Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

29 April 2011

डॉक्टर की चांभार?



एकाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते.

तो दवाखान्यात जातो.

व्यक्ती : डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?

डॉक्टर : हो येतात की. कशाला घालायचे आहेत?

व्यक्ती : ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.

28 April 2011

कभी कभी बेवकुफ बनाना पडता है...


प्रोफेसर : बेरीयमला संबोधित करण्यासाठी वापरलं जाणारं रासायनिक चिन्ह कोणतं?
विद्यार्थी : BA
प्रोफेसर : सोडीयमला संबोधित करण्यासाठी वापरलं जाणारं रासायनिक चिन्ह कोणतं?
विद्यार्थी : NA
प्रोफेसर : जर बेरीयमचा १ अणू आणि सोडीयमचे २ अणू एकत्र आले, तर काय निर्माण होईल?
विद्यार्थी : BANANA

27 April 2011

बायकोपासून दवाखान्यात सावधान !





डॉक्टर : हा मेला आहे.

रुग्ण तेवढ्यात उठतो आणि म्हणतो, “नाही डॉक्टर, मी जिवंत आहे.”

रुग्णाची पत्नी : तुम्ही गप्प बसा हो. तुम्ही दरवेळी स्वत:चंच घोडं पुढं दामटत असता. एवढे मोठे डॉक्टर कसे काय खोटे बोलतील?

गुरुजी? लय भारी...


गुरुजी : मी जेव्हा तुमच्या एवढा होतो ना तेव्हा मला १०० पैकी १०० गुण मिळायचे.

बंड्या : गुरुजी, मग तुम्हाला नक्कीच एखादे चांगले शिक्षक शिकवत होते.

26 April 2011

प्रेझेंटेशन



स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं गटा-गटाने (Groupwise) त्यांना दिलेल्या विषयांवर प्रेझेंटेशन चालू होतं.

एका गटाचं प्रेझेंटेशन झालं.

साठे सरांना ते काही आवडलं नाही.

साठे सर : हे बघा, जो दुसर्‍यांना आपलं म्हणणं समजून सांगू/देऊ शकत नाही तो मूर्ख असतो.

एक विद्यार्थी : काय सर? काही समजलं नाही...

24 April 2011

हॉटेलात मन:पूर्वक स्वागत


एक सामान्य माणूस एका चांगल्या हॉटेलमध्ये दुपारचं जेवण करावयास जातो.

दरवाजावर उभा असलेला स्वागत करणारा माणूस त्याला म्हणतो, “आपण पहिल्यांदाच आमच्या 

हॉटेलात आल्याबद्दल आपलं मन:पूर्वक स्वागत.”

तो टेबलावर बसताच वेटर त्याला मेनू कार्ड देतो. पाण्याचा एक ग्लास भरून पुढे ठेवतो.

ग्राहक : (चकित होऊन) तुम्हाला कसं काय समजतं की तुमच्या हॉटेलात एखादी व्यक्ती पहिल्यांदाच 
आली आहे म्हणून.


वेटर : (स्मितहास्य करत) त्याचं काय आहे
, आमच्या हॉटेलात एकदा जेवण करून गेलेली व्यक्ती पुन्हा इकडे ढुंकूनही पाहत नाही, म्हणून.

कडक शिस्तीचा प्राणी


एक इंजिनीयरिंगचा विद्यार्थी वर्गात लेक्चरला उशिरा येतो.

हे प्राध्यापक म्हणजे एकदम कडक शिस्तीचा प्राणी.

विद्यार्थ्याने दाराशी येताच त्यांच्याकडे परवानगी मागितली, “सर आत येऊ?

प्राध्यापक : का रे, उशीर का झाला?

विद्यार्थी : सर, येताना बाइकवरुन पडलो.

प्राध्यापक : म्हणून काय झालं? उठून यायला एवढा वेळ लागतो का?

