Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label पुणेरी चटका. Show all posts
Showing posts with label पुणेरी चटका. Show all posts

07 February 2021

किमान शब्दात कमाल अपमान

*नातेवाईक* : अभ्यास कर, मेहनत कर, प्रगती कर, खूप यशस्वी हो..

*पुणेकर मुलगा:* हो.. *पण सहन होईल का तुम्हाला? 🙄😉😉*

*किमान शब्दात कमाल अपमान*
😛😛😀😀😀

16 April 2020

कांदे-पोहे


एकदा एकजण कांदे-पोह्याच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेला.

त्याला विचारण्यात आलं, "तुम्ही दारू घेता का?"

तर हा पठ्ठ्या म्हणतो कसा, "नको, राहूदेत. आता कोल्डड्रिंकच द्या."

मग याचा कसला अपमान केला असेल अस्सल पुणेरी भाषेत ना...नुसती कल्पना करुनच अंगावर काटा येतो.


17 January 2020

विनोद कसा करावा?


तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखादा विनोद करावा आणि लोकांनी त्यावर पोट धरून हसावं,
तर खालील वाक्य (मंत्रच म्हणा ना २०१९ सालचा) तीन वेळा म्हणा...

"मी पुन्हा येईन..."


(सूचना:  हा विनोद जपून करावा. काही लोकं हे वाक्य ऐकून जोड्याने मारू शकतात. असे काही झाल्यास होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.)



पुणेकरांकडून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

शुभेच्छा...

मी काय म्हणतो, सगळा भार तिळगुळावर कशाला...आपणही थोडं गोड बोलावं...



पुणेकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा-१


शुभेच्छा...

तिळगुळ घ्या आणि प्रयत्न तरी करा...




16 January 2020

पुण्यात गाडी चालवताना घ्यावयाची काळजी


जेव्हा विमानाच्या चाकांप्रमाणे पाय बाहेर येताना दिसतील,

तेव्हा समजायचं की;

Activa वर बसलेली बाई ब्रेक मारणार आहे म्हणून...


10 November 2016

जादू


एक पुणेरी दुकानदार आपल्या दुकानाबाहेर एक पाटी लावतो.


“उधारी म्हणजे एक जादू आहे. उधार दिले कि ग्राहक गायब होतो.”


24 October 2015

रिक्षावाला


एकदा एक पुणेकर नागपूरला गेला.

तिथे एका रिक्षावाल्याला हात केला. रिक्षा थांबली.

पुणेकर : सीता-बर्डीला जाणार का?

रिक्षावाला : हो.

पुणेकर : किती घेणार?

रिक्षावाला : २०० रुपये.

पुणेकर : ५० देईन.

रिक्षावाला : अहो, ५० रुपयांत कोण नेतं? नाही जमणार.

पुणेकर : नेतो ना मी. तुम्ही मागे बसा.

 

12 August 2015

लाड

पुण्यात भलते लाड चालत नाहीत.

एक मुलगा बाबांना म्हणतो, “बाबा, बाबा, मला ब्लॅकबेरी नाहीतर अॅपल पाहिजे."


बाबा : नालायका, फणस आणलाय तो संपव आधी.


06 August 2015

प्रामाणिक पुणेकर(ही) असतात बरं का...

पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावलेला होता.

“आमच्याइथे दारू पिणारा आयुष्यात हमखास लखपती होतोच होतो. *”

*...जर तो आधी करोडपती असेल तर.



सूचना : वरील बोर्ड नीट वाचा, भिकार्‍यासारखे १० वेळा आम्ही कधी लखपती होणार म्हणून विचारायला येऊ नये. अपमान करण्यात येईल.


26 July 2015

एलिअन पुण्यात

एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवर' एक अवकाश यान येते..

आकाशातून मोठी लाईट मारुन एलिअन घोषणा करतात..

" आजपासून पुणे आमच्या ताब्यात 
आहे..!! "
.
.
. .
.
.
.
खालून कुलकर्णी काकू: ते काही असू दे... पण गाडी गेट समोर लावायची नाही.


                                                                        ...फेसबूकवरुन साभार


09 June 2015

काय जमाना आहे...



आजकालची तरुण पिढी,
लगेच रस्ता बदलून पुढे जाते,

फक्त त्यांना कुणीतरी सांगायला पाहिजे,
.
.
.
.
.

की पुढे मामा लोकं पावत्या फाडताहेत.


05 May 2015

काय ऐकतोय मी हे?

एकदा एक पुणेकर नागपुरात विधानसभा बघायला गेले होते.

तिथे ते एका समोसे विकणार्‍या विक्रेत्याकडे रोज समोसे खात असत.

(एक दिवस) पुणेकर : काय हो, आज समोसे फारसे चवदार लागत नाहीयेत. कालचे उत्तम होते.

विक्रेता : हे पण कालचेच है ना भौ.


मग पुणेकराने पुढे त्याचा कसला अपमान केला असेल ना, च्या मारी...

04 February 2015

तुम्ही हसताय की रडताय ते कमेंटमध्ये लिहा.


एक मुलगी रस्त्याने जाणार्‍या रिक्षावाल्याला हात करते.

रिक्षा थांबते.

रिक्षावाला : कुठे जायचं मॅडम?

