एक दारुड्या गटारी अमावास्येला
फुल्ल टाईट होऊन रस्त्याच्या कडेकडेने हलत-डुलत चालला होता.
दारूच्या नशेत तो काहीही बरळायचा.
तो असाच म्हणतो, “च्यायला मला दारूला कुणी बंदी घातली या महाराष्ट्रात,
तर मी महाराष्ट्र त्या अरबी का फिरबी समुद्रात बुडवीन.”
त्याचं हे असलं वागणं पाहून
तिथून जाणार्या एका हवालदाराने त्याला हटकलं.
हवालदार : ए, आधी स्वत:ला सांभाळ. कुणी ऐकलं तर मरेस्तोवर मार खाशील.
दारुड्या : का म्हणून?
मला दारू प्यायला बंदी घातली तर अख्खा महाराष्ट्र गणपतीसारखा तीनवेळा पाण्यात बुडवून
विसर्जन करीन.
हवालदार : काय येडा समजलास
मला. दारू पिऊन काहीही बरळू नकोस. फटाके फोडू का?
दारुड्या : मी दारू प्यायलोय?
बरं, मग उद्या सकाळी फेकतो त्याला, या दारूची शप्पथ.
हवालदार : तसं मला लिहून दे.
उद्या उतरल्यावर नाही म्हणशील.
दारुड्या तसं लिहून देतो की,
हवालदार श्री. चंद्रकांत पावट्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मी अख्खा महाराष्ट्र अरबी
समुद्रात फेकीन. तसे नाही केल्यास मी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालण्यासाठी जी काही
शिक्षा असेल ती भोगण्यास पात्र राहीन.
दुसर्या दिवशी हवालदार त्याला
इन्स्पेक्टरच्या पुढे उभा करतो आणि रात्री झालेली हकीकत सांगतो.
इन्स्पेक्टर : काय रे?
जीभ जास्त वळवळते काय तुझी? चल आता फेक बघू महाराष्ट्र त्या अरबी समुद्रात.
दारुड्या : ठीक आहे साहेब,
आत्ता फेकतो. फक्त तो उचलून माझ्या खांद्यावर ठेवा तुम्ही.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.