखवून) हा रक्तपिपासू प्राणी गेल्या २५ वर्षांपासून माझं रक्त पितो आहे.

31 August 2011

२५ पैशांचं दुर्दैव

भारत सरकारने २५ पैशांचं नाणं चलनातून का काढून टाकलं माहितीये???

अहो, त्यामागे लय मोठी कहाणी हाये...

या निर्णयामागचं कारण असं, की राहुल गांधींनी सरकारला एक सूचना (आज्ञा) केली.

त्यात म्हटले होते की -

"साला आपण लोक एका अण्णाला (अण्णा हजारेंना) सांभाळू शकत नाही, तिथे हे चार अण्णा (चार आणे म्हणजे २५ पैसे) कसे काय सांभाळणार? त्यापेक्षा नको ती कटकट...काढून टाका ते चलनातून."

29 August 2011

भ्रष्टाचार थांबवा !!!

एका माणसाने अण्णा हजारेंना विचारले, "अण्णा, कफन को जेब क्युं नही होती?"

अण्णा : क्यों की मौत भी कभी रिश्वत नही लेती...

26 August 2011

अकलेचं औषध

गावच्या आठवडे बाजारात एक व्यापारी आपला माल खपवत असतो. त्याची ही तर्‍हा वेगळीच असते.

व्यापारी : अक्कल वाढवायचं औषध घ्या, फक्त ५ रुपये, फक्त ५ रुपये, चला, चला, चला...लवकर घ्या, अक्कल वाढवा...फक्त ५ रुपये.

अनेक लोक हे अनोखं औषध पाहून व्यापार्‍याकडं यायचे.

त्यातलीच बाजार करायला आलेली एक व्यक्ती : ह्यानी खरोखरंच अक्कल वाढती का माणसाची???

व्यापारी : शंभर टक्के. एकदा घेऊन बघा. गुण नाही आला तर पैसे परत.

व्यक्ती : असं म्हणता, मग द्या बरं मला.

व्यापारी त्याला ५ रुपयाचं औषध देतो.

व्यक्ती : च्यामारी ssss हा तर गूळ हाय की.

व्यापारी : बघा औषध खाताच अक्कल आली का न्हाय???



07 August 2011

म्हणजे...वाघाचे पंजे

१. एखाद्याने तुम्हाला "तुम्ही मूर्ख आहात" असं समजण्यापेक्षा तुम्ही तुमचं तोंड उघडून ते त्याला सिद्धच करून दाखवलेलं बरं.

२. मी शक्यतो कुणा व्यक्तीचा एकदा पाहिलेला चेहरा विसरू शकत नाही...तुझा अपवाद सोडल्यास.

३. सिगारेट म्हणजे : एका तोंडाला एका वळकुटी केलेल्या कागदात एक चुटकीभर तंबाखू जी पेटवलेली असते आणि दुसर्‍या तोंडाला ती ओढण्यासाठी पेटलेला एक मूर्ख असतो.

४. घटस्फोट म्हणजे : लग्न या शब्दाचा भूतकाळ होय.

५. कॉन्फरन्स म्हणजे : एका व्यक्तीचं कंफ्यूजन गुणिले उपस्थित असलेले लोक.

६. डिक्शनरी म्हणजे : जिथे घटस्फोट (Divorce) हा शब्द विवाहाच्या (Marriage) अगोदर असतो.

७. etc : हा शब्द असा आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा तो वापराल, इतरांना वाटेल की तुम्हाला खूप काही माहिती आहे (त्यांना वाटते त्यापेक्षा).

८. एटम बॉम्ब : निर्माण केलेलं सर्व काही संपवण्यासाठी निर्माण केलेली एक निर्मिती.

९. संधीसाधू : एक अशी व्यक्ती जी चुकीने नदीत पडते, परंतु त्याचा फायदा घेऊन आंघोळ करून बाहेर येते.

१०. गुन्हेगार : जनमानसातलीच इतरांसारखी एक व्यक्ती, फक्त ती पकडली जाते...एवढाच एक अपवाद.

११. बॉस : एक अशी व्यक्ती जी तुम्ही लवकर आला तर ती उशिरा येते आणि तुम्ही उशिरा आलात तर ती लवकर आलेली असते.

१२. पुढारी : जो निवडणुकीआधी तुमच्या हातात हात देऊन हलवतो आणि निवडणुकीनंतर तुमचा आत्मविश्वास हलवतो.



06 August 2011

सोनिया : लष्करी जवान

सोनिया गांधींना एक दिवस बंदूक कशी चालवायची याचं प्रशिक्षण घेण्याची लहर येते.

लष्कराचा एक अधिकारी यासाठी नियुक्त केला जातो.

अधिकारी सोनियांना बंदूक देतो.

