Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

29 August 2012

नवर्‍यांना पडणारा प्रश्न


बायको माहेरी गेल्यावर नुसते फोनवर फोन का करते?

कारण,

तिला नवर्‍याला सूचित करायचे असते की अजून त्याची साडेसाती संपलेली नाहीये. ती पुन्हा येणार आहे.

28 August 2012

वा रे गुंगारे एक एक...



जर ऑलिम्पिकमध्ये गुंगारे मारण्याचा खेळ ठेवला असता ना, तर दरवर्षी सुवर्णपदक भारतातील बायकांनी नक्कीच मिळवलं असतं.


16 August 2012

चतुर न्हाव्याच्या चांभारचौकश्या


एकदा कपिल सिब्बल आपले केस कापण्यासाठी एका सलूनमध्ये जातात.
न्हावी केस कापायला चालू करतो.

केस कापता-कापता तो कपिल सिब्बलना विचारतो, “साहेब, हा काळ्या पैशांचा मामला काय आहे?”
कपिल सिब्बल : तुला काय करायचंय? गप केसं कापायचं काम कर.

थोडा वेळ जातो. पुन्हा एकदा...

न्हावी : साहेब, हे स्विस बँकेचं काय लफडंय ओ?
कपिल सिब्बल : तू फक्त केस कापायचं काम कर. जास्त शहाणपणा दाखवू नकोस.

न्हावी थोडा वेळ शांतपणे केस कापतो. पुन्हा एकदा...

न्हावी : अहो साहेब, हे अण्णा आणि रामदेवबाबा तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप का करतात बरं?
कपिल सिब्बल (वैतागून) : का रे, तू माझी चौकशी घेतोस काय? तू काय त्या अण्णा-रामदेवबाबाचा एजंट आहेस का?

न्हावी : तसं नाही साहेब. त्याचं काय आहे, तुम्हाला असले प्रश्न विचारले की मग तुमच्या डोक्यावरचे केस उभे राहतात आणि मग ते कापायला सोप्पं जातं म्हणून विचारतोय.

15 August 2012

आस्तिक की नास्तिक?

गुरुजी : बंडू, आस्तिक आणि नास्तिक यांच्यामधला फरक सांग पाहू.

बंडू : आस्तिक म्हणजे देव आहे यावर विश्वास ठेवणे आणि नास्तिक म्हणजे तसा विश्वास न ठेवणे.

गुरुजी  : बरं, मग आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा तू पाहिलेल्या काही व्यक्तींची नावे उदाहरणादाखल सांग पाहू.

बंडू : नास्तिक म्हणजे शास्रज्ञ लोक जे विज्ञानावर विश्वास ठेवतात आणि आस्तिक म्हणजे तुम्ही, जे मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं की "अरे देवा, परमेश्वरा" असं सारखं-सारखं म्हणत असता.

02 August 2012

पंतप्रधानांचा आपल्या सरकारवरचा विश्वास


पंतप्रधान मनमोहनसिंग एकदा मुंबईला पाहणी करण्यासाठी येतात.
त्यांना रस्त्यावर एक भिकारी भीक मागत बसलेला दिसतो.

ते त्याच्याजवळ जातात. साहेब बघून भिकारी १ रूपयाच्या ऐवजी त्यांना ५ रुपये मागतो. कारण पंतप्रधानाची काही तरी इज्जत असते की नाही.

भिकारी : पाच रुपये द्या साहेब, खूप भूक लागलेली आहे.

मनमोहन : ठीक आहे, हे घे. पण मला सांग, या देशात कोंग्रेसचं सरकार असूनसुद्धा फक्त ५ रुपयात जेवायला कुठे मिळतं?

खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर !!!


गांधीजींच्या हरवलेल्या तीन माकडांचा नुकताच शोध लागला.

पहिलं माकड म्हणजे करुणानिधी = ज्याला दिसत नाही,
दुसरं माकड (हवं तर माकडीन म्हणा...काय म्हणायचं ते म्हणा शेवटी माकडाची जात ती माकडाचीच) म्हणजे ममता = जी कोणाचंच ऐकत नाही,
आणि
तिसरं माकड म्हणजे सोनिया = ज्या कधीच काहीच बोलत नाही.

आणि,

कहर म्हणजे,

या सर्वांचा मिलाफ असलेलं एक माकड म्हणजे मनमोहन = ज्यांना काही दिसत नाही, ज्यांना जनतेचा आवाज ऐकू येत नाही आणि जे काही बोलतही नाहीत.

01 August 2012

आग्र्याहून सुटका

शिवाजी महाराज आग्र्याहून वेशांतर करून पेटार्‍यातून बादशहाच्या हातावर तुरी देऊन पळाले.

बादशहाच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते, तेव्हा तो आपल्या सेनापतीला शिवाजी महाराजांच्या मागे पाठवतो.

खूप शोध घेऊनही शिवाजी महाराज त्याला सापडत नाहीत.

तो हतबल होऊन बादशहासमोर उभा राहतो.

बादशहा : हरामखोर, रिकाम्या हाताने का आलास परत? जाव, जाव,  शिवाजीको ढुंढके लाव.

वैतागलेला सेनापती : हुजूर, हम मुगल है, गुगल नही.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...