एक हत्ती हुक्का ओढत बसलेला असतो.
तेवढ्यात एक उंदीर त्याच्याजवळ येतो.
उंदीर : महाराज, आपल्याला असं व्यसनी होणं शोभतं का? टाकून द्या तो हुक्का अन चला माझ्याबरोबर मी तुम्हाला दाखवतो आपलं जंगल किती सुंदर आहे ते?
हत्ती काही न बोलता त्याच्याबरोबर चालू लागतो. बर्यापैकी जंगल फिरून झाल्यावर ते सिंहाच्या गुहेजवळ येतात.
सिंह पण आरामात सिगारेट फुंकत बसलेला असतो. तोसुद्धा सिंहाला असंच सांगून त्याच्याबरोबर यायला सांगतो.
सिंह आपल्या तोंडातली सिगारेट खाली टाकतो आणि पायाखाली विझवतो. उंदराजवळ जाऊन त्याच्या दोन मुस्कटात लगावतो.
हत्ती : महाराज कशाला मारता या बिचार्याला?
सिंह : मागच्या वेळेस मला ह्याने असंच काही-बाही सांगून दोन तास जंगलात फिरवलं.