सरदारजीचा संदेश


सरदारजीच्या गर्लफ्रेंडने मोबाईलवर सरदारजीला संदेश पाठवला.

त्यात लिहिले होते,I miss you.

सरदारजीनेसुद्धा तिला संदेश पाठवला.

त्यात त्याने लिहिले,I mister you.

ताई का रडत आहे ?


बंड्या : आई, आई, ताई का रडत आहे बरं?

आई : अरे, ती सासरी जाते आहे ना म्हणून.

बंड्या : असं होय. मला वाटलं तू तिला उद्यापासून शाळेत पाठवत आहेस म्हणून.

22 April 2011

कटकट कुठली...


एकदा बंड्याचे वडील बंड्याला घेऊन प्राणिसंग्रहालय पाहायला जातात.

वाघाच्या पिंजर्‍याजवळ जाताच ते बंड्याला म्हणतात, “बघ तो वाघ किती भयानक आहे. किती हिंस्र आहे.”

बंड्याच्या चेहर्‍यावर अगदी गंभीर भाव असतात. तो थोडा वैतागतो मनातून आणि शेवटी पप्पांना प्रश्न करतो.

बंड्या : पप्पा, जर तो वाघ पिंजर्‍यातून बाहेर आला आणि त्याने तुम्हाला खाल्लं

पप्पा : ...तर मग? (जिज्ञासेने)

बंड्या : मी किती नंबरच्या बसने घरी जाऊ?

मनमुराद दारू प्यायचीय ? मग प्या की





दोन बेवडे एका हातभट्टीवर जातात. १-१ पेग टाकतात.

पहिला दारुड्या : चल आज आपण एवढी दारू प्यायची की समोर जी ४ झाडं आहे ना ती ८ दिसली पाहिजेत.


दूसरा दारुड्या : अरे पण समोर तर २ च झाडं आहेत.

शर्यत




संता : मी त्या समोरच्या ३० मजली उंच इमारतीवर न दमता २ मिंनिटांमध्ये चढू शकतो.

बंता : शक्यच नाही.

संता : का नाही? मी नक्कीच चढू शकतो.

बंता : नाही नाही, ते शक्यच नाही?

संता : का शक्य नाही? चल मग पैज लाव. मी चढलो तर काय देशील?

बंता : एक धक्का.

21 April 2011

घरचा अभ्यास

शिक्षक : का रे बंडू, तू घरचा अभ्यास का नाही केलास?

बंडू : गुरुजी, मी वसतिगृहात राहतो.

उपचारच करताय ना?

डॉक्टरांकडे एकजण येतो आणि आपला पाय दुखत असल्याचे सांगतो.

डॉक्टर त्याचा पाय बघतात तर तो निळा पडल्याच दिसतं.

डॉक्टर : अरे भाऊ, विष पसरलेलं दिसतंय. पाय कापावा लागेल.

डॉक्टर त्याचा पाय काढतात आणि त्याजागी नकली पाय लावतात.

त्या तरुणाचा नकली पायपण निळा पडतो. तो पुन्हा डॉक्टरांकडे जातो.

डॉक्टर पाय पाहतात आणि म्हणतात, "अरेच्चा, आता कुठे खरा आजार माझ्या लक्षात आला. तुझी जीन्स आहे ना, तिचा रंग जातो आहे."

दारू सोडवता?

दारुड्या : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझी दारू सोडवू शकता का?

डॉक्टर : हो, हो, नक्कीच. आजपर्यंत मी अनेकांची सोडवली आहे.

दारुड्या : अहो, पोलिसांनी माझ्या ४ बाटल्या पकडल्यात. कृपया सोडवून आणा ना.

फसवणूक




एक ग्राहक एका रेडिओच्या दुकानातून रेडिओ विकत घेतो.

दोन दिवसांनी तो ग्राहक पुन्हा दुकानात येतो. त्याच्या हातात त्याने विकत घेतलेला रेडिओ असतो.

