नागपूरकरांची पत्नी बाजूला राहणार्या पुणेकरांच्या म्हणजे जोशींच्या पत्नीला म्हणते, "अहो, तुम्ही तर एकदम सुगरणच आहात की हो. तुम्ही स्वयंपाक करत असला ना की मस्त सुगंध दरवळतो बघा. आम्हाला जेवायला बोलवा की एकदा."
झालं, जोशीकाकू पण कुठे हो-ना, हो-ना करायचं म्हणून हो म्हणून टाकतात.
दुसर्या दिवशी नागपूरकर त्यांच्या पत्नीसोबत दुपारी जोशींच्या घरी जेवायला येतात.
जोशी मात्र वैतागलेले असतात. त्यांचा पोरगाही वैतागलेला असतो. पण याला थेट नाहीपण म्हणता येत नव्हतं, कारण पत्नीनेच आमंत्रण दिलेलं होतं ना.
जोशींच्या दारात त्यांच्याप्रमाणेच वागणारा एक मोत्या नावाचा कुत्रा बांधलेला होता.
जोशीकाकू सर्वांना जेवायला वाढतात.
सौ. नागपूरकर : काकू जेवण एकदम झकास हं.
जोशी : (मनातल्या मनात) फुकटच मिळालंय, ढोसा.
श्री. नागपूरकर : अहो, तुमचा मोत्या बराच वेळ झालं माझ्याकडे खूपच खुन्नसनी पाहतोय हो.
जोशींचा मुलगा : अहो काका, बघताय काय मग त्याच्याकडे परत. चला आवरा लवकर.
श्री. नागपूरकर : का रे, काय झालं?
मुलगा : मला वाटतं, त्याला त्याची प्लेट ओळखू आलेली आहे.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.