Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label school. Show all posts
Showing posts with label school. Show all posts

20 July 2014

व्याकरणाचा अभ्यास : काळ ओळखा


एक गृहिणी आपल्या मुलांचा अभ्यास घेत असते.

ती आपल्या मुलाला व्याकरणातला एक प्रश्न विचारते, “सांग बरं, मी सुंदर आहे; या वाक्याचा काळ कोणता?


बाजूला बसलेला नवरा पटकन म्हणतो, “अर्थातच, भूतकाळ.”


05 May 2012

उदाहरण द्या...


शिक्षक : त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली, या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.

बंड्या : गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता.

03 May 2012

वर्गाचा CPU


गणिताचा तास संपलेला असतो आणि इतिहासाचे शिक्षक वर्गात येईपर्यंत वर्गात मुलांचा धिंगाणा चालू होतो.

मुलांचा गोंधळ कमी करण्यासाठी एक मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो, “सगळ्यांनी शांत बसा नाहीतर मी गोंधळ करणार्‍यांची नावे फळ्यावर लिहीन.”

बंड्या त्याला विचारतो, “काय रे, तू कोण आमची नावं लिहिणार? गप खाली बस.”

मुलगा : मी वर्गाचा Monitor आहे.

बंड्या : मग मी वर्गाचा CPU आहे, समजलं?

30 March 2012

पुन्हा शाळा??? नको रे बाबा...


दोन मित्र एकाच वर्गात दुसर्‍यांदा नापास होतात.

पहिला : काय कटकट आहे ही. चल आपण आत्महत्या करू.

दूसरा : नको रे बाबा. नाहीतर पुढच्या जन्मी पुन्हा जूनियर के.जी. पासून सुरुवात करावी लागेल.

28 June 2011

आम्हाला शिकवा तुम्ही sss...


बंड्या : बाबा, बाबा, हे बघा प्रगतिपुस्तक.

बाबा : काय रे हे मूर्खा??? हे काय??? १०० पैकी गणितात ३५, विज्ञानात २१, भूगोलात गोल म्हणजे शुन्य...अभ्यासाच्या नावानी बोंब आहे नुसती..., मठ्ठ कुठला.

बंड्या : अहो बाबा, हे प्रगतिपुस्तक मला त्या वरच्या माळ्यावर पडलेल्या जुन्या दप्तरात सापडलं. आई म्हणत होती की हे तुमचं आहे, आणि त्यावेळी तुम्ही ५ वीला होतात ना तेव्हा पाडलेला प्रकाश दिसतोय यातून.

23 June 2011

शाळेत जाण्याआधी


बंड्याला शाळेत घालण्यासाठी त्याचे बाबा त्याला घेऊन शाळेत जातात.

तेथील मुख्याध्यापक बंड्याची मुलाखत घेतात.

मुख्याध्यापक : तुझं नाव काय?

बंड्या : बंडोपंत धोंडोपंत खेकडे.

मुख्याध्यापक : बरं बंडूबाळ, तू जेवणापूर्वी प्रार्थना करतोस काय?

बंडू : नाही, कारण माझी आई चांगलं जेवण करते.

18 June 2011

सवाल-जवाब


गुरुजी : मुलांनो, A च्या नंतर काय येतं?
.
.
.
बंड्या : (जरा विचार करून) ए, क्या बोलती तू?

15 June 2011

सत्य


गुरुजी : बंड्या, सांग बरं. लहान मुलांमध्ये आणि इतर प्राण्यांच्या पिलांमध्ये काय फरक आहे तो?

बंड्या : गुरुजी, गाढवाचं पिलु गाढव असतं, माकडाचं पिलु माकड असतं, परंतु माणसाचं मूल मात्र गाढव, माकड, दोन्हीही असू शकतं.

06 June 2011

लांब केसांमध्ये दडलंय काय?


बंड्या : ताई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते?

ताई : कारण ते खूप बुद्धिमान होते.

बंड्या : आता मला कळलं की मुलींचे केस लांब का असतात ते.

05 June 2011

चलाखी



शाळेत एकदा एक प्रख्यात जादूगार जादूचे प्रयोग दाखवायला येतो.

तो आपला कार्यक्रम चालू करतो.

जादूगार : मुलांनो, मी तुम्हाला आता माझ्या हातातील या रुमालापासून कबुतर बनवून दाखवणार आहे.

हे सगळं बंड्या बघत असतो. तो पटकन उठून उभा राहतो आणि म्हणतो,अहो काका, मग यात काय एवढं मोठं? आमचे गुरुजी तर कसलीही जादू न करता एखाद्या मुलाचा कोंबडा करतात.

