एकदा बंड्याचे वडील बंड्याला घेऊन प्राणिसंग्रहालय पाहायला जातात.
वाघाच्या पिंजर्याजवळ जाताच ते बंड्याला म्हणतात, “बघ तो वाघ किती भयानक आहे. किती हिंस्र आहे.”
बंड्याच्या चेहर्यावर अगदी गंभीर भाव असतात. तो थोडा वैतागतो मनातून आणि शेवटी पप्पांना प्रश्न करतो.
बंड्या : पप्पा, जर तो वाघ पिंजर्यातून बाहेर आला आणि त्याने तुम्हाला खाल्लं…
पप्पा : ...तर मग? (जिज्ञासेने)
बंड्या : मी किती नंबरच्या बसने घरी जाऊ?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.