Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

24 June 2012

Free चा जमाना की मुलींचा...


एक मुलगी शाम्पु आणायला दुकानात जाते.
दुकानदार शाम्पुची बाटली देतो.

ती मुलगी दुकानदाराला पैसे देते आणि म्हणते,यावर हे जे फ्री आहे ना ते पण द्या ना.

दुकानदार : यावर काहीही फ्री नाहीये.

मुलगी : खोटं बोलू नका. यावर एवढं मोठ्ठ्या अक्षरात लिहिलंय,Dandruff FREE.

23 June 2012

घुट घुट के या एक दम मे?



एका पुणेकराकडे लग्न असतं. गावाहून नातेवाईक आलेले असतात.
लग्न लागतं. सगळे आपापल्या घरी निघून जातात.
काही मोजकेच पाहुणे राहिलेले असतात. ते मंडपात झोपलेले असतात.

एका पुणेरी आजोबांच्या बाजूला एक जाडजूड पोरगा (ठोकळा) झोपलेला असतो.
त्याचा एक पाय सारखा आजोबांच्या अंगावर पडत असतो. आजोबा त्याचा पाय बाजूला ढकलून ढकलून वैतागलेले असतात.

मग आजोबा बाजूला पडलेली काठी उचलून तिचा आकडा त्याच्या मानगुटीत अडकवून ओढून त्याला उठवतात. तो जाड्या वैतागून उठतो आणि विचारतो, “काय पाहिजे?”

आजोबा : बाळा मला सांग, श्वास थांबून तडफडून तडफडून मरणं चांगलं की एका क्षणात जीव जाणं चांगलं?

पोरगा एवढासा प्रश्न विचारण्यासाठी झोपेतून उठवलं म्हणून वैतागतो. पण कुठे ह्या म्हातार्‍याच्या नादी लागायचं म्हणून बोलून टाकतो, “एकदम मरणं चांगलं.”

आजोबा : अरे ठोकळ्या, मग तुझा नुसता एक पाय माझ्या अंगावर टाकून का झोपतोस? दोन्ही पण पाय माझ्या अंगावर टाक. अन तेवढ्याने पण माझा जीव नाही गेला तर माझ्या उरावर ब्रेक डान्स कर की वरातीत करत होतास तसा...

21 June 2012

स्मार्ट विद्यार्थी



शिक्षक : जो माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देईल, तो विद्यार्थी शाळेतून लवकर घरी जाऊ शकतो.

हे ऐकताच एक विद्यार्थी आपलं दप्तर खिडकीतून बाहेर टाकून देतो.

शिक्षक : ते दप्तर कुणी टाकलं रे बाहेर?

विद्यार्थी : सर, मी टाकलं. मी आता जाऊ घरी?


20 June 2012

बाप्पाचा पप्पा...


एक बेवडा फुल्ल तर्राट होऊन रोज सकाळी शंकराच्या देवळात पाया पडून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जात असतो.

एक दिवस देवळातला पुजारी शंकराच्या मूर्तीच्या जागी गणपतीची मूर्ती ठेवतो.

बेवडा नेहमीप्रमाणे सकाळी शंकराच्या दर्शनाला येतो.

शंकराच्या जागी गणपतीला पाहून म्हणतो,ए छोट्या, तुझ्या पप्पाच्या आशीर्वादानं आपलं कसं मस्त चाललंय. पप्पाला म्हणावं काका येऊन गेले आज. आठवणीनं सांग बरं.

16 June 2012

दहावीचा निकाल


एक नेता आपल्या मुलाचा दहावीचा निकाल लागल्यावर त्याला घेऊन शाळेत गेला.

निकाल हातात येताच त्याचा मुलगा नापास झाल्याचे त्याला कळले.
तरीपण तो मिठाईच्या दुकानात गेला, पेढे आणले आणि सर्व शिक्षकांना पेढे वाटले.

मुख्याध्यापक : अहो, तुमचा मुलगा तर नापास झालाय ना? मग पेढे कसले वाटता?

पुढारी : हो. पण वर्गातील ६० मुलांपैकी ५० मुले नापास झाली म्हणजे बहुमत तर माझ्या मुलाच्या बाजूने आहे ना.

15 June 2012

कंजूशीला हद्दच नाही...


एक कंजूस मारवाडी आपल्या हातावर ब्लेडने कापून घेत होता.

त्याची बायको घाबरली आणि तिने विचारले, “अहो, काय झालं? का कापून घेताय स्वत:ला?

मारवाडी : काही नाही गं. जरा डेटॉल (Detol) सांडलं होतं. आता ते असं कसं वाया जाऊ द्यायचं म्हणून थोडंस कापतोय.

