एकदा एका इमारतीत दोन रेस्टोरंट होती.
एकाने आपल्या हॉटेलबाहेर बोर्ड लावला, “या शहरातील सर्वोत्तम हॉटेल.”
हे पाहून दुसर्याने बोर्ड लावला, “महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल.”
मग पहिल्याने बोर्ड बदलला, “या देशातील सर्वोत्तम हॉटेल.”
मग दुसर्यानेही बोर्ड बदलला, “जगातील सर्वोत्तम हॉटेल.”
मग मात्र पहिल्याचा पारा चढला आणि त्याने बोर्ड
लावला, “या इमारतीतील सर्वोत्तम हॉटेल.”