तो रेडिओ दुकानदारासमोर आपटत म्हणतो, “काय हो, तुम्ही तर मला फसवलंत की.”

दुकानदार : काय झालं?

ग्राहक : तुम्ही दिलेल्या रेडिओवर लिहिलंय “मेड इन जपान” पण चालू केला तर आतून आवाज येतो, “ऑल इंडिया रेडिओ.”

कोंबड्यांचा खुराक


एका पोल्ट्री फार्ममध्ये एक इन्स्पेक्टर फार्मची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी येतो.
पोल्ट्री फार्मचा मालक असतो एक धोबी.

इन्स्पेक्टर : तुम्ही कोंबड्यांना काय खाऊ घालता?
धोबी : बाजरी.
इन्स्पेक्टर : म्हणजे खराब अन्न. शिपायांनो, याला गाडीत घाला.



आता इन्स्पेक्टर दुसर्‍या पोल्ट्रीवर जातो. त्याचा मालक असतो एक वखार चालवणारा.

इन्स्पेक्टर : तुम्ही कोंबड्यांना काय खाऊ घालता?
पोल्ट्री मालक : गहू.
इन्स्पेक्टर : म्हणजे कोंबड्यांसाठी खराब अन्न. शिपायांनो, याला गाडीत घाला.



आता इन्स्पेक्टर तिसर्‍या पोल्ट्रीवर जातो. त्याचा मालक असतो एक सरदारजी.

इन्स्पेक्टर : तुम्ही कोंबड्यांना काय खाऊ घालता?

सरदारजीला पहिल्या दोन मालकांच्या कहाण्या समजलेल्या असतात. त्यामुळे तो बिचारा खूप घाबरलेला असतो.


सरदारजी अतिशय घाबरून म्हणतो
,साहेब, आम्ही प्रत्येक कोंबडीला ५-५ रुपये देतो आणि सांगतो, तुम्हाला काय खायचंय ते खाऊन या.

20 April 2011

रागावर नियंत्रण


पप्पा : बंड्या, मी तुला मारतो तेव्हा तुझा राग तू कसा काय आटोक्यात ठेवतो रे?

बंड्या : मी टॉयलेट साफ करतो.

पप्पा : कसं काय?

बंड्या : मी टॉयलेट तुमच्या दात घासण्याच्या ब्रशने साफ करतो.

हे बरंय का?


पत्नी : अहो, काय चाललंय हे? सारखं सारखं पॅंट वर ओढताय तुम्ही. बरं दिसतं का हे चार-चौघांत?


पती : बरोबर आहे. पण मला वाटतं
, मी पॅंट वर ओढली नाही तर ते अजूनच खराब दिसेल.

19 April 2011

संताचा विमानप्रवास

एकदा संता विमानात बसतो.

विमान उड्डाण घेण्यासाठी धावपट्टीवर धावू लागतं.

तेवढ्यात संता पायलटच्या केबिनमध्ये जाऊन त्याच्या कानाखाली जोरदार आवाज काढतो.

पायलट : मला का मारलं?

संता : मला तातडीच्या कामास उशीर होतोय म्हणून मी आज खास विमानात प्रवास करीन म्हटलं, तर तू रस्त्यानी विमान पळवतोयस काय मूर्खा?


नातं


गुरुजी वर्गात मुलांना भूगोल शिकवत असतात.

ते सांगतात, “चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो पृथ्वीभोवती फिरत असतो.”

बंड्याचं मात्र गुरुजींच्या या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नसतं.

गुरुजी नेमकं त्याला हेरतात आणि खडसावून विचारतात.

गुरुजी : बंड्या मला साग, चंद्र आणि पृथ्वीमध्ये काय नातं आहे?

बंड्या : (जरा विचार करून) बहीण-भावाचं.

गुरुजी : काय रे, वेडा समजलास की काय मला?

बंड्या : हो...म्हणजे नाही. आपण नाही का पृथ्वीला “आई” आणि चंद्राला “मामा” म्हणत, म्हणून.