30 May 2011

बंड्याची हुशारी


पप्पा : बंड्या, तू कधी स्वप्नात तरी कधी असं काम केलंय का की ज्यामुळे माझी मान उंचावली आहे.

बंड्या : हो पप्पा. मी एकदा तुमच्या डोक्याखाली तीन उशा ठेवल्या होत्या.

28 May 2011

ज्योतिषी बंड्या




बंड्या : पप्पा, पप्पा जर मी तुम्हाला सांगितलं की मी पास झालोय तर तुम्हाला कसं वाटेल?

पप्पा : मी आनंदाने वेडा होईल.

बंड्या : मला माहीत होतं, म्हणूनच तर घाबरून मी नापास झालोय.

26 May 2011

शहाणा बंड्या

बंड्या एके दिवशी वर्गात एक गाढव घेऊन जातो.

गुरुजी : काय रे बंड्या, हे गाढव वर्गात का घेऊन आलास?

बंड्या : गुरुजी, काल तुम्हीच तर म्हणाला होतात की मी आजपर्यंत कित्येक गाढवांना चांगला माणूस बनवलं आहे. म्हणूनच मी यालापण घेऊन आलो, माणूस बनवायला.

अभ्यासात मदत

पप्पा : बंडू बाळ, तुला अभ्यासात मी काही मदत करू का?

बंडू बाळ : नाही पप्पा, यावेळी मला तुमच्या मदतीशिवायच नापास व्हायचं आहे.


24 May 2011

म्हशीचं दूध



गुरुजी : मुलांनो, म्हशीचं दूध पिल्याने बुद्धी वाढते म्हणून रोज सकाळी किमान १ ग्लास तरी दूध पित जा.

बंड्या : कसं शक्य आहे गुरुजी? असं असतं तर मग म्हशीचं पारडं (पिलू) शास्रज्ञ झालं नसतं का मग?

08 May 2011

स्वर्गप्राप्ती


गुरुजी वर्गात मुलांना शिकवतात की चांगले काम केल्याने मनुष्याला स्वर्गप्राप्ती होते.

मग ते विचारतात, “मुलांनो, मी जर एखाद्या भिकार्‍याला जेवू घातले तर मला स्वर्गप्राप्ती होईल का?
बंड्या : नाही.

गुरुजी : मी जर अपघातात सापडलेल्यांना वाचवले तर मला स्वर्गप्राप्ती होईल का?
बंड्या : नाही.

गुरुजी : मी जर गरीबांना मदत केली, दुखि:तांना मदत केली, तर मी स्वर्गात जाईल का?
बंड्या : नाही.

गुरुजी मात्र बंड्याच्या या नाही नाहीने वैतागतात.

गुरुजी : बंड्या, नाही नाही काय लावलंय? मी चांगली कामं केल्यावर स्वर्गात का नाही जाणार?
बंड्या : जाल हो, पण ते मेल्याशिवाय कसं शक्य आहे गुरुजी.

05 May 2011

दिवटा






गुरुजी : बंड्या, तुझे वडील काय करतात रे?

बंड्या : जे आई सांगेल ते.

27 April 2011

गुरुजी? लय भारी...


गुरुजी : मी जेव्हा तुमच्या एवढा होतो ना तेव्हा मला १०० पैकी १०० गुण मिळायचे.

बंड्या : गुरुजी, मग तुम्हाला नक्कीच एखादे चांगले शिक्षक शिकवत होते.

24 April 2011

ताई का रडत आहे ?


बंड्या : आई, आई, ताई का रडत आहे बरं?

आई : अरे, ती सासरी जाते आहे ना म्हणून.

बंड्या : असं होय. मला वाटलं तू तिला उद्यापासून शाळेत पाठवत आहेस म्हणून.

22 April 2011

कटकट कुठली...


एकदा बंड्याचे वडील बंड्याला घेऊन प्राणिसंग्रहालय पाहायला जातात.

वाघाच्या पिंजर्‍याजवळ जाताच ते बंड्याला म्हणतात, “बघ तो वाघ किती भयानक आहे. किती हिंस्र आहे.”

बंड्याच्या चेहर्‍यावर अगदी गंभीर भाव असतात. तो थोडा वैतागतो मनातून आणि शेवटी पप्पांना प्रश्न करतो.

बंड्या : पप्पा, जर तो वाघ पिंजर्‍यातून बाहेर आला आणि त्याने तुम्हाला खाल्लं

पप्पा : ...तर मग? (जिज्ञासेने)

बंड्या : मी किती नंबरच्या बसने घरी जाऊ?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...