गुरुजी वर्गात मुलांना भूगोल शिकवत असतात.
ते सांगतात, “चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो पृथ्वीभोवती फिरत असतो.”
बंड्याचं मात्र गुरुजींच्या या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नसतं.
गुरुजी नेमकं त्याला हेरतात आणि खडसावून विचारतात.
गुरुजी : बंड्या मला साग, चंद्र आणि पृथ्वीमध्ये काय नातं आहे?
बंड्या : (जरा विचार करून) बहीण-भावाचं.
गुरुजी : काय रे, वेडा समजलास की काय मला?
बंड्या : हो...म्हणजे नाही. आपण नाही का पृथ्वीला “आई” आणि चंद्राला “मामा” म्हणत, म्हणून.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.