18 April 2011

दु:खाचा विसर

एक बेवडा गटारीच्या निमित्ताने ढोसून घरी येतो.
बायको दार उघडते.

बेवडा : नमस्कार, कोण आपण? इथे काय करताय?

बायको : तुम्ही मला विसरलात? हिंमत कशी काय झाली तुमची मला विसरायची?
बेवडा : ए, तुला माहीत नाही काय. दारूच्या नशेत माणूस सगळी दु:ख विसरून जातो.

नोकराची माहिती विचारून घ्या बरं



मालक नवीन नोकर ठेवताना त्याची विचारपूस करत आहे.

मालक : तुझ्याकडे काय पुरावा आहे की त्या ढोलेंच्याकडे वर्षभर काम केलंस म्हणून?

नोकर : माझ्याकडे त्यांचं नाव असलेली बरीच भांडी आहेत.

17 April 2011

पत्त्याचा शोध





पुण्यात नवीन आलेला माणूस : पुलगेटला कसे जायचे?

पुणेकर : कशाला जायचंय पुलगेटला ?

माणूस : अहो जरा काम आहे.

पुणेकर : मग कामाला जा ना, पुलगेटला कशाला जाता ?


आम्ही साधी माणसं

एक पुणेकर वृद्ध गृहस्थ कॉफी शॉपमध्ये जातात.




गृहस्थ : वेटर, एक कॉफी आणा.

वेटर : आपण कोणती कॉफी पिऊ इच्छिता? Black आणू?

गृहस्थ : अंsss, अजून कोणकोणत्या रंगात मिळेल?

16 April 2011

मोफत कॉल



एका व्यक्तीचा मृत्यू होतो. ती व्यक्ती काही कारणास्तव नरकात पाठवून दिली जाते.

यम तिची विचारपूस करायला येतो. काही पाहिजे का म्हणून विचारतो.

ती व्यक्ती : मला माझ्या बायकोला एक फोन करायचा आहे.

यम त्याला फोन लावून देतो. ती व्यक्ती थोडा वेळ आपल्या बायकोशी बोलते आणि नंतर फोन बंद करते.

तो यमाला विचारतो, “किती पैसे द्यायचे? बिल किती झालं?

यम : अरे काही काळजी करू नकोस मित्रा. नरक ते नरक मोफत कॉलिंग आहे.

विनोदाचं वय



सरदारजीचा मुलगा त्याला विचारतो, “पप्पा, पप्पा, प्रौढ विनोद म्हणजे काय हो?

सरदारजी : प्रौढ विनोद म्हणजे ज्या विनोदाला (joke) १८ वर्षे होऊन गेली ना तो.

शोध साहेबांचा



भारतात आल्यावर एका इंग्रज साहेबाला संध्याकाळी झोपेत असताना खूप मच्छर चावतात.

साहेब रागाने उठून बसतो आणि सगळ्या विजेचे झोत (लाईट) बंद करून टाकतो.

तेवढ्यात तिथे काम करणारा जुना नोकर टॉर्च लावून येतो आणि नेमका साहेबाच्या आजूबाजूला मारतो.

साहेब : काय हे भारतातले मच्छर??? लाईट बंद केली तर टॉर्च घेऊन शोधताहेत मला.



15 April 2011

सरदारजी थोडक्यात वाचला


एकदा सरदारजी पहिल्यांदाच एका मोठ्या चायनीज रेस्टोरंटमध्ये जातो.

वेटर त्याच्यापुढे मेनूकार्ड ठेवतो.

सरदारजीला काही लक्षात येत नाही, तो गोंधळून जातो.

पण चेहर्‍यावर काहीही भाव न दाखवता तो चटकन शेवटच्या ओळीवर बोट ठेवतो.

वेटर : सर, तुम्हाला हे मिळू शकणार नाही. कारण हे तर या हॉटेलचे मालक आहेत.