सोनिया : बंदुकीची नळी समोरच्या दिशेने धरायची की उलटी?

अधिकारी : कशीही धरा, फायदा भारताचाच होईल.


05 August 2011

न्हाव्याचं कौशल्य आणि ग्राहकाचं शल्य


एकजण दाढी करायला न्हाव्याच्या दुकानात जातो.

न्हावी एकदम धारदार वस्तरा घेऊन एकदम जोशमध्ये अतिशय कौशल्याने ग्राहकाच्या चेहर्‍यावर फिरवत असतो. ग्राहक जीव मुठीत धरून बसलेला असतो.

दाढी करत असताना ग्राहकाशी बोलता बोलता तो विचारतो, "तुम्ही किती भाऊ आहात?"

ग्राहक : तुमच्या वस्तर्‍यापासून सहीसलामत वाचलो तर चार नाहीतर तीनच आहेत असं समजा.



04 August 2011

प्राध्यापकांचं लॉजिक

प्राध्यापक : (आपल्या मित्रास) तू रिकाम्या पोटी किती चपात्या खाऊ शकशील?

मित्र : अं ssss ६ ते ७.

प्राध्यापक : चूक. तू १ जरी चपाती खाल्ली तरी तुझं पोट रिकामं कसं राहील?



03 August 2011

मोबदला



बायको : अहो, मी जर तुम्हाला स्वयंपाकघरात जाऊ देणार नाही आजपासून. मी तुम्हाला माझ्या हातचं जेवण खाऊ घालणार.

नवरा गोंधळून जातो की आज काय झालं हिला असं अचानक?

बायको : हो, पण त्याबदल्यात मला काय मिळेल?

नवरा : माझ्या विम्याचे पैसे विमा कंपनी अगदी घरी आणून देईन तुला.



02 August 2011

व्यवसाय


एकजण कुत्री विकायचा व्यवसाय करत असतो.

दुकानदार : (ग्राहकास) हा कुत्रा तुम्हाला काय पाहिजे ते देतो.

ग्राहक : मग तुम्ही त्याला का विकत आहात?

दुकानदार : काय सांगू? हरामखोर ssss एका रात्री तो कंदील घेऊन चोरट्यांना रस्ता दाखवत होता.


01 August 2011

दलबदलू

एकदा फायरब्रिगेडच्या कार्यालयात एका आमदाराचा फोन येतो.

आमदार : अहो, लवकर या. आमच्या पक्षकार्यालयाला आग लागली आहे.

फायरब्रिगेडच्या गाड्या निघण्याच्या तयारीत असतानाच पुन्हा त्या आमदाराचा फोन येतो.

आमदार : अहो, तुम्हाला जमेल तेव्हा या. घाई करण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी आता तो पक्ष सोडलेला आहे.


31 July 2011

वाढदिवसाची भेट

बायको : अहो, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय भेट द्यावी तेच कळत नाहीये.

नवरा : का बरं ? ही भेट तुझ्या आवडीची देणार आहेस की माझ्या आवडीची?

बायको : अर्थातच तुमच्या आवडीची. तुमचा वाढदिवस आहे ना आज.

नवरा : मग घटस्फोट दे की.


30 July 2011

संताचा निष्कर्ष

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.

कुठलीही गोष्ट घडली की त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे.

एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवर फिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते.

एक व्यक्ती पाण्यात उडी मारते, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.

यावरून संता असा निष्कर्ष काढतो की, माणूस पाण्यात विरघळतो.



चंद्रावर आता फक्त दारूचाच शोध लावायचा बाकी राहिलाय

दोन दारूड्यांमधलं हे संभाषन :

पहिला : अरे तू काल संध्याकाळी सातच्या बातम्या ऐकल्या का?

दूसरा : नाही. काय विशेष?

पहिला : काल संशोधकांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ सापडल्याचं जाहीर केलं

दूसरा : वा, वा, वा !!! म्हणजे आता आपल्याला फक्त व्हिस्कीच घेऊन जावं लागणार.



29 July 2011

दूरचा नातेवाईक

पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना संशयावरून एकाला पकडतात.

दुसर्‍या दिवशी चौकशीसाठी त्याच्या भावाला चौकीवर बोलावून घेतात.

पोलीस : हा तुझा कोण आहे?

आरोपीचा भाऊ : तो माझा दूरचा नातेवाईक आहे.

पोलीस : काय नातं आहे तुझं त्याच्याशी?

आरोपीचा भाऊ : तो माझा सख्खा भाऊ आहे?

पोलीस : (दरडावून) मग दूरचा नातेवाईक काय म्हणतोस?

आरोपीचा भाऊ : अहो म्हणजे, त्याच्या आणि माझ्यात सहा भावांचं अंतर आहे ना म्हणून.



