एक आजोबा देवळात देवाच्या दर्शनासाठी जातात.
आपली छत्री ते तेथील झाडाखाली ठेवून देवदर्शन करून
येतात.
परतताना त्यांना दिसते की एक व्यक्ती त्यांची छत्री
घेऊन जात आहे.
आजोबा त्या व्यक्तीला विचारतात, “का हो, तुमचंच नाव साठे आहे का?”
व्यक्ती : नाही. का?
आजोबा : त्याचं काय आहे? तुम्ही जी छत्री घेऊन जात आहात ती साठेंची आहे आणि ते नाव धारण करणारे सद्गृहस्थ
मीच आहे.
तेव्हा ही छत्री तोंडातून एकही अक्षर न उच्चारता माझ्या स्वाधीन करावी व येथून
आपल्या घरी मार्गस्थ व्हावे. पुन्हा अशी हरकत केल्यास असा अपमान केला जाईल की तोंड
लपवण्यासाठी एक छत्री घेऊन फिरावे लागेल.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.