इतिहास कच्चा



पप्पा : का रे, कसा काय नापास झालास?


बंड्या : मी तरी काय करू
, सगळे प्रश्न माझ्या जन्माअगोदरचे होते. त्यांची उत्तरं मला कशी काय माहीत असणार?

अनुत्तरित असलेले काही प्रश्न



14 April 2011

बंड्या लई मंजी लई हुश्शार


गुरुजी : बंड्या सांग पाहू, सांगाडा म्हणजे काय ते?

बंड्या : सांगाडा म्हणजे अशी व्यक्ती जीने उपवास पकडला पण तो सोडायलाच विसरून गेली.

संता तो संताच



एकदा संता बँकेच्या ATM मध्ये पैसे काढायला जातो.

तो कार्ड मशीनमध्ये घालतो आणि पासवर्ड टाइप करतो.

तेवढ्यात त्याला मागून आवाज येतो, “मी तुझा पासवर्ड पहिला आहे, तो १२३४...”

संता : नाही रे नाही. चुकला तू. तो १२३४ नाही, १८२५ आहे.

शिक्षा देताय?


गुरुजी : का रे बंड्या, काल शाळेला का आला नाहीस?

बंड्या : मला बर्ड फ्लू झाला होतं.

गुरुजी : अरे तो तर कोंबड्यांना होतो.

बंड्या : (वैतागून) तुम्ही मला माणसासारखं वागवलंच कुठं? सारखा सारखा कोंबडा धरायला लावत होतात.

13 April 2011

येडा की खुळा?



पेशंट : डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.

डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.

डॉक्टर : हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.

पेशंट : पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?


डॉक्टर :
(रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.

डॉक्टर की कारकून?



डॉक्टर एका पेशंटला तपासून झाल्यावर एक चिठ्ठी देतात, औषधं घेण्याकरिता.

पेशंट मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि औषधे मागतो. अनेक मेडिकल स्टोअर धुंडाळूनसुद्धा त्याला काही औषधं मिळत नाहीत.

शेवटी तो पुन्हा दवाखान्यात येतो.

पेशंट : डॉक्टर, तुम्ही लिहून दिलेली औषधं कुठेही मिळाली नाहीत.

डॉक्टर चिठ्ठी वाचतात आणि...


डॉक्टर : माफ करा हं. चुकून मी माझी केवळ सही असलेलीच चिठ्ठी तुम्हाला दिली. औषधं लिहायची राहिलीत
.

12 April 2011

शुद्धीवर आहात ना?



एकजण आपल्या पेशंटला घेऊन दवाखान्यात येतो.

पेशंट : अहो डॉक्टर, तुम्ही दिलेला चष्मा वापरतो आहे, तेव्हापासून मला प्रत्येक गोष्ट दोन दोन दिसत आहेत.


डॉक्टर : आधी मला सांगा
, तुम्ही चार चार लोकं मग माझ्याकडे का आलात?

फिर मिलेंगे


एका सरदारजीचा अपघात होतो, पण सुदैवाने तो त्यातून बचावतो.

त्याच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली असते.

तो एका दवाखान्यात उपचार घेतो.

डॉक्टर : तुम्ही आता बरे झालेले आहात, तरी पण तुम्ही अजून घाबरलेले का दिसत आहात?


सरदारजी : कारण ज्या गाडीमुळे अपघात झाला त्या गाडीच्या मागे लिहिले होते
, फिर मिलेंगे.

11 April 2011

सल्ला (महत्वाचा)


एक डॉक्टर आपलं शिक्षण पूर्ण करून गावी जातो.

त्याला त्याचे मित्र तेथे भेटतात.

डॉक्टर : अरे, माझा विचार आहे की आपल्या गावात एक दवाखाना सुरू करावा म्हणून.

मित्र : ते ठीक आहे रे, पण इथलं कबरस्तान खूप छोटं आहे.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...