28 July 2011

मुलाचं भविष्य





शिक्षक : (पालकांना) तुमचा मुलगा मोठा झाल्यावर डॉक्टर होणार असं दिसतंय.

पालक : कशावरून?

शिक्षक : त्याच्या हस्ताक्षरावरून.

27 July 2011

मी वाघ आहे वाघ...

दोन मित्रांमधील संभाषण :

पहिला : काय रे, तू ऑफिसमध्ये मोठा वाघ बनून फिरत असतोस. घरात काय असतोस?

दूसरा : मी घरातही वाघच असतो. फक्त फरक एवढाच असतो, की आता त्या वाघावर दुर्गा स्वार झालेली असते.


पुण्यातील लॉज

एकजण बाहेरून पुण्यात काही कामानिमित्त येतो. इथं राहायची व्यवस्था नसल्यानं तो हॉटेलवर राहायचं ठरवतो.
तो एका नामांकित हॉटेलात जातो.

मालकाची नुकतीच दुसर्‍या एका ग्राहकाशी काही कारणावरून (पुणेरी नियमांचं उल्लंघन केल्यावरून) बाचाबाची झालेली असते, त्यात १ वाजलेले म्हणजे जेवणाची वेळ झालेली.

ग्राहक : मला तुमच्याइथे एक खोली मिळेल?

मालक : (तिरसटपणे) तुमच्याइथे म्हणजे कुठे? आमच्या घरी???

ग्राहक : अहो, तुमच्या हॉटेलात आणि ४ थ्या, ५ व्या मजल्यावर असेल तर उत्तमच.

मालक : मिळेल की, पण कशाला पाहिजे? राहायला की उडी मारून जीव द्यायला?

ग्राहक : (भांबावून गेल्याने) बरं, एक पाण्याचा ग्लास मिळेल?

मालक : आमच्याकडे ग्लास पाण्याचा नसतो, काचेचा असतो, देऊ का?


26 July 2011

पुणेरी कंडक्टर

एक माणूस पुण्यात बसने प्रवास करत असतो.

प्रवासी : (वाहकास) अहो, मी बसमध्ये सिगारेट ओढू शकतो का?

वाहक : नाही.

प्रवासी : (एका व्यक्तीकडे बोट दाखवून) तो बघा, तो तर ओढतोय की?

वाहक : ओढत असेल, मग??? त्याने मला विचारलेलं नाहीये.




25 July 2011

फुलासारखी लेक

नवरा : ए, उठ लवकर. सकाळचे आठ वाजलेत. (असं म्हणून बायकोच्या तोंडावर १ ग्लास पाणी ओततो.)

बायको : हे काय हो. रोज रोज तोंडावर पाणी टाकून काय उठवताय?

नवरा : त्याचं काय आहे, आपलं लग्न झालं ना त्यावेळी तुझी आईच म्हणाली होती मला की, "माझी लेक किनई फुलासारखी आहे. तिला कधी कोमेजून देऊ नका."




लग्नाची तयारी

एकदा उंदीर हत्तीकडे येतो आणि त्याला विनंती करतो, "हत्तीदादा, हत्तीदादा, मला तुझी लुंगी दोन दिवसासाठी देशील का?"

हत्तीदादा : का रे ?

उंदीर : अरे, माझ्या मुलाचं लग्न आहे परवा, तेव्हा मंडप टाकावा म्हणतोय.

23 July 2011

टपालखात्याची घोषणा



टपालखात्याने महात्मा सुरेश कलमाडी आणि किंग ए. राजा तसेच महाराणी कनिमोळी यांची टपाल तिकिटे नुकतीच प्रकाशित केली.

परंतु, सर्व नागरिक ही तिकिटे पाहून संभ्रमात आहेत, की ती पत्रावर चिकटविण्यासाठी थुंकी नेमक्या कोणत्या बाजूने लावायची.



एक बातमी : सध्या (कु)प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या महात्मा आणि राजा-राणीच्या महान(?) कार्यांकडे पाहता टपालखाते याबाबत खुलासा करण्यास टाळाटाळ करीत आहे.





चोरों का राजा...



राष्ट्रकुल घोटाळा झाल्यावर सुरेश कलमाडी पुण्यातून रात्री फेरफटका मारत होते.

त्यांना एका अतिशय कुप्रसिद्ध चोर, लुटारूने अडवले.
त्याने मात्र कलमाडींना ओळखलंच नाही.

चोर : चल ए, काय असेल नसेल सगळे पैसे काढून दे गपचूप. चल चल...

कलमाडी : अहो महाशय, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते?

चोर : मला नाही माहीत. पण त्याच्याशी काय करायचंय मला? गपचूप पैसे काढ.

कलमाडी : मी सुरेश कलमाडी आहे.

चोर : ठीक आहे, ठीक आहे. मला फक्त माझे तरी पैसे द्या.




मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...