ओसामा “बोलबच्चन” आणि अमिताभ बच्चन


ओसामा : आप कैसे हो?

अमिताभ : बस “कभी खुशी कभी गम” और आप?

ओसामा : बस “कभी गोला कभी बम.”

14 June 2012

दारुड्याची खरेदी


एक दारुड्या रंगाच्या दुकानात जातो.

दारुड्या : मला घराला लावण्यासाठी रंग पाहिजे. कोणता रंग चांगला आहे?

दुकानदार : हा घ्या, १००० रूपयांचा रॉयल पेंट. एकदा लावून तर बघा घर कसं रंगीबेरंगी दिसेल ते.

दारुड्या : अरे हट...एवढा महाग? त्यापेक्षा मी एक १०० रुपयांची “रॉयल स्टॅग” घेतो. मग नुसतं घरंच काय सगळं शहर रंगीबेरंगी दिसेल.

बिडी जलईले...


एक ९ वर्षांचा मुलगा एका टपरीवर जातो आणि एक बिडीचा बंडल मागतो.
मुलगा : एक शिवाजी बिडीचा बंडल दे रे मामू.

दुकानदार : का रे चिंट्या, बिडी ओढतोस काय? काय वय आहे तुझं?

मुलगा : नाही रे मला नकोय. बिडीचा बंडल माझ्या लहान भावाला पाहिजे. माझ्यासाठी एक विल्सचं पाकीट दे.

12 June 2012

पडलो आणि लागलं...


शिक्षक : बंड्या, तू काल शाळेत का आला नाहीस?

बंड्या : गुरुजी, काल मी पडलो आणि लागलं.

शिक्षक : अरे, कुठे पडलास आणि कुठे लागलं?

बंड्या : काल रात्री मी पलंगावर पडलो आणि माझा डोळा लागला.

09 June 2012

राजकारण


राजकारणात राजकारणी कुणी का असेना, त्याचा एक नमूना.

बिहारमध्ये नुकताच सत्तापालट झाला.

नवीन मुख्यमंत्र्यांनी एका दुर्गम खेड्यात जाऊन जाहीर केलं की त्यांच्या गावात लवकरच वीज येणार आहे आणि सर्वांना ती मोफत दिली जाईल.

तेव्हा त्या खेडेगावाचे माननीय सरपंच उठले आणि गावकर्‍यांना उद्देशून म्हणाले,गावकर्‍यांनो, आपण सर्वांनी मिळून आपल्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नवीन निर्णयाचं स्वागत करुयात कारण, आजपर्यंत आपण अंधारात राहण्यासाठी वीजबिल भरत होतो. आता इथून पुढे अंधारातही आपल्याला मोफत राहता येईल.

06 June 2012

मच्छरास फसवलं


एक सरदार सकाळी उठल्यावर आपल्या मुलाला सांगू लागला, “तुला माहितीये का? मी रात्री एका मच्छरास फसवलं.”

मुलगा : छ्या...हे शक्य आहे का? कसं काय फसवलं तुम्ही?

सरदार : मी रात्री मच्छरदाणी बेडरूममध्ये लावली पण झोपलो मात्र हॉलमध्ये.

04 June 2012

च्या असला...

एकदा राहुलजी एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जातात.

त्यांना त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतात.

तेवढ्यात एक मुलगा येतो आणि म्हणतो, “साहेब, ह्यावर्षी वर्षामुळे सगळी पिक खराब झाली बघा.”


राहुल : त्या वर्षाच्या आई-वडिलांना बोलवा. मी बोलतो त्यांच्याशी.


03 June 2012

अंत्यसंस्काराच्या वेळी...


साठे सर त्यांच्या नातेवाइकाकडे त्याची आजी वारली म्हणून तिच्या अंत्यसंस्कारासाठी जातात.
आजीला तिरडीवर झोपवलेलं असतं.

अनेकजण रडत असतात.

एकजण म्हणतो,आजी sss, , हा, आ...मला सोडून का गेलीस? मला पण घेऊन जायचं होतं गं, आजी sss.

मग नंतर त्याचं ऐकून अजून दोन-चार जण तसंच म्हणतात.

मग साठे सर त्यांना म्हणतात,काय रे पोरांनो, आजी जाताना सुमो घेऊन गेली की काय? की तुम्ही तिला विचारताय...आम्हाला पण घेऊन जायचं म्हणून.

02 June 2012

हसता का हो?


सांगा बरं, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रत्येक नोटेवर हसताना का दिसतात?
भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून?
?
?
?
नाही हो. कारण, ते रडले तर नोटा भिजणार नाहीत का?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...