गुरुजी वर्गात मुलांना शिकवतात की चांगले काम केल्याने मनुष्याला स्वर्गप्राप्ती होते.
मग ते विचारतात, “मुलांनो, मी जर एखाद्या भिकार्याला जेवू घातले तर मला स्वर्गप्राप्ती होईल का?”
बंड्या : नाही.
गुरुजी : मी जर अपघातात सापडलेल्यांना वाचवले तर मला स्वर्गप्राप्ती होईल का?
बंड्या : नाही.
गुरुजी : मी जर गरीबांना मदत केली, दुखि:तांना मदत केली, तर मी स्वर्गात जाईल का?
बंड्या : नाही.
गुरुजी मात्र बंड्याच्या या नाही नाहीने वैतागतात.
गुरुजी : बंड्या, नाही नाही काय लावलंय? मी चांगली कामं केल्यावर स्वर्गात का नाही जाणार?
बंड्या : जाल हो, पण ते मेल्याशिवाय कसं शक्य आहे गुरुजी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.