मुलगी : घरी.

रिक्षावाला : पत्ता?


मुलगी : काय नालायक आहे? माझ्या घरचा पत्ता मी का सांगू तुला?

15 September 2013

हॉटेलच्या शोधात...

एक पुणेकर एकदा सहलीसाठी कुलु-मनालीला जातो.
तिथे त्याला जाम भूक लागते.

जवळच दोन जाडजूड-अगडबंब व्यक्ती उभ्या असतात. तेही पर्यटकच असतात.

पुणेकर : अहो, मला खूप भूक लागलीये. इथे कुठे चांगलं हॉटेल आहे का?

एक जाड्या : काही माहिती नाही बुवा. आम्हीही इथे नवीनच आहोत.

पुणेकर : काही हरकत नाही. आपण एकत्रच फिरूया.

दूसरा जाड्या : ओ, काय संबंध? आपली ना ओळख ना पाळख?

पुणेकर : तसं नाही ओ. तुमच्या शरीरयष्टीकडे बघून मला अंदाज आलाय की थोडा वेळ तुमच्याबरोबर राहिलो ना तर मला हॉटेल नक्की सापडेल. 

27 July 2013

पुणेकराची शिकवणी

एक नागपूरकर : काय हो तुम्हाला मेंदू आहे का?

पुणेकर : हो, आहे की.

नागपूरकर : मग काय त्याच्यापर्यंत तुमच्या शरीरातलं रक्त पोहोचत नाही का?

पुणेकर : नाही ना.

नागपूरकर : तरीच...तुम्ही असे तिरसट स्वभावाचे आहात.

पुणेकर : हो, असेल कदाचित. काय हो, याचा अर्थ तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा चांगलाच होतोय म्हणायचं की.

नागपूरकर : (पुणेकराने एवढ्या सहजपणे आपली लाज घालवून घेतली या खुशीत) म्हणजे काय???


पुणेकर : म्हणजे काय माहितीये? याचं तुम्हाला वैज्ञानिक उत्तर देतो बघा. याचा अर्थ असा की द्रव पदार्थ हा नेहमी रिकाम्या जागेकडे वाहतो, हा नियम इथे लागू पडतो.

21 June 2013

पुण्यातील कंपनी


पुण्यातील एका खाजगी कंपनीत कामावर नवीन रुजू झालेल्या कर्मचार्‍याला त्याचा वरीष्ठ अधिकारी विचारतो, “काय हो. आज तुमचा पहिलाच दिवस.”

नवीन कर्मचारी : हो सर.

सर : आमच्या ऑफिसचा एक नियम आहे. रोज आत येताना आपले बूट बाहेरच्या पायपुसणीवर स्वच्छ करूनच यायचे. तुम्ही व्यवस्थित पुसून आलात ना.

नवीन कर्मचारी : हो सर.


सर : आमच्या ऑफिसचा अजून एक नियम आहे, कधीही खोटं बोलायचं नाही. हे मुद्दामुन सांगतोय, कारण बाहेर पायपुसणीच नाहीये.


14 April 2013

हाजमोला...


एक भिकारी एका पुणेकराकडे भीक मागायला येतो.
भिकारी भलताच प्रामाणिक असतो.

भिकारी : साहेब, आपल्या शेजार्‍याने मला पोटभर जेवू घातलंय. तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना.

पुणेकर : हा घे, हाजमोला.

06 April 2013

विनम्र पुणेकर?


एक आजोबा देवळात देवाच्या दर्शनासाठी जातात.
आपली छत्री ते तेथील झाडाखाली ठेवून देवदर्शन करून येतात.
परतताना त्यांना दिसते की एक व्यक्ती त्यांची छत्री घेऊन जात आहे.

आजोबा त्या व्यक्तीला विचारतात, “का हो, तुमचंच नाव साठे आहे का?”
व्यक्ती : नाही. का?

आजोबा : त्याचं काय आहे? तुम्ही जी छत्री घेऊन जात आहात ती साठेंची आहे आणि ते नाव धारण करणारे सद्गृहस्थ मीच आहे.
                       तेव्हा ही छत्री तोंडातून एकही अक्षर न उच्चारता माझ्या स्वाधीन करावी व येथून आपल्या घरी मार्गस्थ व्हावे. पुन्हा अशी हरकत केल्यास असा अपमान केला जाईल की तोंड लपवण्यासाठी एक छत्री घेऊन फिरावे लागेल.

04 February 2013

पुण्याची आपत्कालीन यंत्रणा


एकजण रस्त्यात झाड पडले आणि रस्ता बंद झाला म्हणून आपत्कालीन यंत्रणेला फोन करतो.

बराच वेळा फोन लावून ती व्यक्ती वैतागते कारण कुणीच फोन उचलत नसतं.

अर्ध्या तासाने फोन उचलला जातो.

हा माणूस चिडून म्हणतो, “च्यायला, मी काय मूर्ख आहे का हजारदा फोन करायला? माझं डोकं फिरलंय का?”

पलीकडून आवाज येतो, “सॉरी, नंबर चुकीचा आहे. ही पुण्याची आपत्कालीन यंत्रणा आहे, हॉस्पिटल नाही.”...आणि फोन ठेऊन दिला जातो.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...