एका पुणेकराकडे लग्न असतं. गावाहून नातेवाईक आलेले असतात.
लग्न लागतं. सगळे आपापल्या घरी निघून जातात.
काही मोजकेच पाहुणे राहिलेले असतात. ते मंडपात झोपलेले असतात.
एका पुणेरी आजोबांच्या बाजूला एक जाडजूड पोरगा (ठोकळा) झोपलेला असतो.
त्याचा एक पाय सारखा आजोबांच्या अंगावर पडत असतो. आजोबा त्याचा पाय बाजूला ढकलून ढकलून वैतागलेले असतात.
मग आजोबा बाजूला पडलेली काठी उचलून तिचा आकडा त्याच्या मानगुटीत अडकवून ओढून त्याला उठवतात. तो जाड्या वैतागून उठतो आणि विचारतो, “काय पाहिजे?”
आजोबा : बाळा मला सांग, श्वास थांबून तडफडून तडफडून मरणं चांगलं की एका क्षणात जीव जाणं चांगलं?
पोरगा एवढासा प्रश्न विचारण्यासाठी झोपेतून उठवलं म्हणून वैतागतो. पण कुठे ह्या म्हातार्याच्या नादी लागायचं म्हणून बोलून टाकतो, “एकदम मरणं चांगलं.”
आजोबा : अरे ठोकळ्या, मग तुझा नुसता एक पाय माझ्या अंगावर टाकून का झोपतोस? दोन्ही पण पाय माझ्या अंगावर टाक. अन तेवढ्याने पण माझा जीव नाही गेला तर माझ्या उरावर ब्रेक डान्स कर की वरातीत करत होतास तसा...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.